Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedमध्यप्रदेशातील गुंतवणुकीच्या संधींवर संवादात्मक सत्र संपन्न

मध्यप्रदेशातील गुंतवणुकीच्या संधींवर संवादात्मक सत्र संपन्न

पुणे,२३ जानेवारी 2025 : मध्यप्रदेशातील गुंतवणुकीच्या संधींवर संवादात्मक सत्र पुण्यातील हॉटेल रिट्झ कार्लटन येथे पार पडले. हा उपक्रम म्हणजे फेब्रुवारी २४ आणि २५ रोजी भोपाळ येथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर्स समिटचा एक भाग आहे. नैसर्गिक सौंदर्य, धार्मिक स्थळे आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा यामुळे मध्यप्रदेश एक आकर्षक गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहे. याप्रसंगी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी ३० हुन अधिक उद्योजक आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधला.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले की, विविध शहरात आमच्या कार्यक्रमांना ( रोड शो )चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध शहरातील या रोडशोच्या माध्यमातून आयटी, कृषी, दुग्ध व्यवसाय क्षेत्रात गुंतवणूकदारांनी स्वारस्य दाखवले आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर्स समिट मध्ये याची घोषणा करण्यात येईल. मध्यप्रदेश मध्ये माइनिंग, पर्यटन, शिक्षण सारख्या क्षेत्रांत गुंतवणुकीच्या अनेक संधी आहेत. आयटी, दुग्ध, शैक्षणिक क्षेत्रांचा दाखला देत ते म्हणाले की महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मध्ये अनेक बाबतीत साधर्म्य आहे आणि त्याचा लाभ हा दोन्ही राज्यांना होऊ शकतो.

याबरोबरच सीआयआय पुणे झोनल कौन्सिलचे उपाध्यक्ष आणि आरएसबी ट्रान्समिशन (आय) लिमिटेडचे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहरा,मध्य प्रदेश सरकारच्या औद्योगिक धोरण आणि गुंतवणूक प्रोत्साहन विभाग आणि एमएसएमई विभागाचे प्रधान सचिव आयएएस राघवेंद्र कुमार सिंह, मध्य प्रदेश टुरिझम बोर्डच्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक आयएएस बिदिशा मुखर्जी, मध्य प्रदेश सरकार पर्यटन मंडळाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आयएएस संजय दुबे, पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष सुधीर मेहता,ब्रिजस्टोन इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक हिरोशी योशिझेन आणि मध्य प्रदेश इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक आयएएस चंद्रमौली शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.मध्य प्रदेश इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि,मध्यप्रदेश सरकार आणि द कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज(सीआयआय) यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात फिनटेक, माहिती तंत्रज्ञान,आयटीईएस, कृषी तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया उद्योग, औषध निर्माण, आरोग्यसेवा, वाहन उद्योग, इलेक्ट्रिक वाहने, कौशल्य विकास, पर्यटन अशा विविध क्षेत्रातील गुंतवणूक संधींबाबत माहिती देण्यात आली. राघवेंद्र कुमार यांनी गुंतवणूक संधींबाबत माहिती दिली, बिदीशा मुखर्जी यांनी पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत संवाद साधला तर संजय दुबे यांनी राज्याची धोरणे, आयटी, आयटीईएस ईएसडीएम क्षेत्रातील आणि प्रकल्पांबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments