Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedवारी सोलर अमेरिकाज इंक.तर्फे टेक्सास केंद्रात १.६ गिगावॉट क्षमतेसह व्यावसायिक उत्पादनाची सुरुवात

वारी सोलर अमेरिकाज इंक.तर्फे टेक्सास केंद्रात १.६ गिगावॉट क्षमतेसह व्यावसायिक उत्पादनाची सुरुवात

ब्रुकशायर, टेक्सास, 23 जानेवारी २०२५ – वारी सोलर अमेरिकाज इंक या वारी एनर्जीज लिमिटेडच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीला ब्रुकशायर, टेक्सास येथील अत्याधुनिक व्यावसायिक उत्पादनाची सुरुवात झाल्याचे घोषित करताना अभिमान वाटत आहे. या केंद्राची क्षमता १.६ गिगावॉट आहे. या ऐतिहासिक टप्प्यामुळे वारीची अमेरिकेचे हरित उर्जेच्या दिशेने स्थित्यंतरास पाठिंबा देण्याची बांधिलकी अधोरेखित झाली असून उत्तर अमेरिकी सौर बाजारपेठेतील कंपनीचे आघाडीचे स्थान आणखी बळकट झाले आहे.

हे केंद्र आता पूर्णपणे कार्यान्वित झाले असून वारी सोल अमेरिकाज उच्च दर्जाचेच्याफोटोव्होल्टेक मोड्युल्सचे उत्पादन करून या प्रदेशात अक्षय उर्जा सुविधांसाठी असलेली वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. व्यावसायिक उत्पादनाची सुरुवाच अमेरिकेत सौर उत्पादनाचे स्थानिकीकरण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असून त्यामुळे रोजगार निर्मिती तसेच आर्थिक विकासाला हातभार लागेल, तर आयात कराव्या लागणाऱ्या सौर उत्पादनांवरचे अवलंबित्व कमी होईल.

वारी सोलर अमेरिका इंकचे अध्यक्ष श्री. सुनील राठी म्हणाले, ‘आमच्या ब्रुकशायर केंद्रात व्यावसायिक उत्पादनाची झालेली सुरुवात हा वारीसाठी ऐतिहासिक टप्पा आहे. यामुळे स्थानिक उत्पादन क्षमता बळकट होईल, शिवाय सौर उर्जा सहज आणि शाश्वत पद्धतीने उपलब्ध करण्याच्या आमच्या उद्दिष्टाला हातभार लागेल. दर्जा आणि प्रभावीपणाचे उच्च मापदंड पूर्ण करणाऱ्या नाविन्यपूर्ण सुविधा पुरवण्यासाठी आम्ही बांधील आहोत.’

उत्पादन वाढेल तसे वारीने अमेरिकेच्या हरित उर्जा उद्दिष्टांना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका निभावण्याचे आणि आपल्या उत्पादनांद्वारे शाश्वता व उर्जा स्वातंत्र्याला पाठिंबा देण्याचे ध्येय ठेवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments