बेंगळुरू, भारत – जानेवारी २२, २०२५ – सॅमसंगने आज नवीन गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा, गॅलॅक्सी एस२५+ आणि गॅलॅक्सी एस२५ स्मार्टफोन्सच्या लाँचची घोषणा केली. हे स्मार्टफोन्स आतापर्यंतच्या सॅमसंगच्या सर्वात नैसर्गिक व संदर्भ-केंद्रित मोबाइल अनुभवांसह खरे एआय सोबती म्हणून नवीन मापदंड स्थापित करतात.
”उत्तम इनोव्हेशन्स त्यांच्या वापरकर्त्यांचे प्रतीक आहेत, ज्यामुळे आम्ही सर्वांना त्यांच्या डिवाईसेसचा अधिक सहजपणे व कार्यक्षमपणे वापर करता येण्यासाठी गॅलॅक्सी एआयला विकसित केले, ज्यामधून त्यांची गोपनीयता सुरक्षित असण्याची खात्री मिळते,” असे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या मोबाइल ईएक्स्पेरिअन्स बिझनेसचे अध्यक्ष व प्रमुख टीएम रोह म्हणाले. ”गॅलॅक्सी एस२५ सिरीजमध्ये एआय-एकीकृत ओएस आहे, जी आपल्या तंत्रज्ञानाच्या वापर करण्याच्या आणि आपल्या जीवनशैलीच्या पद्धतीमध्ये बदल करते.”
गॅलॅक्सी एस२५ सिरीजमधील स्मार्टफोन्समध्ये वन यूआय ७ हा सॅमसंगचा एआय-फर्स्ट प्लॅटफॉर्म आहे, जो सर्वोत्तम कंट्रोल्स देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. यामुळे एआय-पॉवर्ड वैयक्तिकृत मोबाइल अनुभव मिळतो. एआय एजंट्ससह मल्टीमोडल क्षमता गॅलॅक्सी एस२५ ला परस्परसंवादांसाठी मजकूर, स्पीच, इमेजेस् व व्हिडिओजचा अर्थ सांगण्यास सक्षम करतात, ज्यामुळे संवाद अधिक सहजगत्या होतो.
गॅलॅक्सी एस२५ नैसर्गिक भाषा समजामधील ब्रेकथ्रूला सादर करते, ज्यामुळे दैनंदिन परस्परसंवाद अधिक सोपे होतात.
गॅलॅक्सी एस२५ सिरीज संवाद, उत्पादकता व सर्जनशीलतेसाठी गॅलॅक्सी एआयच्या लोकप्रिय टूल्समधील अपग्रेड्ससह येते, जसे गुगलचे सर्कल टू सर्च, कॉल ट्रान्स्क्रिप्ट, राइटिंग असिस्ट आणि ड्रॉईंग असिस्ट.
गॅलॅक्सी एस२५ सिरीजसह तुम्ही कन्टेस्ट-अवेअर सूचनांच्या माध्यमातून कृतीशील शोध देखील घेऊ शकता. तसेच, गॅलॅक्सी एस२५ जीआयएफ शेअर करणे किंवा इव्हेण्ट तपशील सेव्ह करणे अशा त्वरित फॉलो-अप कृतींसाठी सहजपणे अॅप्समध्ये स्विच करण्याची सुविधा देतो.
गॅलॅक्सी एस२५ सिरीजमध्ये वैयक्तिकृत एआय वैशिष्ट्यांसाठी पर्सनल डेटा इंजिन आहे. नॉक्स व्हॉल्टच्या माध्यमातून सर्व वैयक्तिकृत डेटा खाजगी व सुरक्षित ठेवला जातो. गॅलॅक्सी एस२५ मध्ये पोस्ट-क्वॉन्टम क्रिप्टोग्राफी देखील आहे, जे उदयोन्मुख धोक्यांपासून वैयक्तिक डेटाचे संरक्षण करते. तसेच क्वॉन्टम कम्प्युटिंग विकसित होण्यासह या सुरक्षिततेमध्ये अधिक वाढ होऊ शकते.
गॅलॅक्सी एस२५ सिरीजमध्ये गॅलक्सी एस सिरीजमधील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर स्नॅपड्रॅगन® ८ एलाइट फॉर गॅलॅक्सीची शक्ती आहे.
गॅलॅक्सी एस२५ सिरीज हाय रिझॉल्यूशन सेन्सर्स आणि प्रोव्हिज्युअल इंजिनच्या माध्यमातून प्रत्येक रेंजमध्ये अत्यंत सुस्पष्टपणे फोटो कॅप्चर करते, ज्यामुळे ते मोबाइल फोटोग्राफीसाठी नवीन मापदंड स्थापित करतात. यापूर्वीच्या १२ मेगापिक्सलमध्ये अपग्रेड करण्यात आलेल्या नवीन ५० मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा सेन्सरसह गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा अपवादात्मक सुस्पष्टता व वैविध्यता देतो. गॅलॅक्सी एस२५ मध्ये व्हिडिओंमधील नको असलेला आवाज काढून टाकण्यासाठी ऑडिओ इरेजर आहे.
गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा आतापर्यंतची सर्वात स्लिम, सर्वात हलकी व सर्वात टिकाऊ गॅलॅक्सी एस सिरीज आहे. यामध्ये टिकाऊ टायटॅनिअम आणि नवीन कॉर्निंग® गोरिला® आर्मर २ आहे. ओएस अपग्रेड्सच्या सात जनरेशन्स आणि सात वर्षांच्या सिक्युरिटी अपडेट्ससह गॅलॅक्सी एस२५ सिरीज दीर्घकाळपर्यंत विश्वसनीय व सानुकूल परफॉर्मन्सची खात्री देते.


