Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सकडून भारतातील पहिल्‍या एएमटी सीएनजी कार्ससाठी बुकिंग्‍जना सुरूवात टियागो...

टाटा मोटर्सकडून भारतातील पहिल्‍या एएमटी सीएनजी कार्ससाठी बुकिंग्‍जना सुरूवात टियागो व टिगोर आयसीएनजी एएमटी लाँच करणार

मुंबई, जानेवारी २४, २०२४: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने उद्योगात पहिल्‍यांदाच आपल्‍या सीएनजी कार्समध्‍ये एएमटी सादर करत देशातील सीएनजी विभागात क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. कंपनीने आज टियागो आणि टिगोर आयसीएनजी एएमटीसाठी बुकिंग्‍जना सुरूवात केली. सीएनजी कार्समध्‍ये अत्‍यावश्‍यक बूट स्‍पेस क्षमता वाढवण्‍यासाठी ट्विन सिलिंडर सीएनजी तंत्रज्ञानाचा समावेश करत टाटा मोटर्स सीएनजी वाहनांमध्‍ये ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशनच्‍या सादरीकरणासह नवीन ट्रेण्‍ड आणत आहे.

 

ही ग्राहकांसाठी उत्तम ऑफरिंग आहे, जेथे या कार्स सीएनजीची उच्‍च दर्जाची इकॉनॉमी, सोईस्‍कर ऑटोमॅटिक, प्रमाणित आर्किटेक्‍चर निर्माण करण्‍यात आल्‍याची सुरक्षितता हमी आणि उच्‍चस्‍तरीय आरामदायी व सोईस्‍कर वैशिष्‍ट्ये प्रदान करतील. ग्राहक आता जवळच्‍या टाटा मोटर्स अधिकृत डिलरशिपला भेट देत किंवा ऑनलाइन आजपासून २१,००० रूपयांमध्‍ये त्‍यांच्‍या पसंतीची कार बुक करू शकतात.

 

टियागो आयसीएनजी एएमटी ३ व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये येईल – एक्‍सटीए सीएनजी, एक्‍सझेडए+ सीएनजी व एक्‍सझेडए एनआरजी, तर टिगोर आयसीएनजी एएमटी २ व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये येईल – एक्‍सटीए सीएनजी व एक्‍सझेडए+ सीएनजी.

 

ओएमजी! इट्स ऑटोमॅटिक

 

· भारतातील पहिली ऑटोमॅटिक कार, जी पेट्रोल-सारखी कार्यक्षमता व आरामदायीपणा देते.

 

· दर्जात्‍मक कार्यक्षमता व ड्रायव्हिंग क्षमता – पेट्रोल व सीएनजी ड्रायव्हिंग क्षमतेमधील वाहनाच्‍या कार्यक्षमतेमध्‍ये कोणताच फरक नाही.

 

· सुलभ गिअर शिफ्टर क्‍वॉलिटी – गिअर शिफ्टिंग मूव्‍हमेंट अॅण्‍ड शिफ्ट क्‍वॉलिटी सुलभ आणि पेट्रोल एएमटीनुसार आहे.

 

· हाय रिस्‍टार्ट ग्रेडेबिलिटी – रिस्‍टार्ट ग्रेडेबिलिटी पेट्रोलप्रमाणे आहे आणि सेगमेंट रिस्‍टार्टमध्‍ये सर्वोत्तम आहे.

 

· ट्रॅफिक व पार्किंगमध्‍ये ईजी क्रीप बीहेवीयर – शहरातील वाहतूकीमध्‍ये व पार्किंगमध्‍ये सुलभ मनुव्‍हर करण्‍यासाठी क्रीप ट्यून करण्‍यात आले आहे.

 

ओएमजी! इट्स इंटेलिजण्‍ट!

 

· ट्विन सिलिंडर सीएनजी टँक्‍स: फर्स्‍ट इन इंडस्‍ट्री – सामानाच्‍या जागेखालील ट्विन सिलिंडर्सचे स्‍मार्ट प्‍लेसमेंट तडजोड न करता येणाऱ्या बूट स्‍पेसची खात्री देते.

 

· सिंगल अॅडवान्‍स ईसीयू – फर्स्‍ट इन इंडस्‍ट्री – पेट्रोल व सीएनजी मोड्समध्‍ये प्रभावीपणे व विनाव्‍यत्‍यय शिफ्टिंगची खात्री देते.

 

· सीएनजीमध्‍ये डायरेक्‍ट स्‍टार्ट – फर्स्‍ट इन इंडस्‍ट्री – दोन्‍ही कार्स थेट सीएनजी मोडमध्‍ये सुरू होतात, ज्‍यामुळे तुम्‍हाला ड्राइव्‍हदरम्‍यान सीएनजी मोडमध्‍ये स्विच करण्‍याची गरज नाही. यामुळे प्रत्‍येक वेळी कार सुरू करताना इंधनची बचत देखील होते.

 

ओएमजी! इट्स सेफ! – टियागो आयसीएनजी एएमटी आणि टिगोर आयसीएनजी एएमटी दर्जात्‍मक सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह येतात.

 

· रिफ्युइलिंगच्‍या वेळी कार स्विच ऑफ ठेवण्‍यासाठी मायक्रो स्विच – मायक्रो स्विच फ्यूएल झाकण उघडताच इग्निशन बंद करते आणि झाकण सुरक्षितपणे बंद होईपर्यंत बंद ठेवते.

 

· थर्मल इन्सिडण्‍ट प्रोटेक्‍शन – आयसीएनजी तंत्रज्ञान थर्मल घटनेसंदर्भात त्‍वरित इंजिनला सीएनजी पुरवठा बंद करते आणि सुरक्षितता म्‍हणून स्‍पेशल नोझलच्‍या माध्‍यमातून सिलिंडरमधील गॅस बाहेर उत्‍सर्जित करते.

 

· सीएनजी सिलिंडर्सचे सुरक्षित लोकेशन – सामानाच्‍या जागेखाली असलेले ट्विन सीएनजी सिलिंडर्स सुरक्षितता देतात, जेथे व्‍हॉल्‍व्‍ह्ज व पाइप्‍सचे सामानाखाली संरक्षण केले जाते, ज्‍यामुळे संभाव्‍य नुकसानाचा धोका कमी होतो.

 

· गळतीला प्रतिबंध करण्‍यासाठी आयसीएनजी किटमध्‍ये प्रगत साहित्‍याचा वापर – आयसीएनजी किट कोणत्‍याही गॅस गळतीला प्रतिबंध करण्‍यासाठी तापमान व दबावांसह चाचणी करण्‍यात आले आहे.

 

· लीक डिटेक्‍शन फिचर – आयसीएनजी तंत्रज्ञान त्‍वरित गॅस गळतीला ओळखते आणि सीएनजीवरून पेट्रोल मोडमध्‍ये बदलते.

 

ओएमजी! इट्स पॉवरफुल!

 

· या आयसीएनजी एएमटी कार्स शक्तिशाली १.२ लीटर रिवॉट्रॉन इंजिनच्‍या माध्‍यमातून अविश्‍वसनीय कार्यक्षमता देतात. अडवान्‍स आयसीएनजी तंत्रज्ञान परिपूर्ण पॉवर व पिक-अपसह अद्वितीय कार्यक्षमता देतात.

 

तसेच, विद्यमान रंगसंगतींमध्‍ये अधिक भर करत कंपनीने टियागोमध्‍ये लक्षवेधक नवीन टोर्नेडो ब्‍ल्‍यू, टियागो एनआजीमध्‍ये ग्रासलॅण्‍ड बिज आणि टिगोरमध्‍ये मेटेअर ब्राँझ या रंगांची भर केली आहे.

 

लाँच झाल्‍यापासून टियागो आणि टिगोरने प्रमुख टप्‍पे संपादित केले आहे, ज्‍यामधून टाटा मोटर्सचे नवीन डिझाइन तत्त्व दिसून येते आणि भावी मॉडेल्‍ससाठी मार्ग मोकळा होतो. वर्षानुवर्षे टियागो आणि टिगोरने मल्‍टी-पॉवरट्रेन पर्याय, लक्षवेधक डिझाइन, अपवादात्‍मक सुरक्षितता वैशिष्‍ट्य, वैशिष्‍ट्य-संपन्‍न इंटीरिअर्स आणि अत्‍याधुनिक तंत्रज्ञान अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांमुळे अनेक तरूण व डायनॅमिक ग्राहकांमध्‍ये व्‍यापक लोकप्रियता मिळवली आहे. या नवीन सुविधांसह कंपनी आपला सीएनजी पोर्टफोलिओ वाढवत आहे आणि सीएनजीमधील ऑटोमॅटिक तंत्रज्ञानासाठी गरजेची पूर्तता करत आहे.

 

वाहनच्‍या अहवालानुसार सीएनजी उद्योगामध्‍ये आर्थिक वर्ष २३ च्‍या तुलनेत आर्थिक वर्ष २४ मध्‍ये ४०.५ टक्‍क्‍यांची मोठी वाढ दिसण्‍यात आली आहे. टाटा मोटर्सचा सध्‍या सीएनजी क्षेत्रात मोठा पोर्टफोलिओ आहे, ज्‍यामध्‍ये टियागो, टिगोर, अल्‍ट्रोज आणि पंच या मॉडेल्‍सचा समावेश आहे. तसेच टाटा मोटर्स सीएनजी विक्रीमध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत आर्थिक वर्ष २४ मध्‍ये ६७.९ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह सीएनजी बाजारपेठेतील टॉप २ ब्रॅण्‍ड्सपैकी एक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments