Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedकरमतारा इंजिनिअरिंग तर्फे 1,750 कोटी रु. च्या आयपीओसाठी सेबीकडे मसुदा सादर

करमतारा इंजिनिअरिंग तर्फे 1,750 कोटी रु. च्या आयपीओसाठी सेबीकडे मसुदा सादर

वीज वहन क्षेत्रातील कंपनी करमतारा इंजिनिअरिंगने प्राथमिक समभाग विक्रीतून (IPO) 1,750 कोटी रु.चा निधी उभारण्यासाठी बाजार नियंत्रक सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत.

ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार प्रस्तावित आयपीओमध्ये 1,350 कोटी रु.मूल्याच्या शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि प्रवर्तकांकडून 400 कोटी रु. च्या शेअर्सच्या विक्रीची (OFS) योजना आहे.

OFS चा भाग म्हणून, प्रवर्तक तन्वीर सिंग आणि राजीव सिंग प्रत्येकी 200 कोटी रु. चे शेअर्स विक्रीसाठी देत आहेत.

सध्या, कंपनीमध्ये प्रवर्तकांचा 94.8 टक्के हिस्सा आहे.

नवीन समभाग विक्रीतून मिळणारी 1,050 कोटी रु. रक्कम कर्जफेडीसाठी वापरली जाईल आणि काही रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्यात येईल.

करमतारा इंजिनिअरिंग ही अक्षय ऊर्जा आणि प्रसारण वहन क्षेत्रासाठी उत्पादने तयार करणारी समग्र उत्पादक कंपनी आहे. कंपनी सोलर स्ट्रक्चर्ससाठी (फिक्स्ड-टिल्ट आणि ट्रॅकर्स) वन-स्टॉप शॉप म्हणून काम करण्यासाठी विविध उत्पादन पोर्टफोलिओ सादर करते.

कंपनी ट्रान्समिशन लाईन्ससाठी लॅटिस स्ट्रक्चर्स, सौर, पवन, ट्रान्समिशन आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी फास्टनर्स तसेच ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन हार्डवेअर फिटिंग्ज आणि अॅक्सेसरीज पुरविते.

विंड टर्बाइन्ससाठी ट्यूब्युलर टॉवर्स तयार करण्याकरता उत्पादन सुविधा केंद्र उभारण्यासाठी ड्राफ्ट कागदपत्रांनुसार कंपनी पवन ऊर्जा क्षेत्रात प्रवेश करत असून आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

आर्थिक आघाडीवर, कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 102.65 कोटी रु.चा कर-पश्चात नफा (PAT) नोंदवला आहे. मागील आर्थिक वर्षातील 42.36 कोटी रु. पेक्षा दुपटीने जास्त आहे. महसूल आर्थिक वर्ष 2023 मधील 1,600.31 कोटी रु. पेक्षा वाढून 2,425.15 कोटी रु. वर पोहोचला आहे.

जेएम फायनान्शियल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि आयआयएफएल कॅपिटल हे बुक-रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. पूर्वीचे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे म्हणजेच आताचे MUFG इनटाईम इंडिया त्यांची या इश्यूसाठी रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments