इंडिया सायन्स फेस्टिव्हल 2024 ला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, 24 जानेवारी २०२४ : फाउंडेशन फॉर अॅडव्हान्सिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी (फास्ट इंडिया) तर्फे व बजाज ऑटोच्या भागीदारीने आयोजित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर), पुणे येथे 20 आणि 21 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित इंडिया सायन्स फेस्टिव्हल (आयएसएफ) 2024 ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाने शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी आणि लोकांना विविध वैज्ञानिक उपक्रम, चर्चा आणि प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. इंडिया सायन्स फेस्टिव्हल 2024 च्या उद्घाटन प्रसंगी फास्ट इंडियाचे सहसंस्थापक व ऍस्पायरिंग माइंड्स अँड दि चेंज इंजिनचे संस्थापक वरुण अग्रवाल,आयएसएफचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार व भारत सरकारचे माजी प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा.के.विजय राघवन, किर्लोस्कर इंजिन्स लिमिटेडचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर,किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर ,दीपक नायट्रेट लिमिटेडचे संचालक अजय मेहता आणि आयआयएसईआर पुणेचे संचालक प्रा.सुनील भागवत आदी मान्यवर उपस्थित होते..
टूवर्ड्स इन्फिनिटी । माइंड, मशिन्स, आणि दि एंडलेस फ्रंटीयर या संकल्पनेअंतर्गत या महोत्सवात एमआयटी,हार्वर्ड,आयआयएससी,आयआयटी,एआयआयएमएस, आयआयएसईआर आणि अशोका विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील 60 हून अधिक वक्ते सहभागी झाले होते. या तज्ञांनी क्लायमेट चेंज सोल्यूशन्स, एआय आणि रोबोटिक्स आणि अंतराळ संशोधन यासह अनेक समर्पक विषयांवर दृष्टिकोन व्यक्त केले.
इन्फोसिसचे सहसंस्थापक क्रिस गोपाल कृष्णन यांचे बीजभाषण झाले.त्यांना प्रख्यात शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि प्रा.के.विजय राघवन यांच्या हस्ते इंडस्ट्री सायन्स लीडर 2024 म्हणून गौरविण्यात आले.
या फेस्टिव्हलमध्ये 30 हून अधिक प्रदर्शने आणि कार्यशाळा पार पडल्या,ज्यामध्ये प्रोस्थेटिक्स, एआय ऑटोमेटेड रोबोट्स, मानसिक आरोग्य, अन्न रसायनशास्त्र आणि डीआयवाय तंत्रज्ञान यांसारख्या विविध विषयांचा समावेश होता. डॉ.अन्नपूर्णी सुब्रमण्यम, डॉ.अभय करंदीकर, प्रा. व्ही. रामगोपाल राव, डॉ. अरबिंदा मित्रा, डॉ. थॉमस बारलो आणि डॉ. प्रिया नागराज यांच्यासह 30 हुन अधिक दिग्गजांसह सहा जेसी बोस सायन्स पॉलिसी डायलॉग्स आयोजित करण्यात आ
ले.


