Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedतनाएराच्या पहिल्या ब्रँड फिल्ममध्ये उषा उथुप आणि मृणाल ठाकूर यांची अप्रतिम अदाकारी...

तनाएराच्या पहिल्या ब्रँड फिल्ममध्ये उषा उथुप आणि मृणाल ठाकूर यांची अप्रतिम अदाकारी साजरा करत आहेत कारीगरी व कलेच्या वारशाचा उत्सव तनाएरामध्ये ग्राहकांना मिळते उत्पादनांची विस्तृत माहिती, प्रत्येक साडीसोबत मिळतो विश्वास, पारदर्शकता आणि कालातीत शान

राष्ट्रीय, 27 जानेवारी २०२५: टाटा समूहाचा ब्रँड, तनाएराने आपले पहिले ब्रँड कॅम्पेन सुरु केले आहे. ‘विश्वास, अस्सलता, शुद्धता, कारीगरी आणि विविध भारतीय विणकाम एकाच ठिकाणी उपलब्ध करवून देण्याचे आपले मूलभूत वचन पूर्ण करण्यासाठी हा धोरणात्मक उपक्रम डिझाईन करण्यात आला आहे. साड्यांबद्दलचे प्रचंड प्रेम आणि सखोल जाण यासाठी देखील सुप्रसिद्ध असलेल्या महान गायिका उषा उथुप आणि सौंदर्यवती, गुणी अभिनेत्री मृणाल ठाकूर तनाएराच्या पहिल्या ब्रँड फिल्ममध्ये सहभागी झाल्या आहेत. आपल्या देशाच्या जगप्रसिद्ध विणकाम वारशाची संवर्धन करून त्याला प्रोत्साहन देण्याप्रती आणि ग्राहकांना संपूर्ण माहितीनिशी निवड करण्यासाठी सक्षम बनवण्याप्रती ब्रँडची वचनबद्धता या फिल्ममध्ये जिवंत साकार करण्यात आली आहे. हाताने विणण्यात आलेल्या साड्यांची कालातीत शान आणि प्रत्येक साडीची कहाणी या कॅम्पेनमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. परंपरा आणि ट्रेंड या दोन्ही बाबतीत संपन्न असलेल्या साड्या ज्यांना हव्या असतात अशा चोखंदळ ग्राहकांसाठी तनाएरा हे सुयोग्य डेस्टिनेशन आहे.

ही फिल्म घडते तनाएराच्या एका शानदार स्टोरमध्ये, मृणाल ठाकूर आपल्यासमोर येते एका अतिशय सुंदर प्युअर सिल्क साडीमध्ये आणि तिच्याविषयी ‘एक्स्पर्ट’ मत विचारते, अर्थातच उषा उथुप यांना. त्यानंतरचा संवाद अतिशय खेळीमेळीचा, मजेशीर आणि त्यासोबत माहितीपूर्ण देखील आहे. हौशी खरेदीदारांच्या सामान्य जीवनातील वाटावा असा प्रसंग असल्यामुळे खूप आपलासा वाटतो. यातील संवाद बहुतांश साडी ग्राहकांच्या मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे अगदी खेळीमेळीने देतो. योग्य फॅब्रिक निवडण्यापासून साडीच्या अस्सलतेची पारख करण्यापर्यंत सर्व मुद्दे यामध्ये घेतले आहेत. तनाएरा साड्यांचे अनोखे गुण या फिल्ममध्ये अधोरेखित करण्यात आले आहेत. प्युअर सिल्क क्रेडेन्शियल्स, सिल्क मार्क टॅग, देशभरातील मास्टर कारागिरांनी हाताने विणलेली नाजूक डिझाइन्स यांचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. तनाएरा साड्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे शाश्वत आकर्षण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या फिल्ममध्ये मिळते, तसेच तनाएरा ब्रँडची पारदर्शकता, अस्सलता, कारीगरी आणि विश्वास यांची हमी देण्याचे काम देखील ही फिल्म करते.

कॅम्पेनविषयी बोलताना गायिका उषा उथुप म्हणाल्या, “माझ्यासाठी साडी हा फक्त माझ्या पेहरावाचा भाग नाही तर माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. आधुनिक डिझाईन संवेदना विचारात घेताना साडी विणण्याची कला जोपासण्याप्रती तनाएराची वचनबद्धता आणि सांस्कृतिक वारसा व व्यक्तीची अभिव्यक्ती यांचा सन्मान करण्याची माझी मूल्ये यांच्यात खूप प्रचंड साम्य आहे. साड्यांचे शाश्वत सौंदर्य जपण्यासाठी आणि आपल्या वॉर्डरोबमध्ये स्टाईल व अर्थपूर्णता या दोन्हींना महत्त्व देणाऱ्या महिलांपर्यंत त्या पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ब्रँडसोबत सहयोग करायला मिळणे ही खरंच एक खास गोष्ट आहे.”

अतिशय मनमोहक, शानदार ‘मोर डिझाईन’ बनारसी साडी आणि तिच्यावर रेखलेले शंभर मोर या फिल्ममधील सर्वात मोठे आकर्षण आहे. भारताच्या विणकाम परंपरामधून आलेली अतुलनीय कारीगरी आणि तिच्यातून अनोखी तरीही शाश्वत डिझाईन साकार करण्याची तनाएराची क्षमता या मास्टरपीसमधून दिसून येते.

उषा उथुप पुढे म्हणाल्या, “ही भागीदारी म्हणजे साडीविषयी मला पहिल्यापासून जे प्रेम वाटत आले आहे त्याचा एक पुढचा नैसर्गिक भाग आहे असे मला वाटते. ज्यांची कला जपली गेली पाहिजे, आणि जगासमोर मांडली गेली पाहिजे अशा कारीगरांना पाठिंबा देण्याप्रती माझ्या बांधिलकीचा हा एक भाग आहे असे मी मानते.”

तनाएराचे सीईओ श्री अंबुज नारायण म्हणाले, “अस्सलता आणि पारदर्शकता या दोन्ही गोष्टी मूल्य दर्शवणाऱ्या किमतीमध्ये प्रदान केल्या गेल्या पाहिजेत, प्रत्येक उत्पादन ज्या हातांनी घडवले आहे त्यांची कहाणी सांगितली गेली पाहिजे हा तनाएराचा उद्देश आहे. वारसा आणि आधुनिकता यांचा मिलाप घडवून आणण्याचा आनंद आम्ही साजरा करतो. तनाएरा ब्रँड ज्याचे प्रतिनिधित्व करतो तो भारतीय विणकामाचा समृद्ध वारसा जिवंत करण्याचे व्हिजन हे कॅम्पेन दर्शवते. महान गायिका उषा उथुप आणि सौंदर्यवती, गुणी अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या सहयोगाने ही कहाणी आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे, त्यांच्यासह आम्ही प्रत्येक तनाएराच्या साडीच्या कारीगरीसोबत घनिष्ठ नाते जोडण्यासाठी सर्वांना प्रेरित करताना आम्हाला आनंद होत आहे.”

तनाएरासोबत भागीदारीविषयी अभिनेत्री मृणाल ठाकूर म्हणाल्या, “तनाएरा आणि महान गायिका उषा उथुप यांच्यासोबत या कॅम्पेनमध्ये सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे. गेल्या वर्षभरात तनाएरासोबतचे माझे नाते अधिकाधिक सुंदर आणि घट्ट बनत चालले आहे. या अनोख्या डिझाइन्सबरोबरीनेच त्यांच्या वैविध्यपूर्ण कला देखील अनुभवायला मिळत आहेत ही माझ्यासाठी सुखद बाब आहे. या कॅम्पेनमध्ये हा संपूर्ण प्रवास अतिशय सुंदर पद्धतीने कॅप्चर करण्यात आला आहे. माझ्या व्यक्तिगत फॅशन फिलॉसॉफीशी अनुरुप असल्यामुळे माझ्यासाठी हे फार अर्थपूर्ण आहे.”

ऑगिल्वी साऊथचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर श्री पुनीत कपूर म्हणाले, “साडीविषयी प्रेम आणि उत्सुकता नव्याने निर्माण झालेली असो किंवा गेली अनेक वर्षे सराईतपणे साडी परिधान करणाऱ्या अनुभवी, चोखंदळ महिला असोत, ‘तनाएरा’ सर्वांसाठी आहे. आम्ही स्वतःला काही कठीण प्रश्न विचारले: सर्वात जाणकार ग्राहकांचे पारख निकष ब्रँड पूर्ण करू शकतो का – असे ग्राहक ज्यांना साड्यांविषयी आमच्या इतकीच माहिती आहे. मृणाल आणि तनाएरा गेल्या बऱ्याच काळापासून एकत्र आहेत, आणि आता या कॅम्पेनमध्ये भारतामध्ये साडीच्या निर्विवाद देवता मानल्या जाणाऱ्या महान गायिका उषा उथुप यांना सहभागी करवण्यात आले आहे. ही जोडी अतिशय प्रभावी आहे, त्यांनी आमच्या कहाणीमध्ये सौंदर्य, मनोरंजन आणि भावना आणल्या, आमच्या मूल्य प्रस्तुतीचे सार त्यांनी चपखलपणे मांडले आहे.”

कॅम्पेन पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा.

एजन्सी क्रेडिट्स:

निर्मिती: ऑगिल्वी, बंगलोर

सीसीओ ऑगिल्वी इंडिया: कैनाज कर्माकर, हर्षद राजाध्यक्ष, सुकेश नायक

सीसीओ, ऑगिल्वी साऊथ: पुनीत कपूर

एक्झिक्युटिव्ह चेयरपर्सन, ऑगिल्वी इंडिया: हेफझिबा पाठक

सीईओ, ऑगिल्वी इंडिया: राजेश व्ही.आर

सीएसओ, ऑगिल्वी इंडिया: प्रेम नारायण

प्रेसिडेंट आणि ऑफिस हेड, ऑगिल्वी साऊथ: तिथी घोष

ईसीडी ऑगिल्वी साऊथ: आरती निचलानी

क्रिएटिव्ह टीम: जयधृत सूर, काशिफ शकील, जननी एसव्ही, निधी गोपाल, बिबिन, शशांक मुरली

एसव्हीपी अकाउंट मॅनेजमेंट: अक्षता पुजारी

अकाउंट मॅनेजमेंट टीम: हृषीकेश आर, अभिजीत राव

स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचे प्रमुख, ऑगिल्वी साऊथ: इसो जॉन

ब्रँड स्ट्रॅटेजी टीम: शांभवी रामनाथन, ऐश्वर्या पवार

प्रॉडक्शन हाऊस – क्रोम प्रोडक्शन्स

दिग्दर्शक – अमित शर्मा

निर्माता – अभिषेक नोटानी

डीओपी – यश खन्ना

प्रॉडक्शन डिझायनर – उर्वी आशर

एडिटर – निखिल सेन

डीए – दिती पालन

चीफ ऍड – अनिमेश चक्रवर्ती आणि निशांत डे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments