पिंपरी चिंचवड शहरात काही भागात जीबीएस (गिलीयन-बॅरी-सिंड्रोम) या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे व त्या रोगाचे रूग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिचंवड महानगरपालिका, पाणीपुरवठा विभागामार्फत सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत जाहीर आवाहन करणेत येते की,
पिण्याच्या पाण्याबाबत खालीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी.
१. सर्व गृहनिर्माण संस्थानी आपल्या सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या नियमीतपणे (वर्षातून दोनदा) स्वच्छ कराव्यात.
२. बोअरवेल व विहिरीचे पाण्याचे नमुणे तपासणी करून मगच ते पाणी वापरावे.
३. टॅंकर पुरवठा धारकाकडून टॅंकर भरण्याचे ठिकाणाबाबत सोसायटीला माहिती असणे आवश्यक आहे व तेथील पाण्याची गुणवत्ता तपासून घ्यावी. तदनंतर पाण्याचा वापर करावा.
४. पाण्याच्या टाकीत पिण्याचे पाणी व टॅंकरचे पाणी एकत्रित करू नये.
५. २० लिटर जार मधील पाण्याची गुणवत्तेची खात्री करूनच वापर करावा
६. सद्यस्थितीत पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे.


