आर्थिक वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 1.1 मिलियन स्क्वेअर फूट आणि आर्थिक वर्ष 25 मध्ये आतापर्यंत 5.0 मिलियन स्क्वेअर फूट भाड्याने दिले; आर्थिक वर्ष 25 एकूण क्षमतेपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर
• GCC ची मागणी सुरूच राहणार असून भाड्याने देण्याच्या कामाच्या सुमारे 70% आहे
• वार्षिक 9% वाढीसह महसूल आणि निव्वळ कामकाज उत्पन्न (NOI) तिमाहीसाठी अनुक्रमे 1,022 कोटी रु. आणि 829 कोटी रु. पर्यंत वाढले
• वार्षिक 13% वाढीसह तिमाही रिकॉर्ड 559 कोटी रु. ची एकूण वितरण रक्कम दिली
बंगळुरू, भारत, 29 जानेवारी 2025 – भारताचे पहिले सूचीबद्ध REIT आणि क्षेत्रफळानुसार आशियातील सर्वात मोठे ऑफिस REIT एम्बसी ऑफिस पार्क्स रिट (NSE: EMBASSY / BSE: 542602) (‘Embassy REIT’) ने आज 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.
Embassy REIT चे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋत्विक भटाचार्जी म्हणाले, “वितरणात 13% मजबूत वाढ, विक्रमी तिमाही NOI आणि महसूल आणि आमच्या गेटवे मार्केट्समध्ये ऑफिस स्पेससाठी अत्यंत मजबूत मागणी यांसह आम्हाला आणखी एक मजबूत तिमाहीची नोंद करण्यात आनंद होत आहे. Embassy REIT चे पोर्टफोलिओ GCCs आणि इतर प्रमुख कंपन्यांसाठी पहिले पोर्ट ऑफ कॉल असून प्रतिभा आणि नाविन्यपूर्णता यासाठी ही जगातील सर्वात गतिशील बाजारपेठ आहे. CY2024 भारतातील विक्रमी वर्ष होते आणि आम्ही CY2025 मध्ये संधीचा पूर्ण लाभ घेण्यास सर्वार्थाने तयार आहोत.”
Embassy REIT साठी व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या एम्बसी ऑफिस पार्क्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (‘EOPMSPL’) च्या संचालक मंडळाने आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी 559 कोटी रु. किंवा 5.90 रु. प्रति युनिट वितरण जाहीर केले. आर्थिक वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी वितरणाची नोंदणी तारीख 1 फेब्रुवारी 2025 आहे आणि वितरण 7 फेब्रुवारी 2025 रोजी किंवा त्याआधी केले जाईल.
व्यवसायातील ठळक बाबी
• 21 करारांमध्ये 1.1 दशलक्ष चौरस फूट भाड्याने देणे. त्यात 0.7 दशलक्ष चौरस फूट नवीन भाड्याने देणे आणि 0.4 दशलक्ष चौरस फूट नूतनीकरणांचा समावेश आहे
• तंत्रज्ञान, आर्थिक सेवा, अभियांत्रिक आणि उत्पादन क्षेत्रांतील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCCs) भाड्याने देण्याचे प्रमाण सुमारे 70% आहे
• पोर्टफोलिओ ऑक्युपन्सी 90% आहे, मुख्य बाजारपेठा बंगळुरू, मुंबई आणि चेन्नई असून यामध्ये 90% पेक्षा जास्त ऑक्युपन्सी आहे
आर्थिक ठळक बाबी
• कामकाज आणि निव्वळ कामकाज उत्पन्न (NOI) यात वार्षिक 9% वाढीसह अनुक्रमे 1,022 कोटी रु. आणि 829 कोटी रु. झाली
• वार्षिक 13% वाढीसह 559 कोटी रु. किंवा 5.90 रु. प्रति युनिट वितरित केले. 9 महिन्यांत वितरण विक्रमी 1,643 कोटी रु. झाले
• ~7.73% व्याज दरावर 1,000 कोटी रु. कर्ज घेतले आणि व्याज खर्चात सुमारे 70 बेसिस पॉइंट्सची बचत केली
कामकाज आणि विकासाच्या ठळक बाबी
• बंगळुरूमध्ये एम्बसी टेकव्हिलेजमध्ये प्रामुख्याने ग्लोबल बँकिंगसाठी 0.6 मिलियन स्क्वेअर फूट ऑफिस ब्लॉक दिले
• बंगळुरू आणि चेन्नईमध्ये 7.4 मिलियन स्क्वेअर फूट विकास कामकाज मार्गावर असून खर्चावर 19% उत्पन्न अपेक्षित आहे
• हॉटेल पोर्टफोलिओ मजबूत कामगिरी करत असून, वार्षिक EBITDA वाढ 20% आणि ऑक्युपन्सी गेल्या वर्षीच्या 55% वरून 59% पर्यंत वाढली
गुंतवणूकदार साहित्य आणि तिमाही गुंतवणूकदार कॉलचा तपशील
Embassy REIT ने तिमाही निकाल आणि कामगिरीवरील माहितीचे एक पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये (i) 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या संक्षिप्त स्टँडअलोन आणि संक्षिप्त संलग्न आर्थिक निवेदनांचा समावेश आहे (ii) आर्थिक वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाही निकालांचे एक अर्निंग प्रेझेंटेशन, आणि (iii) सप्लिमेंटल ऑपरेटींग आणि आर्थिक डेटा बुक असून ते जागतिक REITs मधील प्रमुख अहवाल देण्याच्या पद्धतीनुसार आहे. हे सर्व साहित्य www.embassyofficeparks.com या आमच्या वेबसाइटच्या Investors विभागात उपलब्ध आहे.Embassy REIT 30 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार 08:15 वाजता आर्थिक वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालावर चर्चा करण्यासाठी एक कॉन्फरन्स कॉल होस्ट करेल. कॉलचा रिप्ले आमच्या www.embassyofficeparks.com वेबसाइटच्या Investors विभागात उपलब्ध असेल.


