Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे नगर वाचन मंदिराचा १७७ वा वर्धापनदिन शुक्रवारी (दि.७)

पुणे नगर वाचन मंदिराचा १७७ वा वर्धापनदिन शुक्रवारी (दि.७)

पुणे : पुणे नगर वाचन मंदिराचा १७७ वा वर्धापन दिन समारंभ शुक्रवार, दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता संपन्न होईल. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे यांनी दिली.

समारंभात कै. आर.एल.नगरकर प्रतिष्ठान पुरस्कृत डॉ. श्री. व्यं. केतकर पुरस्कार हा वाचन चळवळीतील आदर्श कार्यकर्ता पुरस्कार म्हणून लक्ष्मण थोरात यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर, अ‍ॅड. शरद तपस्वी पुरस्कार हा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार म्हणून आशा भट्ट वेलणकर यांना देण्यात येणार आहे. तसेच कवी ह. स. गोखले पुरस्कार हा संत साहित्य विषयक ग्रंथ लेखन पुरस्कार म्हणून डॉ. राहुल देशपांडे यांना प्रदान करण्यात येईल.

तरी वरील बातमीस आपल्या सुप्रसिद्ध दैनिक/ वृत्तवाहिनीवर प्रसिद्धी द्यावी. तसेच कार्यक्रमाला आपला बातमीदार व छायाचित्रकार पाठवावा, ही नम्र विनंती.

* अधिक माहितीसाठी : मो. ७२७६०१७११७

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments