Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिंजेंटा तर्फे नेमाटोड मॅनेजमेंट इन ॲग्रीकल्चर या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न

सिंजेंटा तर्फे नेमाटोड मॅनेजमेंट इन ॲग्रीकल्चर या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न

पुणे,7 फेब्रुवारी 2025 : सिंजेंटा इंडियाने नुकतेच नेमाटोड मॅनेजमेंट इन ॲग्रीकल्चर (पिकातील सुत्रकृमींच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन) या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली. अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमामध्ये देशभरातील 100 हून अधिक कृषी शास्त्रज्ञ उपस्थित होते.या परिषदेमध्ये सुत्रकृमींचा झाडांच्या मुळांवर होणारा प्रादुर्भाव व त्याचे परिणाम,मुळांवर हल्ला करणारे अतिसुक्ष्म कृमी ज्यामुळे वाढ खुंटते, उत्पादकता घटते आणि रोगांची शक्यता वाढते.त्यामुळेच मातीचे आरोग्य जपण्यासाठी,पीक उत्पादकता टिकून ठेवण्यासाठी आणि रसायनांचा वापर कमी करण्यासह नेमाटोडचे व्यवस्थापन गरजेचे असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.

सिंजेंटा इंडियाचे देशातील प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील कुमार म्हणाले की,महत्त्वाच्या संसाधनांचे रक्षण करताना आपल्याला आवश्यक असलेले धान्य पिकविण्याच्या प्रयत्नांमध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे.आमचे तंत्रज्ञान कृषी क्षेत्रातील प्रमुख आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम असून अभिनवतेमुळे उत्पादकतेमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहयोग आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments