Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedडीबीएस फाऊंडेशनने फंडिंगमध्‍ये एसजीडी ५.१ दशलक्षांसह आर्थिक साक्षरता उपक्रम विकसित करण्‍यासाठी हकदर्शकसोबत...

डीबीएस फाऊंडेशनने फंडिंगमध्‍ये एसजीडी ५.१ दशलक्षांसह आर्थिक साक्षरता उपक्रम विकसित करण्‍यासाठी हकदर्शकसोबत केली हातमिळवणी

सुधारित डीबीएस उपक्रम हकदर्शकसोबतच्‍या सुरूवातीच्‍या उद्देश-केंद्रित सहयोगावर आधारित आहे

· भारतातील ५०,००० सूक्ष्‍म उद्योजकांसह ५००,००० लाभार्थींसाठी आर्थिक स्थिरता आणि सामाजिक सुरक्षिततेमध्‍ये सुधारणा करण्‍याचा मनसुबा

भारत, फेब्रुवारी 7, २०२५ – डीबीएस फाऊंडेशनने हकदर्शक एम्‍पॉवरमेंट सोल्‍यूशन्‍स प्रा. लि. (एचईएसपीएल) सोबत सहयोगाने नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे, जो ग्रामीण भारतावर फोकस करण्‍यासोबत आर्थिक समावेशन प्रगत करण्‍यास मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. हा उपक्रम २०२३ मध्‍ये घोषणा करण्‍यात आलेल्‍या डीबीएस बँकेच्‍या मोठ्या कटिबद्धतेचा भाग आहे, जेथे कमी उत्‍पन्‍न असलेल्‍या व वंचित व्‍यक्‍तींचे जीवन आणि उदरनिर्वाहामध्‍ये सुधारणा करण्‍याकरिता पुढील दशकामध्‍ये एसजीडी १ बिलियनचे वाटप करण्‍यात येईल. डीबीएस फाऊंडेशन या उपक्रमाला निधीसाह्य करण्‍यासाठी एसजीडी ५.१ दशलक्ष देईल. या उपक्रमाचे देशभरातील एकूण ५००,००० लाभार्थींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याचे लक्ष्‍य आहे.

भारतातील ग्रामीण भागांमधील व्‍यक्‍तींना अनेकदा आर्थिक सेवा व सामाजिक कल्याण हक्‍कांबद्दल माहिती आणि उपलब्‍धतेचा अभाव यांसारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. डीबीएस-निधीसाह्य उपक्रम अशा व्‍यक्‍तींना आर्थिक संकल्पना आणि उत्पादने समजून घेण्यास मदत करण्यासाठी संसाधने देत, तसेच हकदर्शकच्या एजंट टीमद्वारे समर्थित सामाजिक कल्याण योजनांचा लाभ कसा घ्‍यावा यासाठी साधने आणि सहाय्य प्रदान करत या मोठ्या तफावतींना दूर करतो. हा उपक्रम तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमधील ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करेल.

या उपक्रमाचा भाग म्‍हणून, हकदर्शकच्या महिला एजंट्ससह समर्पित फील्ड टीम्सना डिजिटल आणि आर्थिक साक्षरता प्रशिक्षण सत्रे व पात्रता तपासणी सत्रे आयोजित करण्यासाठी तैनात केले जाईल. या उपक्रमात पात्र लाभार्थ्यांना, विशेषतः महिला, वृद्ध आणि रस्त्यावरील विक्रेते आणि व्यापारी यांसारख्या सूक्ष्‍म उद्योजकांना योग्य सामाजिक कल्याण योजनांमध्ये नोंदणी करण्यास प्राधान्य दिले जाईल. याव्यतिरिक्‍त, आर्थिक फसवणुकीपासून संरक्षण प्रबळ करण्यासाठी सहभागींना घोटाळा-विरोधी जागरूकता प्रशिक्षण दिले जाईल. या सेवांची परिणामकारकता वाढवण्‍यासाठी हकदर्शक योजना कार्ड हे क्‍यूआर कोडेड कार्ड लाभार्थ्यांच्या सामाजिक हक्‍क प्रोफाइलमध्ये ऑनलाइन सहज प्रवेश प्रदान करेल आणि योजनेच्या पात्रतेबद्दल वेळोवेळी माहिती देईल. डीबीएस कर्मचारी त्यांची कर्मचारी स्वयंसेवक चळवळ ‘पीपल ऑफ पर्पज’अंतर्गत या उपक्रमामध्‍ये सक्रियपणे सहभागी होतील, जेथे कन्‍टेन्‍टबाबत जागरूकता वाढेल आणि हकदर्शक टीमसोबत सामुदायिक सत्रे आयोजित केली जातील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments