Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedपूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या प्रवचनाने साधकांना आध्यात्मिक दृष्टिकोनाचा नवा अनुभव* श्रीमद्...

पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या प्रवचनाने साधकांना आध्यात्मिक दृष्टिकोनाचा नवा अनुभव* श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक पूज्य गुरुदेव श्री राकेशजी यांची प्रवचनमाला संपन्न

पुणे : आध्यात्मिक दूरद्रष्टा, जागतिक मानवतावादी आणि श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक पूज्य गुरुदेव श्री राकेशजींच्या प्रेरणादायी आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते. आध्यात्मिक प्रवचनमालेत असंख्य साधकांनी उपस्थित राहून पूज्य गुरुदेवश्रींच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ घेतला. या प्रवचनातून आत्मशोध, मानसिक स्थैर्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग गुरुदेव श्री राकेशजी यांनी सांगितला.

या तीन दिवसीय आध्यात्मिक उत्सवामध्ये फोर्स मोटार्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया, रुणवाल ग्रुपचे फाऊंडर अध्यक्ष सुभाष रुणवाल, जितो अॅपेक्स चेअरमन विजय भंडारी, प्रकाश धारिवाल, राजेश सांकला, विलास पारलेचा, देवेंद्र पीट्टी, कृष्णकुमार बुब, इंदर जैन, मनिष जैन आणि वेगवेगळ्या संघटनाचे तसेच सामाजिक संस्थेचे महानुभव उपस्थित होते.

पूज्य गुरुदेवश्री राकेशजी आपल्या धर्मयात्रांद्वारे जगभरातील साधकांना प्रेरणा देतात, त्यांना आपल्या शहरातच आंतरिक शांती, निःस्वार्थता आणि जीवनाच्या उद्देशाचा नवा दृष्टिकोन अनुभवण्याची संधी प्रदान करतात. आगामी पुणे धर्मयात्रा हाच एक प्रयत्न असून साधकांना आध्यात्मिक सत्य आणि परिवर्तनाच्या साराशी जोडणारा एक अनुभव आहे.

पूज्य गुरुदेवश्री राकेशजी हे एक आत्मज्ञानी गुरू, आध्यात्मिक द्रष्टा, आणि श्रीमद् राजचंद्रजींचे परम भक्त आहेत. ते श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक आहेत ज्याची जगभरातील २०६ युथ केंद्रे, ९६ युथ ग्रुप आणि २५० हून अधिक बाल मूल्य शिक्षण केंद्र आहे. ज्ञानवर्धक प्रवचने आणि ध्यानधारणेतून त्यांनी असंख्य जीवन उजागर केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीमद् राजचंद्र लव्ह अँड केअर प्रोग्राम, संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद सह विशेष सल्लागार दर्जा असलेल्या दहापट उपक्रमाने जगभरातील वंचित समुदायांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे.

श्रीमद् राजचंद्र लव अॅण्ड केअर, श्रीमद् राजचंद्र मिशन, धरमपुर चे पुरस्कृत सामाजिक अभियान आहे. जे समाजाच्या अभावग्रस्त समूहाच्या सेवा मार्फत त्यांचे जीवन आनंदी करण्याच्या हेतूने कार्यरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments