Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedसर्वसमावेश आणि पर्यावरणपूरक ‘पुणे जिल्हा समग्र पर्यटन आराखडा’ तयार करण्याचे जिल्हाधिकारी...

सर्वसमावेश आणि पर्यावरणपूरक ‘पुणे जिल्हा समग्र पर्यटन आराखडा’ तयार करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

पुणे, दि. 7: पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्ले, धार्मिकस्थळे, सांस्कृतिक, क्रीडा, नद्या, वन्यजीव, जैवविविधता, धरणे, कृषी, वन, जल पर्यटन, साहसी खेळ, पक्षी निरीक्षण, परिपयर्टन, ग्रासलँड सफारी आदीबाबींचा सर्वसमावेशक पर्यावरणपूरक ‘पुणे जिल्हा समग्र पर्यटन आराखडा’ तयार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. पयर्टन आराखडा तयार करताना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासह अत्याधुनिक साधनांचा वापर करावा, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित ‘पुणे जिल्हा समग्र पर्यटन आराखडा’ निर्मितीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसरंक्षक महादेव मोहिते, अमोल सातपुते, पर्यटन संचालनालयाच्या पुणे प्रादेशिक उपसंचालक शमा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, पाटंबधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, श्वेता कुऱ्हाडे, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

श्री. डूडी म्हणाले, जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अमूल्य कार्याची ओळख करुन देणारे गडकिल्ले आहेत, या गडकिल्ल्यांकडे देश-विदेशातील पर्यटक आकर्षित करण्याच्यादृष्टीने कामे करावीत. यामध्ये पयर्टकांना आकर्षित करण्यासोबत महसूलात वाढ, स्थानिकांना रोजगार, स्थानिक लोकपंरपरा, साहित्य, कला, संगीत, नाट्य, आदी बाबींचा प्रामुख्याने विचार करुन पयर्टन स्थळांची निवड करण्यात यावी. पयर्टनस्थळावर स्वच्छता राहण्यासोबतच प्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याबाबत कटाक्षाने दक्षता बाळगावी.

पर्यटनस्थळांची व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यासोबत पर्यटकांना पर्यटक मागर्दशक, रस्ते, दिशादर्शक फलके, भोजनालय, निवास व्यवस्था, प्रवास व्यवस्था, दरपत्रके, वैद्यकीय सुविधा आदीबाबत सर्वंकष माहिती ऑनलाईन स्वरुपात मिळणे आवश्यक आहे. याकरीता नामांकित पर्यटक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात पर्यटन महोत्सव आयोजित करण्याबाबत नियोजन करावे, त्यादृष्टीने प्रथम ठिकाण निश्चित करावे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक, पर्यटन क्षेत्राशी निगडित विविध सामाजिक संस्था आदींनाही निमंत्रित करावे. या दृष्टीने पुणे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राची आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडिंगकरिता ‘पुणे जिल्हा समग्र पयर्टन आराखड्याची निर्मिती महत्त्वाची ठरणार आहे. याअनुषंगाने सर्व विभागानी समन्वयानी कामे करावीत, अशा सूचना श्री. डुडी यांनी दिल्या.

****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments