Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिधी वितरणाबाबत संभ्रम न बाळगण्याचे महाज्योतीचे विद्यार्थ्यांना आवाहन

निधी वितरणाबाबत संभ्रम न बाळगण्याचे महाज्योतीचे विद्यार्थ्यांना आवाहन

पुणे, दि. 11 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 25 जुलै 2024 च्या शासन निर्णयान्वये शासनाने पात्र विद्यार्थ्यांना 50% दराने अधिछात्रवृत्ती देण्यास मान्यता प्रदान केलेली होती.

तदनंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पीएच.डी. अधिछात्रवृत्ती-2023 मधील पात्र संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100 टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती मंजुर करण्यास सुधारित मान्यता देण्यात आलेली आहे. या निर्णयानुसार पात्र संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100 टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती अदा करण्याकरिता अंदाजित एकूण 126.14 कोटी निधी लागणार आहे.

ही बाब नव्याने उद्भवलेली असल्याने व मंजूर कृती आराखड्याच्या बाहेरील असल्याने या निधीची मागणी ही महाज्योती कार्यालयाने पूरक मागणीद्वारे शासनाकडे केलेली आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

तसेच योजनेकरिता शासनाने पात्र ठरवलेल्या म्हणजेच 25 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील रक्कम अदा करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. या अनुषंगाने संशोधन प्रगती अहवाल मागविण्यात आलेले असून अहवाल प्राप्त होताच तपासून अधिछात्रवृत्तीची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, तरी निधी वितरणाबाबत विद्यार्थ्यांनी संभ्रम बाळगू नये, असे आवाहन महाज्योतीचे प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments