Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय नमुना पाहणीअंतर्गत कुटुंबांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण

राष्ट्रीय नमुना पाहणीअंतर्गत कुटुंबांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण

पुणे, दि. 12 : भारत सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘कुटूंबाचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या विषयावर सर्वेक्षण होणार असून कुटुंब निवडीची प्रक्रिया, सर्वेक्षणाची महत्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबीय तसेच संबंधित व्यक्तीनी सहकार्य करावे, असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने केले आहे.

या पाहणी अंतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई कार्यालयामार्फत जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत माहिती गोळा करण्यात येत आहे. निवड झालेल्या कुटुंबाकडून मागील 365 दिवसांमध्ये आरोग्यविषयक खर्चाची विस्तृत माहिती गोळा करण्यात येणार आहे. या पाहणीनंतरच्या निष्कर्षामधून केंद्र व राज्य शासनास आरोग्य सेवा सुधारणा व नियोजनासाठी तसेच त्याबाबत धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त माहिती मिळणार आहे.

सदर पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा शासकीय आणि खाजगी रुग्णालयातून मिळणाऱ्या उपचारांवरील खर्च, कुटुंबाचा आरोग्यविषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती जमा करणे हा सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. या सर्वेक्षणांतर्गत कुटुंबाची निवड एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटूंब आणि मागील 365 दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती यामधून करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची असल्याने याबाबत घरभेटीसाठी पाठविण्यात येणाऱ्या पुणे विभागातील सर्व कर्मचारी, अन्वेषक यांना नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नमुना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरीता अंदाजित केले जातील, असे जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक सं.श्री. मरकळे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments