गुरूग्राम, भारत – फेब्रुवारी १०, २०२५: सॅमसंग टीव्ही प्लस या सॅमसंगच्या फ्री अॅड-सपोर्टेड स्ट्रीमिंग टीव्ही (फास्ट) सर्व्हिसने फक्त सॅमसंग टीव्ही प्लस इंडियावर पाच नवीन फास्ट चॅनेल्स लाँच करण्यासाठी वॉर्नर ब्रदर्ससोबत सहयोग केला आहे. हे डब्ल्यूबीटीव्ही चॅनेल्स स्ट्रीमिंग प्रेक्षकांसाठी प्रीमियम कथानकाचे मनोरंजन देतात, तसेच उच्च दर्जाच्या, मोफत मनोरंजनासाठी मागणीची पूर्तता करतात. हिंदी प्रोग्रामिंगवर प्रबळ फोकस देण्यासह हे नवीन फास्ट चॅनेल्स प्रादेशिक व शहरी प्रेक्षकांना मनोरंजन देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
सॅमसंग टीव्ही प्लस मोफत स्ट्रीमिंग सर्विस आहे, जी सॅमसंग स्मार्ट टेलिव्हिजन्समध्ये प्री-इन्स्टॉल केलेली आहे, ज्यामुळे बातम्या, क्रीडा, मनोरंजनासह चॅनेल्सची व्यापक श्रेणी मिळते.
सॅमसंग टीव्ही प्लस इंडियाच्या पार्टनरशीप्स अँड बिझनेस डेव्हलपमेंटचे प्रमुख कुणाल मेहता म्हणाले, “आम्हाला सॅमसंग टीव्ही प्लसमध्ये वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजनचे स्वागत करण्याचा आनंद होत आहे. फास्टमधील लीडर म्हणून आम्ही प्रेक्षकांना उच्च-स्तरीय कन्टेन्टचे मनोरंजन देण्याप्रती कटिबद्ध आहोत. हा सहयोग मनोरंजन निवडींमध्ये वाढ करतो, तसेच प्रेक्षकांना अधिक मूल्य व उपलब्धता आणि जाहिरातदारांना संधी देतो.”
प्रीमियम प्रोग्रामिंगची वैविध्यपूर्ण श्रेणी देत खाली नमूद करण्यात आलेले चॅनेल्स सॅमसंग स्मार्ट टेलिव्हिजन्स आणि मोबाइल डिवाईसेसवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत:
हाऊस ऑफ क्राइम: गुन्हेगारी विश्वाबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्यांसाठी लक्षवेधक गंतव्य, जे हिंदी भाषेत रोमांचक ड्रामा व लक्षवेधक तपासणी सिरीजचे संयोजन देते.
फूडी हब: पाककलांची आवड असलेल्यांसाठी स्वर्ग, ज्यामध्ये लोकप्रिय फूड शोज, रेसिपीज आणि स्वादिष्ट पाककलांचा प्रवास समाविष्ट आहे, जे हिंदीमध्ये सादर केले जातात.
वाइल्ड फ्लिक्स: प्राणी साम्राज्यातील अद्भुत गोष्टींना जाणून घेण्यासाठी लक्षवेधक गेटवे, जे हिंदीमध्ये प्राण्यांच्या जीवनाबाबत रोमांचक माहिती आणि प्राण्यांच्या सुटका करण्याच्या विस्मयकारक कथांना दाखवते.
व्हील वर्ल्ड: ऑटोमोबाइल उत्साहींसाठी उच्च-स्तरीय गंतव्य, ज्यामध्ये उत्साहवर्धक कार व बाइक शोज आणि सर्वोत्तम गॅरेजेसमधील रिस्टोरेशन कथांचा समावेश आहे, ज्या इंग्रजीमध्ये सादर केल्या जातात.
एक्स्ट्रीम जॉब्स: जगातील सर्वात धाडसी व्यवसायांचे रोमांचक एक्स्प्लोरेशन, ज्यामध्ये असाधारण वर्कप्लेसेस् आणि त्यामागील नीडर व्यक्तींबाबत माहिती हिंदीमध्ये सादर केली जाते.
दक्षिण आशियामधील वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरीच्या डिस्ट्रिब्युशनचे प्रमुख रूचीर जैन म्हणाले, “वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीमध्ये आम्ही प्रेक्षकांसाठी वैविध्यपूर्ण आणि उच्च दर्जाच्या मनोरंजनाची निर्मिती करतो. कनेक्टेड टेलिव्हिजन्समध्ये वाढ होत असताना आम्हाला या नवीन चॅनेल्सच्या माध्यमातून सॅमसंग टीव्ही प्लसवर आमची उपस्थिती वाढवण्याचा आनंद होत आहे. सॅमसंग टीव्ही प्लससोबतचा आमचा सहयोग आम्हाला प्रेक्षकांना डब्ल्यूबीटीव्हीचे सर्वोत्तम मनोरंजन देण्यास सक्षम करेल.”


