Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारत फोर्ज आणि व्हीईडीए (Veda Aeronautics) एरोनॉटिक्स (प्रा) लिमिटेडची भागीदारी मानवरहित प्रणालींसाठी...

भारत फोर्ज आणि व्हीईडीए (Veda Aeronautics) एरोनॉटिक्स (प्रा) लिमिटेडची भागीदारी मानवरहित प्रणालींसाठी मेक इन इंडिया कार्यक्रमामध्ये भाग घेणार

बंगलोर (भारत), १३ फेब्रुवारी २०२५: एरोस्पेस आणि तंत्रज्ञानामध्ये जागतिक स्तरावरील आघाडीची भारतीय कंपनी भारत फोर्ज लिमिटेड (बीएफएल) आणि मानवरहित प्रणालींच्या विकास आणि पुरवठा क्षेत्रात कार्यरत भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी व्हीईडीए एरोनॉटिक्स (प्रा) लिमिटेडने (व्हीईडीए) समझोता करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. युद्धाच्या मैदानात वापरली जाणारी अत्याधुनिक मानवरहित हवाई वाहने (युएव्ही) आणि इतर हाय-स्पीड एरियल हत्यार प्रणाली विकसित करण्यासाठी हा समझोता करण्यात आला आहे. व्हीईडीए संरक्षण सेवांसाठी मानवरहित प्रणाली तंत्रज्ञानाला आकार देण्याचे काम करते, तर बीएफएल या मानवरहित प्रणालींमध्ये वापरल्या जाणाऱ्या मायक्रो जेट इंजिन्सचा पुरवठा करेल. हा समझोता भारताच्या संरक्षण क्षमता मजबूत करण्यात आणि एकमेकांच्या क्षमतांचा लाभ घेत राष्ट्रीय आत्मनिर्भरतेमध्ये योगदान देण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल.

भारत फोर्जचे एरोस्पेस डिव्हिजनचे सीईओ श्री गुरु बिस्वाल यांनी सांगितले, “व्हीईडीएसोबत हा समझोता करार ‘आत्मनिर्भर भारतासाठी’ काम करण्याच्या आणि युद्ध तंत्रज्ञानाच्या नव्याने विकसित होत असलेल्या वातावरणामध्ये भारतीय आणि जागतिक आवश्यकतांचे समर्थन करणारी विशिष्ट तंत्रे निर्माण करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रमाण आहे. बीएफएल भारतीय संरक्षण दलांना विकसित मानवरहित प्रणालींना शक्ती प्रदान करण्यासाठी देशात ४०० किलोग्रॅमपर्यंत जेट इंजिन्स विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल. बीएफएलने विकसित केलेली ४० आणि ४५ किलोग्रॅमची इंजिन सिरीयल उत्पादनामध्ये आहेत आणि त्यांचा उपयोग व्हीईडीएमार्फत सर्व संरक्षण प्रोजेक्ट्समध्ये केला जाईल.”

व्हीईडीए एरोनॉटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री दीपेश गुप्ता यांनी सांगितले, “बीएफएल एरोस्पेससोबत आमच्या धोरणात्मक भागीदारीची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. बीएफएल व्हीईडीएल एरोनॉटिक्सच्या सर्व संरक्षण व इतर मानवरहित प्रणाली प्रोजेक्ट्ससाठी छोट्या जेट इंजिन्सचा पुरवठा करेल. आमचा हा प्रयत्न नावीन्याप्रती आमची अतूट बांधिलकी दर्शवतो. दूरवरच्या अंतरासाठी वापरल्या जाणाऱ्या लढाऊ युएव्ही प्रणाली, वेगवान हवाई लक्ष्य आणि मल्टी बॅरल लॉन्च्ड जेट आधारित युएव्ही प्रणालींसाठी एरोस्पेस क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान प्रगती आणि धोरणात्मक कौशल्याच्या एका नव्या युगाची सुरुवात आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments