Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedहर्बलाइफ इंडियाने उगवता क्रिकेट स्‍टार यशस्‍वी जयस्‍वालसोबत केली हातमिळवणी

हर्बलाइफ इंडियाने उगवता क्रिकेट स्‍टार यशस्‍वी जयस्‍वालसोबत केली हातमिळवणी

बेंगळुरू, 14 फेब्रुवारी २०२५: हर्बलाइफ इंडिया या प्रमुख आरोग्‍य व वेलनेस कंपनी, समुदाय व प्‍लॅटफॉर्मने उगवता क्रिकेट स्‍टार यशस्‍वी जयस्‍वालसोबत सहयोगाची घोषणा केली आहे. हा सहयोग भारतातील प्रीमियम स्‍पोर्ट्स न्‍यूट्रिशनच्‍या माध्‍यमातून खेळाडूंची कामगिरी वाढवण्‍याप्रती हर्बलाइफ इंडियाच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.

वर्षानुवर्षे, हर्बलाइफ टॉप अॅथलीट्सची स्थिर समर्थक राहिली आहे, त्‍यांना उल्‍लेखनीय यश संपादित करण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या न्‍यूट्रिशनल टूल्‍ससह पाठिंबा देत आहे. जयस्‍वालसोबतच्‍या सहयोगामधून आरोग्‍य व समुदाय सहभागाला चालना देण्‍यासाठी क्रीडाच्‍या क्षमतेमधील हर्बलाइफचा विश्‍वास दिसून येतो.

उत्तरप्रदेशमधील लहान नगरापासून भारताच्‍या राष्‍ट्रीय क्रिकेट संघापर्यंतचा जयस्‍वालच्‍या प्रेरणादायी प्रवासामधून त्‍याची चिकाटी व समर्पितता दिसून येते. वयाच्‍या अवघ्‍या दहाव्‍या वर्षापासून क्रिकेट करिअरला सुरूवात करत त्‍याने अनेक आव्‍हानांचा सामना केला आहे, ज्‍यामुळे महत्त्वाकांक्षी अॅथलीट्ससाठी आदर्श बनला आहे. या सहयोगामधून स्‍वास्‍थ्‍यासोबत सकारात्‍मक परिवर्तनाला प्रेरित करण्‍यासाठी क्रीडाचा वापर करण्‍याचा संयुक्‍त दृष्टिकोन दिसून येतो.

हर्बलाइफ इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक अजय खन्‍ना म्‍हणाले, “आम्‍हाला यशस्‍वी जयस्‍वालसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे, जो अथक मेहनत व सर्वोत्तमतेचे प्रतीक आहे. त्‍याच्‍या जीवनप्रवासामधून हर्बलाइफमध्‍ये आम्‍ही महत्त्व देत असलेला निर्धार दिसून येतो. आम्‍ही भारतातील आमच्‍या २५व्‍या वर्धापन दिनाला साजरे करत असताना या प्रवासामधून योग्‍य पोषण देत अॅथलीट्सना सक्षम करण्‍यामधील आमचा विकास आणि यश दिसून येते. आमचा विश्‍वास आहे की, आमची विज्ञानाचे पाठबळ असलेली उत्‍पादने व एक्‍स्‍पर्ट सपोर्ट अॅथलीट्सकरिता सर्वोत्तम कामगिरी करण्‍यासाठी आवश्‍यक आहेत. यशस्‍वीसोबत सहयोगाने आमचा भारतभरातील तरूण अॅथलीट्सना त्‍यांची स्‍वप्‍ने साकारण्‍यास आणि स्‍वत:च्‍या आरोग्‍याला प्राधान्‍य देण्‍यास प्रेरित करण्‍याचा मनसुबा आहे.”

यशस्‍वी जयस्‍वाल म्‍हणाला, “मला हर्बलाइफच्‍या पोषण व वेलनेस प्रवासाचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. अॅ‍थलीट्सना सर्वोच्‍च कामगिरी करण्‍यास आणि योग्‍य पोषण मिळणे महत्त्वाचे आहे. मला हर्बलाइफसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. ते न्‍यूट्रिशनल सपोर्ट देण्‍यासोबत एकूण आरोग्‍य उत्तम राखण्‍याला देखील साह्य करते.”

हर्बलाइफ जगभरातील १५० हून अॅथलीट्स, टीम्‍स व लीग्‍जचे प्रायोजकत्व करते, तसेच त्‍यांना त्‍यांच्‍या प्रशिक्षण व स्‍पर्धेच्‍या सर्व टप्‍प्‍यांमध्‍ये दर्जात्‍मक स्‍पोर्ट्स न्‍यूट्रिशन उत्‍पादनांसह साह्य करते. भारतात, हर्बलाइफने स्‍मृती मंधाना, लक्ष्‍य सेन, मनिका बत्रा, मेरी कोम व पलक कोहली यांसारख्‍या क्रिकेट व नॉन-क्रिकेट अॅथलीट्सना पाठिंबा देणे सुरू ठेवले आहे. हर्बलाइफने प्रमुख टीम्‍स व स्‍पोर्टींग इव्‍हेण्‍ट्सना पाठिंबा दिला आहे, जसे २०१६, २०२१ व २०२४ मध्‍ये समर ऑलिम्पिक्‍ससाठी टीम इंडियासोबत ऑफिशियल न्‍यूट्रिशन पार्टनरशीप, २०२२ मध्‍ये कॉमनवेल्‍थ गेम्‍स आणि २०२३ मध्‍ये स्‍पेशल ऑलिम्पिक्‍स भारत. तसेच, हर्बलाइफ सीझन ८ मध्‍ये ७ प्रो कबड्डी टीम्‍ससाठी ऑफिशियल न्‍यूट्रिशन पार्टनर होती आणि २०२२ पासून आयर्नमॅन ७०.३ गोवाची ऑफिशियल प्रेझेन्टिंग स्‍पॉन्‍सर आहे व इतर सहयोग देखील आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments