Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा ऐतिहासिक विक्रम ३६ तासात ६...

पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा ऐतिहासिक विक्रम ३६ तासात ६ अवयव प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पूर्ण

पुणे , पिंपरी १७ फेब्रुवारी २०२५: वैद्यकीय कौशल्य आणि जीव वाचवण्याचे परिश्रम, तत्परता, वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर, तज्ञांचे योगदान आणि रुग्णहितासाद्यतेच्या वचनबद्धतेतून अद्वितीय आणि अभिमानास्पद कामगिरी साध्य करत पिंपरी पुणे येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने केवळ ३६ तासात ६ अवयव प्रत्यारोपण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने २ फुप्फुस प्रत्यारोपण, ३ किडनी प्रत्यारोपण आणि १ यकृत प्रत्यारोपण करून अनेक गंभीर रुग्णांना नवीन जीवन दिले.

अवयवदात्या ही डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ५२ वर्षीय महिला होती जिचा खेडजवळ अपघात झाला. महिला दुचाकीवर मागे बसलेली असताना गतिरोधक ओलांडताना वाहन अस्थिर झाले आणि ती पडली. या अपघातानंतर तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे पुणे पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना मेंदू मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे फुप्फुस, किडनी आणि यकृत दान करण्याचा मोठा निर्णय घेतला तसेच त्यांचे नेत्रदानही करण्यात आले.

याशिवाय, आणखी एका रुग्णालयातून फुप्फुस आणि किडनी उपलब्ध झाले आणि यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आले. तिसरे किडनी प्रत्यारोपण एका जिवंत दात्याच्या अवयवाद्वारे करण्यात आले.

३६ तासांत ६ अवयव प्रत्यारोपण यशस्वीरित्या पूर्ण करणे हे डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उत्कृष्ट वैद्यकीय पायाभूत सुविधा, कुशल शल्यचिकित्सक, अनुभवी भूलतज्ज्ञ आणि दक्ष गहन चिकित्सा तज्ज्ञांच्या समर्पणाचे प्रतीक आहे. यामध्ये परिचारिका, तंत्रज्ञ, प्रत्यारोपण समन्वयक आणि कार्यकारी संघाने अथक परिश्रम घेतले. प्रशासन विभागाने कायदेशीर प्रक्रियेचे अत्यंत चोख नियोजन केले, तर समुपदेशकांनी रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मोलाचे मार्गदर्शन केले.

हा मैलाचा दगड मजबूत आणि सुयोग्य समन्वयाने चालणाऱ्या प्रणालीची ताकद अधोरेखित करतो, जी नेहमीच साधारणपणाच्या पुढे जाण्याच्या दृढ बांधिलकीने प्रेरित आहे. डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) पिंपरी, पुणे, आणि डॉ. यशराज पाटील, विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे यांच्या दूरदर्शी नेतृत्व आणि प्रेरणेने हे यश शक्य झाले, ज्यांच्या सततच्या पाठबळामुळे वैद्यकीय क्षेत्रात नवीन उत्कृष्टतेची मापदंड प्रस्थापित होत आहेत.

डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) पिंपरी, पुणे, यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “हा मैलाचा टप्पा आमच्या वैद्यकीय उत्कृष्टतेच्या आणि संवेदनशील आरोग्यसेवेच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. ३६ तासांत ६ अवयव प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पूर्ण करणे हे आमच्या वैद्यकीय संघाच्या कौशल्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या प्रगत तंत्रज्ञानासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील राहू. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आम्ही दात्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उदारतेबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या या परोपकारी कृतीमुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे आणि हे मानवीयतेचे आणि दयाळूपणाचे जिवंत उदाहरण आहे.”

डॉ. यशराज पाटील, विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाले, “रुग्णालयातील अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कुशल प्रत्यारोपण सर्जन आणि समर्पित क्रिटिकल केअर तज्ज्ञ यांच्या परिश्रमामुळेच या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे यश शक्य झाले. विविध विभागांतील समन्वय जसे की प्रत्यारोपण संघ, भूलतज्ज्ञ, इंटेन्सिव्हिस्ट आणि नर्सिंग स्टाफ यांनी हा मैलाचा टप्पा गाठण्यास मोलाची भूमिका बजावली. आम्ही एका दिवसात अनेक रुग्णांना नवजीवन देऊ शकलो याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे.”

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात आघाडीवर असून, वैद्यकीय उत्कृष्टतेसाठी नवे मापदंड प्रस्थापित करत आहे. अवयवदानाविषयी जागृती निर्माण करणे आणि अधिकाधिक लोकांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करणे यासाठी रुग्णालय सातत्याने प्रयत्नशील आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments