Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedरमणबाग प्रशालेत शिवजयंती निमित्त शिवव्याख्याते मोहन शेटे यांचे व्याख्यान

रमणबाग प्रशालेत शिवजयंती निमित्त शिवव्याख्याते मोहन शेटे यांचे व्याख्यान

.

दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ मंगळवार रोजी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत शिवजयंतीनिमित्त प्रशालेचे माजी शिक्षक, इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रास्ताविकात पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर यांनी शिवचरित्र अभ्यासाचे महत्व सांगितले. मोहन शेटे यांनी “देश मजबूत बनतो तो रणगाडे किंवा तोफांमुळे नव्हे. माणसाच्या मनात आपल्या देशाबद्दल किती प्रेम आहे यावर देशाची ताकद अवलंबून असते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचा आदर्श विद्यार्थ्यांनी ठेवला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र समजून घेतले असे म्हणता येईल.” यावेळी “जय भवानी जय शिवाजी” अशी जोरदार शिवघोषणा विद्यार्थ्यांनी दिली.महेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्र सूत्रसंचालन केले.मुख्याध्यापक चारुता प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दिनविशेष प्रमुख शुभांगी पाखरे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षिका अंजली गोरे तसेच शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments