Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedअनेक समस्या असलेल्या विखंडित जगात प्रगतीपथावर असलेला भारत एक आश्वासक ठिकाण :...

अनेक समस्या असलेल्या विखंडित जगात प्रगतीपथावर असलेला भारत एक आश्वासक ठिकाण : पियुष गोयल एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2025 चे पुण्यात उदघाटन

पुणे, फेब्रुवारी 20, 2025 : विविध देशांमधील चाललेले छोटे-मोठे संघर्ष त्याचबरोबर शाश्वतता,हवामान बदल या सर्व समस्या असलेल्या विखंडित जगात भारत प्रगतीपथावर असून एक आश्वासक ठिकाण आहे,असे मत केंद्रिय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री.पियुष गोयल यांनी येथे व्यक्त केले. भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील हॉटेल जेडब्ल्यू मॅरिएट येथे 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय एशिया इकॉनॉमिक डायलॉग (एईडी) या वार्षिक भू-अर्थशास्त्र परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरूत्थान (इकोनॉमिक रेझिलियन्स ॲन्ड रिसर्जन्स इन ॲन इरा ऑफ फ्रॅगमेंटेशन) या संकल्पनेवर केंद्रित एईडी 2025 मध्ये 9 देशांतील 40 वक्ते तीन दिवसांच्या 12 सत्रांमध्ये सहभागी झाले आहेत.यामध्ये ऑस्ट्रेलिया,इजिप्त,इंडोनेशिया,जपान,नेपाळ,नेदरलँडस,सिंगापूर,साऊथ आफ्रिका आणि श्रीलंका या 9 देशांतील धोरणकर्ते,शिक्षणतज्ञ आणि उद्योगतज्ञ सहभागी झाले आहेत. याप्रसंगी जेष्ठ शास्त्रज्ञ आणि पीआयसीचे अध्यक्ष डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

उद्घाटन सत्रात एशिया इकोनॉमिक डायलॉग 2025 चे संयोजक व चीन व भूतानमधील भारताचे माजी राजदूत व पाकिस्तानमधील भारताचे माजी उच्चायुक्त ॲम्बेसिडर गौतम बंबावाले यांनी केंद्रिय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री.पियुष गोयल यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेतील प्रतिष्ठित तज्ञ आणि लिलीपुट लँड – हाऊस मॉल इज ड्राइव्हिंग इंडियाज मेगा कन्झम्प्शन स्टोरीच्या लेखिका रमा बिजापूरकर यांनी बायोकॉन ग्रुपच्या अध्यक्ष किरण मुजुमदार शॉ यांच्याशी संवाद साधला.

याप्रसंगी बोलताना केंद्रिय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री.पियुष गोयल म्हणाले की,सध्या जगात विविध देशांमध्ये 56 छोटे-मोठे संघर्ष सुरू आहेत,याचा प्रभाव 92 हून अधिक देशांवर होत आहे. प्रत्येक देश आपले विविध मार्ग शोधत असताना वर्ष 2047 पर्यंत विकसित भारतासाठी आपल्याला आपला स्वतंत्र मार्ग शोधावा लागेल.

विविध उपक्रम आणि पुढाकारांचा दाखला देत पियुष गोयल म्हणाले की,बृहद अर्थव्यवस्था घटक,लोककल्याण आणि गुंतवणूक व वापर आधारित विकासावर आम्ही भर दिला आहे.यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळाली आहे.

या तीन दिवसीय परिषदेत आर्थिक विखंडनाच्या गुंतागुंतीच्या काळात लवचिकता आणि पुनरूत्थानासाठी कृतीयोग्य दिशा यावर चर्चासत्र पार पडतील. परिषदेत चर्चा करण्यात येणाऱ्या काही महत्त्वाच्या भू-आर्थिक विषयांमध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता,सायबर सुरक्षा,आफ्रिकेमधील परिवर्तन,ब्ल्यू इकोनॉमी,आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था,सुक्ष्म,लघु,मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि हवामान बदल यांचा समावेश आहे.

या परिषदेत एआय आणि ऑटोमेशनच्या युगात नेतृत्वाची पुर्नकल्पना,आफ्रिकेतील परिवर्तन – मदतीपासून गुंतवणूकीपर्यंत, सर्व्हायवल बिफोर सस्टेनेबिलिटी – ॲन अजेंडा फॉर धिस डेकेड,सायबर विषयांवर सहकार्य – एक आर्थिक आवश्यकता, आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था – आव्हाने आणि सुधारणा, एमएसएमई उद्योगाला सक्षम बनवून सुप्त सामर्थ्य प्रत्यक्षात आणणे आणि ब्ल्यू इकोनॉमी या विषयांवर फायरसाईड चॅटस व सत्रांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments