Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्रीविष्णूंचे अंशावतार' पुस्तक प्रकाशन सोहळा रविवारी (दि.२ मार्च) राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे...

श्रीविष्णूंचे अंशावतार’ पुस्तक प्रकाशन सोहळा रविवारी (दि.२ मार्च) राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची उपस्थिती

पुणे : डॉ. आनंद बर्वे लिखित ‘श्रीविष्णूंचे अंशावतार’ पुस्तक प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता एरंडवण्यातील सेवा भवन येथे होणार आहे. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए.एस.पी. मेडिकल फाउंडेशनच्या संचालिका अनुराधा पाटणकर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू बलकवडे उपस्थित राहणार आहेत.

श्री विष्णूंचे पृथु, यज्ञ, धन्वंतरी, मोहिनी अंशावतार विविध कथांमधून वर्णन केले गेले आहेत. या अवतारांची फारशी माहिती अनेकांना नसते, ही माहिती व्हावी, यासाठी श्री विष्णूंचे अंशावतार पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पृथु, यज्ञ, कपिल, ऋषभदेव, हयग्रीव, धन्वंतरी, मोहिनी, हंस, वेदव्यास या ९ अंशावतारांचे कथा संकीर्तन केले आहे. हरीकथा संकीर्तन व्हावे, या उद्देशाने लेखन केले आहे. यात विविध ग्रंथांमधील संदर्भ वापरले आहेत. काही ठिकाणी मूळ संदर्भ संस्कृत मध्ये दिले आहेत.

—————————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments