पुणे, 3 मार्च 2025: ऑस्ट्रिया स्थित एटीॲन्डएस एजी ही 1.5 अब्ज युरो उलाढालीची व जागतिक पातळीवर आघाडीच्या सब्स्ट्रेट आणि प्रिंटेड सर्किट बोर्ड कंपनीने विविध खंडातील कामकाजासाठी पुणे येथे इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी शेअर्ड सर्व्हिस सेंटर (आयटी एसएससी) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या नवीन केंद्रासह एटीॲन्डएस कंपनीने विविध क्षेत्रातील आपल्या कामकाजासाठी पुणे केंद्रात आयटी सुरक्षा,एसएपी आणि प्रोग्राम डेव्हलपर्स क्षेत्रातील पात्र माहिती तंत्रज्ञान अभियंत्यांसाठी नव्या संधी उघडल्या आहेत.
पुण्यातील एटीॲन्डएस एजीचे हे नवीन ग्लोबल आयटी शेअर्ड सर्व्हिस सेंटर (आयटी एसएससी) ऑस्ट्रिया,चीन,मलेशिया आणि भारतातील समूहाच्या कामकाजासाठी सेवा प्रदान करेल. जागतिक स्तरावर 6 उत्पादन प्रकल्पांना आणि 9 विक्री कार्यालयांना साहाय्य करण्यासाठी 2025-26 पर्यंत पुणे आयटी एसएससी केंद्रात 100 हून अधिक तंत्रज्ञांची नियुक्ती करण्याची समूहाची योजना आहे.
एटीॲन्डएस एजी चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पीटर ग्रिहस्निग म्हणाले की, एटीॲन्डएस म्हणजे प्रगती,नवोन्मेष जगभरातील प्रतिभावान कौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविणारी कंपनी आहे. पुण्यातील आयटी शेअर्ड सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन हे आमच्या जागतिक डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे.भारतातील समृध्द प्रतिभा संपत्ती आणि अभिनवतेची वृत्ती हे आमच्या कामकाजात कार्यक्षमता,चपळता आणि तांत्रिक उत्कृष्टता वाढविण्यासाठी एक आदर्श स्थान बनविते. हे केंद्र आमच्या आयटी क्षमता वाढीसह व्यापक प्रमाणात सहकार्य आणि नाविन्यतेला चालना देईल.
पुण्यातील ग्लोबल आयटी शेअर्ड सर्व्हिस सेंटर हे एटीॲन्डएस समुहाच्या नवीन टार्गेट ऑपरेटिंग मॉडेलचा एक अविभाज्य भाग आहे आणि भारतात उपलब्ध असलेल्या कौशल्यांचा आणि प्रतिभेचा वापर करून उच्च दर्जाच्या आयटी सेवा प्रदान करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली आहे. या पुढाकारासह, एटीॲन्डएस ही कंपनी विविध खंडात सेवा प्रदान करणाऱ्या व भारतात ग्लोबल कॉम्पिटन्स आणि शेअर्ड सर्व्हिस सेंटर्स स्थापित करणाऱ्या व उच्च गुणवत्तेची प्रतिभा व कौशल्याच्या माध्यमातून विश्वासार्ह आयटी सेवा प्रदान करणाऱ्या व अभिनवतेला चालना देणाऱ्या इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या निवडक गटात सामील झाली आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रिया भेटीनंतर हा उपक्रम सुरू झाला आहे.पंतप्रधानांच्या भेटी दरम्यान एटीॲन्डएसच्या उच्च व्यवस्थापनाने विएन्ना येथील फेडरल चान्सलरी येथे त्यांची भेट घेतली होती.
या नवीन ग्लोबल आयटी शेअर्ड सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून गेली 25 वर्षे भारतात एटीॲन्डएस समुहाचा असलेला विस्तार अधिक व्यापक केला आहे. एटीॲन्डएस समुहाचे भारतात म्हैसुरूजवळ नांजनगुड येथे उच्च दर्जाची पीसीबी उत्पादन सुविधा आहे आणि भारतातून हायटेक पीसीबीचा सर्वात मोठी निर्यातदार आहे.या नवीन केंद्राद्वारे एटीॲन्डएस एजी ने उद्योगात लक्षणीय स्पर्धात्मक आघाडी प्राप्त करण्यासाठी मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स पीसीबी उत्पादनातील व्यवसाय कार्यक्षमतेचा दृष्टीकोन पुन्हा परिभाषित केला आहे.
पुणे आयटी एसएससी मधील नवीन टीम एटीॲन्डएसच्या जागतिक स्तरावरील उच्च दर्जाच्या मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंटेड बोर्ड सर्व्हिसच्या निर्मितीमध्ये माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवतील.एसएससी चार उत्कृष्टता केंद्राच्या (सीओई) माध्यमातून कार्यरत आहे,ज्यामध्ये सुरक्षा आणि पायाभूत सुविधा,आयटी ॲप्लिकेशन्स,ऑपरेशन्स तंत्रज्ञान आणि डिजिटल व डेटा चा समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान तज्ञांचे नेतृत्व करणाऱ्या व कामकाजाचे पुढील विस्ताराचे उद्दिष्ट असलेले ए.एस.राघवेंद्र हे या केंद्राचे प्रमुख आहेत.


