Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedवॉल्वो कार इंडियातर्फे नवीन XC90 लॉन्च: वाढीव वैशिष्ट्ये आणि रचनात्मक सुधारणांसह फ्लॅगशिप...

वॉल्वो कार इंडियातर्फे नवीन XC90 लॉन्च: वाढीव वैशिष्ट्ये आणि रचनात्मक सुधारणांसह फ्लॅगशिप एसयूव्ही किंमत रु. 1,02,89,900, डिलिव्हरी मार्च 2025 पासून सुरू

पुणे, 12 मार्च, 2025: वॉल्वो कार इंडियाच्या वतीने आज नवीन XC90 चे अनावरण करण्यात आले. ज्यामुळे लक्झरी एसयूव्हीसाठी एक नाविन्यपूर्ण मापदंड स्थापित झाला. त्याची किंमत रु. 1,02,89,900 (एक्स-शोरूम) नवीन XC90 मध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि रिफाईन डिझाइन घटक संच प्रदर्शित केला आहे. ज्यामुळे पुरस्कार विजेती आणि सर्वाधिक विक्री होणारी फ्लॅगशिप एसयूव्ही आणखी उंचावली. नवी दिल्लीतील स्वीडनच्या दूतावासात हा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महामहिम जान थेस्लेफ आणि वॉल्वो कार इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर ज्योती मल्होत्रा उपस्थित होते.
वॉल्वो कार इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर ज्योती मल्होत्रा म्हणाले, “ही प्रतिष्ठित एसयूव्ही बऱ्याच काळापासून आमच्या यशाचा आधारस्तंभ आहे. आम्ही नवीन XC90 भारतीय बाजारपेठेत आणण्यास उत्सुक आहोत.” ते पुढे म्हणाले, “एसयूव्ही स्वीडिश लक्झरी आणि डिझाइनच्या शिखरावर आहे, वॉल्वो ब्रँडची वैशिष्ट्ये, नाविन्य आणि सुरक्षितता यापुढेही आमच्या उत्पादन श्रेणीत दिसतील. सध्या दाखल केलेले हे वाहन अतुलनीय आराम, प्रशस्तता, अष्टपैलुत्व आणि कार्यक्षमता उपलब्ध करते. त्याची ताजी, समकालीन बाह्य रचना रस्त्यावरील प्रभावी उपस्थिती बळकट करते.”
स्वीडनचे भारतातील राजदूत महामहिम जान थेस्लेफ यांनीही आपले विचार मांडले आणि ते म्हणाले, “भारत आणि स्वीडन यांच्यातील शाश्वत मैत्रीला वाढत्या आर्थिक आणि तांत्रिक संबंधांमुळे तसेच सामायिक तत्त्वांमुळे चालना मिळाली आहे. प्रगत अभियांत्रिकी आणि डिझाइनचा उत्कृष्ट नमुना असलेल्या नवीन वॉल्वो XC90 मध्ये स्वीडनचे विकास आणि नवनिर्मितीसाठीचे समर्पण चमकते. भारतातील या ब्रँडचे यश स्वीडिश गुणवत्तेवर ग्राहकांचा असलेला विश्वास अधोरेखित करते. मला विश्वास आहे की या एसयूव्हीच्या लक्झरी, सुरक्षा आणि कामगिरीच्या अद्वितीय संयोजनामुळे भारतीय ग्राहकांना जोरदार आकर्षण वाटेल.”
सुरक्षित मानकांशी कोणतीही तडजोड नाही
प्रत्येक वॉल्वोप्रमाणेच, नवीन XC90 ही रस्त्यावरील सर्वात सुरक्षित वाहनांपैकी एक म्हणून तयार केली गेली आहे. यात एक मजबूत सुरक्षा पिंजरा (सेफ्टी केज) आणि सक्रिय सुरक्षा तंत्रज्ञानाची सर्वसमावेशक श्रेणी आहे. ज्याद्वारे रहिवाशी आणि रस्त्यावरील इतर वापरकर्त्यांचे संरक्षण सुनिश्चित होते.

नवीन XC90 रडार आणि समोरील कॅमेऱ्याचा वापर करून, अनवधानाने लेन ड्रिफ्ट शोधू शकते. संभाव्य टक्कर रोखून वाहनाला आपोआप त्याच्या लेनमध्ये परत आणू शकते. यात इतर वाहने, पादचारी, सायकलस्वार आणि मोठ्या प्राण्यांचा शोध घेऊ शकणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रतिक्रिया देऊ शकणाऱ्या रन-ऑफरोड मिटीगेशन आणि टक्कर टाळण्याच्या प्रणालींचा देखील समावेश आहे.
आलिशान आराम आणि सुधारणा
नवीन XC 90 अतुलनीय ड्रायव्हिंग अनुभव देते. ज्यात अपवादात्मक आसन आराम आणि सुधारित मानक सस्पेंशन आहे. इंडिव्हीज्यूअल डॅम्पर्स आता वास्तविक-वेळेच्या रस्त्यांच्या परिस्थितीशी यांत्रिकरित्या जुळवून घेतात, आत्मविश्वास आणि आरामदायी प्रवासासाठी आराम आणि स्थिरता दोन्ही देतात.

सक्रिय चेसिसच्या संयोगाने काम करणारी पर्यायी एअर सस्पेंशन प्रणाली, सर्वात आरामदायक प्रवास सुनिश्चित करण्यासाठी वाहन, रस्ता आणि चालकाचे प्रति सेकंद 500 वेळा निरीक्षण करते. ही सिस्टीम राईड हाइट अॅडजस्टमेंट देते. त्यामुळे गाडीची उंची 20 एमएमएने कमी होते आणि एअरो डायनॅमिक सुधारते किंवा आव्हानात्मक प्रदेशात उंची 40 एमएमने वधारते. वाढीव इन्सुलेशनमुळे वारा आणि रस्त्याचा आवाज आणखी कमी होतो. ज्यामुळे केबिनचे शांत वातावरण तयार होते.
आलिशान आणि समजून घेणारी अंतर्गत सजावट
नवीन XC90 ची पुनर्रचित केलेली अंतर्गत सजावट समकालीन स्कॅन्डिनेव्हियन रचना प्रतिबिंबित करते. ज्यात अधिक आडव्या डॅशबोर्डसह प्रीमियम पुनर्वापर केलेल्या सामग्रीचे सजावट पॅनेल आणि नवीन उभ्या एअर व्हेन्ट्स आहेत. वाढीव सभोवतालच्या प्रकाशामुळे विलासी वातावरणात भर पडते.
हायरिझोल्यूशन आणि अद्ययावत वापरकर्ता इंटरफेससह एक नवीन 11.2-इंच केंद्रीय टचस्क्रीन अनेक वैशिष्ट्ये, अॅप्स आणि ओव्हर-द-एअर सॉफ्टवेअर अपडेट अखंड प्रवेश देते.
बाह्य वाढीव सजावट:
● नवीन ग्रील आणि ग्रील आयर्न मार्क
● नवीन फ्रंट बंपर आणि स्कल्प्टेड हूड
● नवीन फ्रंट फेंडर्स आणि 20 इंची चाकं
● नवीन बाह्य रंग: मलबेरी रेड
● डोळ्याला सुधारणा लक्षात येईल असे अद्ययावत रियर लॅम्प सोबत गडद डिझाईन
● नवीन स्लिम सिग्नेचर टी आकाराचे हेडलाईट सोबत मॅट्रिक्स्-डिझाइन एलईडी टेक्नॉलॉजी
● सुधारित आरामदायक चेसिस् सोबत एफएडडी डॅम्पर टेक्नॉलॉजी

अंतर्गत वाढीव सजावट:
● नवीन अपहोलस्ट्री आणि सजावट
● डेकोर इनलेजचा नवीन आकार
● नवीन 11.2-इंच (28.44 सेमी) सेंटर डिस्प्ले सोबत नवीन युजर इंटरफेस
● नवीन सेकंड-रो कॅप्टन सीट आर्मरेस्ट सोबत सुधारित कपहोल्डर
● इन्स्ट्रुमेंट पॅनेल आणि डोअर पॅनेलसाठी नवीन बोवर्स आणि विल्किन्स स्पीकर मेश
● नवीन व्हर्टीकल एअर ब्लेड वेंट डिझाइन
● सजावटीच्या इनलेसाठी नवीन आतील लाइट गाईड
● नवीन 2+1 कपहोल्डरसह नवीन अनुरूप टनल कन्सोल टॉप
● सुधारित साऊंड इन्सुलेशन
● नवीन आयर्न मार्कसह अद्ययावत स्टीयरिंग व्हील
● नवीन क्रोम इनसर्टसह अद्ययावत इन्स्ट्रुमेंट पॅनेल आणि डोअर पॅनेल
● इंटीरियर इल्यूमिनेशन स्टँडर्ड सर्वोच्च पातळी
● सुधारित वायरलेस फोन चार्जर
● स्प्लिट स्क्रीनसह सुधारित 360° कॅमेरा

प्रमुख वैशिष्ट्ये: XC 90 बी5 अल्ट्रा (पेट्रोल माइल्ड-हायब्रिड)
● क्षमता: 1969 सीसी
● किमान आऊटपूट: 250 एचपी
● कमाल आऊटपूट: 360 एनएम
● स्वयंचलित 8-स्पीड एडब्ल्यूडी
● प्रगत एअर क्लीनर (4 झोन) सोबत पीएम 2.5 सेन्सर
● गूगल सेवांसह अँड्रॉइड-संचालित इन्फोटेनमेंट प्रणाली
● अॅपल कारप्ले (वायर्ड)
● बोवर्स आणि विल्किन्स प्रीमियम साउंड (1410 डब्ल्यू, 19 स्पीकर्स)
● अनुकूल क्रूझ कंट्रोल आणि पायलट असिस्टंट
● लेन कीपिंग एड आणि ब्लाइंड स्पॉट इन्फॉर्मेशन सिस्टीम विथ क्रॉस ट्रॅफिक अलर्ट
● टक्कर नियंत्रित करणारे साह्य (पुढून आणि मागून)
● 360-डिग्री कॅमेरा आणि पार्किंग साह्य (पुढून, मागून आणि बाजूने)
● वॉल्वो कार्स अॅप आणि ग्राफिकल हेड-अप डिस्प्ले
● वेंटिलेटेड मसाज फ्रंट सीट्स आणि नप्पा लेदर अपहोलस्ट्री
● एअर ससपेन्शन आणि नवीन 11.2-इंच (28.44 सेमी) फ्रेमलेस स्क्रिन

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments