Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील फेस्टिव्हल ऑफ ऑस्ट्रेलियामध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण आणि दर्जेदार एफअँडबी उत्पादनांचे ऑस्ट्रेलियाकडून...

पुण्यातील फेस्टिव्हल ऑफ ऑस्ट्रेलियामध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण आणि दर्जेदार एफअँडबी उत्पादनांचे ऑस्ट्रेलियाकडून प्रदर्शन

पुणे, १६ मार्च २०२५: ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन (ऑस्ट्रेड)कडून ऑस्ट्रेलियातील जागतिक दर्जाचे शिक्षण आणि दर्जेदार खाद्यपदार्थांचा गौरव करताना आपल्या चार शहरांच्या “फेस्टिव्हल ऑफ ऑस्ट्रेलिया”च्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले.

या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात चेन्नई आणि पुण्यात झाली असून त्यात उत्तम दर्जाची ऑस्ट्रेलियन विद्यापीठे आणि रिटेल भागीदार एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.

पुण्यापाठोपाठ या महोत्सवाचे आयोजन अहमदाबाद (२० मार्च) आणि नवी दिल्ली (२२ मार्च) येथे केले जाईल.

पुण्यातील प्रदर्शनात भारतीय विद्यार्थी आणि पालकांना ऑस्ट्रेलियन विद्यापीठांशी थेट संवाद साधून आपल्या शैक्षणिक व करियरविषयी महत्त्वाकांक्षांना पाठबळ देणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती घेण्याची अमूल्य संधी मिळाली.

संभाव्य विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा भाग म्हणून आयोजित खालील मास्टरक्लासेसमध्ये उपस्थित राहून ऑस्ट्रेलियन शिक्षणाबाबत माहिती घेता आली:

बांधकाम क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) वरील शैक्षणिक मास्टरक्लास– तुम्ही आमूलाग्र बदलांसाठी सज्ज आहात का? स्कूल ऑफ बिल्ट एन्व्हायर्नमेंट, यूएनएसडब्ल्यू सिडनीमधील प्रोफेसर केनेथ ताक विंग यू यांचे सादरीकरण.

इनसाइट मास्टरक्लास ऑफन फ्युचर रेडी: प्रेरक वक्त्या श्रीमती मानसी अग्रवाल यांचे करियर व व्यवसाय वाढीसाठी अतिरिक्त कौशल्याची ताकद या विषयावर सादरीकरण

ईटीएस इंडियाच्या पार्टनरशिप अँड युनिव्हर्सिटी रिलेशन्समधील वरिष्ठ व्यवस्थापक श्रीमती सारिका बालचंदानी यांचे ऑस्ट्रेलिया एज्युकेशन इकोसिस्टिममध्ये मार्ग काढणे आणि टोफलची भूमिका या विषयावरील माहितीपूर्ण मास्टरक्लास.

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे दक्षिण आशियाचे प्रादेशिक प्रमुख श्री. ऋत्विक पुंगलिया यांच्याशी संवाद.

या महोत्सवात मध, पोषक बार्स, सॉसेस, चीज, पास्ता, सीफूड आणि लॅम्ब यांच्यासह उत्तम दर्जाचे अन्नपदार्थही प्रदर्शनात मांडण्यात आले होते.

ऑस्ट्रेडने आपल्या ई-वाणिज्य व्यासपीठावर ‘ऑस्ट्रेलिया पॅव्हिलियन’ स्थापित करण्यासाठी जिओमार्टसोबत व फूड पॅव्हिलियनमध्ये विविध अन्नपदार्थ प्रदर्शित करण्यासाठी पुण्यातील रिटेलर दोराबजी यांच्यासोबत भागीदारी केली.

महोत्सवातील लाइव्ह कुकिंगच्या प्रदर्शनातून पाहुण्यांना उत्तम दर्जाची ऑस्ट्रेलियन सामग्री वापरून चविष्ट खाद्यपदार्थांची चव घेण्याची संधी मिळाली आणि देशातील सर्वोत्तम खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता आला.

या महोत्सवाबाबत बोलताना ऑस्ट्रेडच्या दक्षिण आशियातील व्यापार आणि गुंतवणूक आयुक्त श्रीमती मेरी ओव्हरिंग्टन म्हणाल्या की, “आम्हाला महोत्सवाच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन करून शिक्षण व खाद्यपदार्थांमधील ऑस्ट्रेलियाची सर्वोत्तमता प्रदर्शित करताना खूप आनंद झाला आहे. या कार्यक्रमातून आम्ही भारतीय विद्यार्थी, कुटुंबं आणि खाद्यपदार्थांच्या चाहत्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला उत्तम दर्जाचे शिक्षण व चविष्ट अनुभवांसाठी प्रस्थापित करण्यासाठी जागरूकता वाढवून नवीन संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये ऑस्ट्रेलियन उत्पादनांचे वाढते अस्तित्व उत्तम दर्जाच्या साहित्याच्या वाढत्या मागणीचे प्रतीक आहे.”

ऑस्ट्रेलिया आणि भारताचे शैक्षणिक संबंध मागील काही वर्षांत आणखी खोलवर रूजले आहेत. त्यातून मजबूत आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित होऊ लागले आहेत. फेस्टिव्हल ऑफ ऑस्ट्रेलियामधून भारतात ऑस्ट्रेलियाचे अस्तित्व मजबूत होईल आणि आंतर सांस्कृतिक सहयोग व समन्वयाची वचनबद्धता साजरी केली जाईल.

ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशनबाबत

ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन (ऑस्ट्रेड) ही ऑस्ट्रेलियन सरकारी व्यापार प्रसार आणि गुंतवणूक आकर्षित करणारी आस्थापना आहे. आम्ही ऑस्ट्रेलियाची भरभराट वाढवण्यासाठी उत्तम दर्जाचा व्यापार आणि गुंतवणूक सेवा उद्योगांना देतो. आम्ही हे बाजाराबाबत माहिती निर्माण करणे आणि पुरवणे, ऑस्ट्रेलियन क्षमतेचा प्रसार करणे आणि आमच्या व्यापर जागतिक नेटवर्कद्वारे कनेक्शन्स जोडणे यातून साध्य करतो. आम्ही आपल्याला कशाप्रकारे मदत करू शकतो हे जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या: www.international.austrade.gov.au

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments