पुणे, 20 मार्च 2025: भारतातील लक्झरी वॉचेसचे सर्वात जुने विक्रेते सीटी पुंडोल अँड सन्स यांनी जागतिक किर्तीचे स्विस घड्याळ उत्पादक ओमेगा वॉचेस यांच्या सहकार्याने पुण्यातील पूना गोल्फ कोर्स येथे 21 मार्च 2025 रोजी एका खास व प्रतिष्ठेच्या गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
1909 पासून घड्याळ उद्योगात अग्रेसर असलेल्या सीटी पुंडोल अँड सन्स यांनी विशेष करून आयोजित केलेल्या या स्पर्धेत 100 हून अधिक अव्वल गोल्फ पटू सहभागी होणार असून स्पर्धात्मकता, खिलाडूवृत्ती आणि एक सुरेख अनुभव अशा सर्वच दृष्टीने हि स्पर्धा संस्मरणीय ठरणार आहे.
या स्पर्धेला दुपारी 12.30प्रारंभ होणार असून पूना गोल्फ कोर्सच्या अत्यंत रेखीव व निसर्ग सुंदर अशा सर्व 18 होल साठी हे स्पर्धक आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेचा समारोप त्याच दिवशी सायंकाळी होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभाने होणार असून या प्रसंगी ओमेगाचे वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी पार्थप्रतिम मुखर्जी, रामकृष्ण अय्यर व शिवम साहू यांच्यासह सीटी पुंडोल अँड सन्सचे कावस पुंडोल, होर्मुझ पुंडोल आणि अविवा पुंडोल हे संचालक उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी स्पर्धेची अधिक माहिती देताना कावस पुंडोल म्हणाले की, या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी ओमेगा वॉचेस याच्यासारखे जागतिक किर्तीचे भागीदार मिळाल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला असून ओमेगा घड्याळांची आधुनिकता व वैशिष्ट्ये यांच्याशी गोल्फ या खेळाची प्रतिष्ठा व शान हे अतिशय मिळेतजुळते आहेत, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच ही स्पर्धा म्हणजे खेळातील कौशल्याबरोबरच प्रतिष्ठा आणि शानदार जीवन शैली यांचा एक अनोखा संगमच ठरणार आहे.
ते पुढे म्हणाले की, घड्याळाच्या प्रत्येक उत्पादनाबरोबरच प्रत्येक उपक्रम आणि स्पर्धा यांचा एक आगळा वेगळा अनुभव ग्राहकांना मिळावा यासाठी सीटी पुंडोल अँड सन्स हे कायमच प्रयत्नशील असतात, हे या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे. सीटी पुंडोल अँड सन्स हे नेहेमीच पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा संगम साधत असतात.
सीटी पुंडोल अँड सन्स यांनी आपल्या सर्व उत्पादनांमध्ये अचूकता आणि ऐश्वर्य यांचे मिश्रण साधले असून जागतिक किर्तीच्या प्रतिष्ठित ब्रँडच्या विविध मॉडेलच्या लक्झरी वॉचेसची विक्री करणारे हे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. पुंडोल परिवाराने चालवलेला हा व्यवसाय पुण्यात अत्यंत लोकप्रिय ठरला असून संपूर्ण विश्वासार्हता वैयक्तिक सेवा, ग्राहकांच्या मागणी प्रमाणे उत्पादने आणि सर्व घड्याळांसाठी विक्री पश्चात सेवा यामुळे सीटी पुंडोल अँड सन्स यांनी लक्झरी वॉचेसच्या शौकिनांमध्ये एक विश्वासाचे आणि प्रतिष्ठेचे स्थान निर्माण
केले आहे.


