Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्वालिटी वॉल्सकडून भारतात उन्हाळ्यासाठी खास ट्विस्टर या जागतिक ब्रँडचे अनावरण  ~ट्विस्टर...

क्वालिटी वॉल्सकडून भारतात उन्हाळ्यासाठी खास ट्विस्टर या जागतिक ब्रँडचे अनावरण  ~ट्विस्टर ही एक धमाल तीन स्तरांची स्टिक असून त्यात उन्हाळ्यासाठी दोन विशेष फ्लेवर्स आणले आहेत ~

 

 

राष्ट्रीय, २६ मार् २०२५: आपल्या खास आइसक्रीम आणि फ्रोजन डेझर्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या क्वालिटी वॉल्सने मागच्या १०० वर्षांपासून आनंदाची पखरण करण्याच्या वारशासह भारतात आपल्या नवीन ट्विस्टर ब्रँडची घोषणा केली आहे. आपल्या खास तीन स्तरांच्या स्टिक डिझाइनसाठी लोकप्रिय असलेली ट्विस्टर ताजेपणात एक अद्वितीय ट्विस्ट आणते आणि प्रत्येक घासासोबत जिभेला तृप्ती देते.

 

युनिलिव्हरच्या पोर्टफोलिओमधील ट्विस्टर हा एक विशेष ब्रँड असून ते २५ देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेले उन्हाळ्यासाठीचे आइस्क्रीम आहे. कडकडीत भारतीयांची उन्हाळ्यात ताजेतवाने करण्याचा आनंद देणाऱ्या आइस्क्रीमची गरज ओळखून क्वालिटी वॉल्स दोन आकर्षक प्रकारांमध्ये आपला नवीन ट्विस्टर आणत आहे. ट्विस्टर मँगो– आंबा आणि क्रिमी व्हॅनिला यांच्या स्वर्ल्स आणि त्यासोबत स्ट्रॉबेरी कोन आणि ट्विस्टर पायनॅपल– क्रिमी पायनॅपल आणि आंबट लिंबाच्या स्वर्ल्स चविष्ट स्ट्रॉबेरी कोनसोबत येणार आहेत.

‘वेगळ्या चवीचा आनंद घेऊन गारेगार होऊ इच्छिणाऱ्या तरूण भारतीयांसाठी ट्विस्टर तयार करण्यात आले आहे. ते खऱ्या फळांच्या रसांनी आणि तीन स्तरांच्या चवीने सज्ज आहे. ही धमाल स्टिक प्रत्येक घासात एक वेगळी अनुभूती देते. प्रत्येक स्टिकमध्ये ६५ कॅलरीपेक्षाही कमी असून त्याची विशेष रचना तरूण ग्राहकांना आनंद देण्यासाठी केली गेली आहे.

उन्हाळ्यातील आनंदात भर घालताना क्वालिटी वॉल्स भारतात एक आगळावेगळी जाहिरात मोहीम आणत आहे. त्यात ग्राहकांना ’३० लाख मोफत आइस कँडीज’ मधून निवडण्याची संधी मिळेल. ही खास ऑफर भारतात १ लाखांपेक्षा अधिक स्टोअर्समध्ये रिडीम करता येईल.

क्वालिटी वॉल्सने अलीकडेच ट्विस्टरसाठी एक नवीन मल्टीमीडिया कॅम्पेन सुरू केली आहे. त्यातून त्यांनी या उन्हाळ्यात ताजेतवाने करणारे ट्विस्टर वर्ल्ड समोर आणले आहे. याशिवाय, एक धमाल आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरणारी जाहिरात या ऑफरबाबत ग्राहकांना माहिती करून देण्यासाठी आणली जाईल.

एचयूएलचे आइसक्रीम बिझनेस प्रमुख टोलोथी टँरिग्ली म्हणाले की,“आम्हाला आमचा जागतिक ब्रँड ट्विस्टर दोन आकर्षक आणि ताजेतवाने करणाऱ्या चवींमध्ये आणताना खूप आनंद होत आहे. रिफ्रेशमेंट्स ही एक मोठी श्रेणी असून त्यातील उलाढाल सुमारे ६.६. अब्ज युरो** आहे आणि भारतातील प्रचंड उन्हाळ्यात ग्राहकांना नवनवीन आणि आकर्षक रिफ्रेशमेंटचे पर्याय हवे असतात. युनिलिव्हरच्या पोर्टफोलिओमधील सर्वाधिक विकला जाणारा आणि जागतिक आवडीचा ब्रँड म्हणून आमचे भारतातील ध्येय तरूण ग्राहकांना आनंद देणारी एक चविष्ट ट्रीट देण्याचे आणि त्यांचा उन्हाळ्याचा अनुभव धमाल करण्याचे आहे. आमची उन्हाळ्यासाठीची खास जाहिरात भारतीयांचा अनुभव आणखी चांगला करेल यात शंका नाही.”

डीडीबी मुद्रा ग्रुपचे मुख्य कलात्मक अधिकारी आणि कार्यकारी संचालक राहुल मॅथ्यू म्हणाले की, “क्वालिटी वॉलच्या ट्विस्टरसह आम्हाला ताजेतवाने होण्याचा आनंद टिपायचा होता. ही जाहिरात अत्यंत धमाल आहे- अशी मजा जी तुम्हाला सर्व काही विसरून फक्त त्या क्षणाचा आस्वाद घेण्यास भाग पाडते. फिरती दृश्ये आणि प्रचंड ऊर्जा चविष्ट स्वर्ल प्रतिबिंबित करते. त्यामुळे हा अनुभव स्वादिष्ट आणि आनंददायी ठरतो.”

भारतात नवीन ट्विस्टरचे अनावरण हा क्वालिटी वॉल्ससाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपले नावीन्यपूर्ण डिझाइन आणि दर्जाप्रति वचनबद्धता यांच्यामुळे उन्हाळ्यात तो आवडीचा ठरेल हे निश्चित.

ब्रँड फिल्मसाठी लिंक्स:

“लाओ लाइफ में ट्विस्ट” – https://www.youtube.com/embed/-0HgtLBWsOU?feature=oembed

उन्हाळ्याची जाहिरात – https://www.youtube.com/embed/Zo0Ay_FW89U?feature=oembed

 

क्वालिटी वॉल्सबाबत

क्वालिटी वॉल्स हा हिंदुस्तान युनिलिव्हरचा ख्यातनाम ब्रँड असून तो आनंदाची पखरण करण्यासाठी वचनबद्ध आहे. क्वालिटी वॉल्स आपल्या चविष्ट व नावीन्यपूर्ण आइस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्ट्सच्या विविध श्रेणींसह अनेक दशकांपासून ग्राहकांना आनंद देत आहे. भारतभरात क्वालिटी वॉल्सचे अस्तित्व उत्तम असून तो आठवणींना उजाळा देणारी मेजवानी किंवा चवींचा आनंद अशा सर्व प्रकारे लोकांना एकत्र आणतो.

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडबाबत

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) ही भारतातील सर्वांत मोठी फास्ट मूव्हिंग ग्राहक उत्पादन कंपनी असून देशातील दहापैकी नऊ घरांत तिची उत्पादने वापरली जातात. दररोज एका चांगल्या भविष्याच्या निर्मितीसाठी एचयूएल कार्यरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments