जगातील सर्व अमूल्य संपत्तीची पेक्षा सर्वात महत्वाची संपत्ती हे आपले आरोग्य आहे. त्यामुळे इतर संपत्तीचा उपभोग घ्यायचा असेल तर आपल्या आरोग्याची सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे”. त्यासाठी आपले आरोग्य वेळोवेळी तपासणे व नियमितपणे डॉक्टरांना भेटणे देखील महत्वाचे आहे. अशा प्रकारची दक्षता घेतल्याने आपला सर्वात अमूल्य ठेवा आपले आरोग्य सुरक्षित ठेवता येते.
नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते, त्यामुळे कोणत्याही आजाराचे लवकरात लवकर निदान होऊ शकते व त्यापासून पुढे होणारे धोके टाळता येऊ शकतात. आरोग्य तपासणी कडे दुर्लक्ष केल्याने अनेक व्याधींचा सामना करावा लागू शकतो. तरुण वयापासून दुर्लक्ष झाल्यास नंतर होणारे परिणाम कठीण असतात.
नियमित आरोग्य तपासणीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि निरोगी आयुष्याला प्रोत्साहन देण्यासाठी, ओएनपी लीला हॉस्पिटलतर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर आणि बालरोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे ज्यामध्ये डॉ.अविनाश फडणीस, डॉ. अमिता फडणीस, डॉ. केदार मराठे, डॉ. नीना साठे आणि डॉ. भाग्यश्री लहाने यांचा समावेश आहे.
या मोफत शिबिरात खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे
बालरोग शिबिरात दर शुक्रवारी लसीसाठी १०% सूट
दर शुक्रवारी सकाळी ९.०० ते दुपारी १०.०० वाजता बालरोग ओपीडी मोफत
• मुलांची वैद्यकीय आरोग्य तपासणी (०-१४ वर्षे)
• लसीकरण समुपदेशन
• बाल संगोपन समुपदेशन
• वाढ आणि पोषण
• क्रॉनिक डिसीज़ मॅनेजमेंट , एनडोक्राइन डिसॉर्डर्स, प्रेवेंटिव केअ र,
श्वसन समस्या, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या
• न्यूरोलॉजिकल समस्या, मानसिक आरोग्य
• मूत्रपिंड आणि मूत्र समस्या
• आरोग्य देखभाल
• ऍलर्जी : प्रतिक्रियांचे व्यवस्थापन
• संक्रमण


