Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे सेलेस्टिया २०२५ अभिनव उपक्रम ४ रोजी विश्वरूप दर्शन आर्यभट्ट...

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे सेलेस्टिया २०२५ अभिनव उपक्रम ४ रोजी विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळेद्वारे विश्व तुमच्या दारी  खगोलशास्त्रातील रस असणार्‍या प्रेक्षकांना, संशोधकांना मेजवानी

 

 

पुणे, दि.१ एप्रिल : खगोलशास्त्रात रस असणार्‍या प्रेक्षक, संशोधक आणि सर्वसामान्यांना अद्वितीय अनुभव देण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागाच्या कॉसमॉस अ‍ॅस्ट्रॉनाॅमी क्लबच्या वतिने सेलेस्टिया२०२५ हा अभिनव उपक्रम दि.४ एप्रिल रोजी दुपारी १.००वा.च्या पुढे एमआयटी डब्ल्यूपीयूच्या परिसरात राबविण्यात येत आहे. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस व प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विज्ञानाच्या जिज्ञासेला आणि खगोलशास्त्रीय संशोधनाला चालना देण्यासाठी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी “विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळा“ स्थापन केली आहे. या कार्याला पुढे नेण्यासाठी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांचे विशेष योगदान आहे.

सेलेस्टिया २०२५ याच्या माध्यमातून नागरिक अत्याधुनिक दुर्बिणीतून विश्वाचा अनुभव घेऊ शकतील. तसेच, सूर्याचे निरीक्षण सत्रे असतील. दुर्बिणीतून सूर्यावरील डाग (सनस्पॉट्स) दाखवले जातील. तसेच प्रदर्शन स्टॉलवर आम्ही काढलेली खगोलीय छायाचित्रे आणि उपग्रहांची प्रतिमा प्रदर्शित केली जातील. विद्यार्थी खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि अंतराळविज्ञान या विविध विषयांवर पोस्टर सादर करतील. माजी उपजिल्हाधिकारी व खगोलशास्त्रातील रस असलेले दत्ता देवगावंकर हे “खगोलशास्त्र लोकांपर्यंत पोहोचवणे“ यावर विचार मांडतील.

नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी — टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च चे विशिष्ट प्रा. डॉ. यशवंत गुप्ता हे “रेडिओ डोळ्यांनी विश्वाचा शोध“ यावर माहिती देतील. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स चे वरिष्ठ संशोधक LIGO-India  सह गुरुत्वाकर्षण लहरींच्या खगोलशास्त्राचे भविष्य“ यावर बोलणार आहेत, या नंतर वेधशाळेत आकाश प्रदर्शन आणि तारे निरीक्षण सत्रे आहे ज्यात गहन आकाश आणि ग्रहांचे निरीक्षण समाविष्ट असेल.

 

सेलेस्टियाचा मुख्य उद्देश जिज्ञासा जागृत करणे, वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि अंतराळातील आश्चर्य समुदायापर्यंत पोहोचवणे हा आहे.

तसेच, १८ एप्रिल रोजी एचएएम रेडिओ प्रात्यक्षिक आणि पुरातन रेडिओचे प्रदर्शनीचे आयोजीत केली आहेे. हे असे तंत्रज्ञान आहे जे शोध-बचाव, रहदारी नियंत्रण आणि इतर समुदाय कार्यक्रमांसारख्या उपक्रमांना मदत करते. नैसर्गिक आपत्ती, सार्वजनिक आणीबाणी किंवा इतर परिस्थितीत जेथे पारंपारिक संप्रेषण प्रणाली अयशस्वी होते, तेथे एचएएम रेडिओ महत्त्वाची भूमिका बजावते. यावेळी एचएएम रेडिओ ऑपरेटर दत्ता देवगावंकर हे रेडिओ संप्रेषणाच्या मूलभूत गोष्टींसह एचएएम रेडिओ तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. तसेच देवगांवकर यांच्या मालकीच्या पुरातन रेडिओ संचांचे प्रदर्शनही पाहावयास मिळेल.

आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. अनुप काळे, डॉ. प्रसाद जोगळेकर, प्रा. अनघा कर्णे व विद्यार्थी ओजस धुमाळ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments