पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी) दिनांक ८ नोव्हेंबर २०२६:- महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णासाहेब दादू बनसोडे आणि प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक सिद्धार्थ अण्णासाहेब बनसोडे यांच्या सौजन्याने अखिल पिंपरी-चिंचवड कलामंचच्या वतीने दिवाळी पहाट, सांस्कृतिक कार्यक्रम व फराळ वाटपाचे आयोजन(दि.८)करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रथमच शहरातील स्थानिक कलाकारांनी एकत्र येत विविध कलांचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्राची लोकधारा, अभंग, भक्तिगीते, भावगीते, हिंदी व मराठी गाणी, लावणी, लोकगीते आणि काव्यरचना अशा विविध कलाप्रकारांतून महाराष्ट्राच्या समृद्ध कला-संस्कृतीचे दर्शन घडले.
या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष मा. अण्णा दादू बनसोडे साहेब आणि सिद्धार्थ भाऊ अण्णा बनसोडे यांच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील कलाकारांसाठी दिवाळी पहाट, सांस्कृतिक कार्यक्रम व फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुज्जफर इनामदार पत्रकार, चंद्रकांत पवार आंतरराष्ट्रीय गायक, राजेंद्र जगताप (राष्ट्रवादी नेते), सूर्यकांत पवार चित्रपट निर्माते आणि पुरुषोत्तम हिंगणकर महाराज कीर्तनकार हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.या कार्यक्रमामध्ये स्थानिक कलाकारांनी गायन, वादन, लावणी आणि महाराष्ट्राची समृद्ध लोकधारा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आपल्या महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीचे सुंदर दर्शन या कार्यक्रमातून घडले.
यावेळी भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे म्हणाल्या की, अण्णा दादू बनसोडे साहेब यांचे विशेष आभार व्यक्त करते.कारण पिंपरी-चिंचवडमधील कलाकारांच्या पाठीशी ते नेहमीच खंबीरपणे उभे राहतात. कलाकारांना प्रोत्साहन देणे, त्यांना संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कलाविश्वाला बळ देणे यासाठी त्यांचे सातत्याने सहकार्य लाभत आहे. त्यामुळे ते अखिल पिंपरी चिंचवड कलामंचचे एक महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.तसेच या कार्यक्रमासाठी अत्यंत कमी वेळात हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉल्फिन्स गार्डन स्टुडिओ सांगवी हॉलचे सर्वेसर्वा श्री. राज सोमवंशी साहेब व त्यांच्या टीमचेही विशेष आभार व्यक्त करते.या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना एकत्र आणणे, त्यांच्या कलागुणांची ओळख निर्माण करून देणे आणि त्यांना पुढील काळात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
आज अनेक कलाकारांकडे कला आहे, गुणवत्ता आहे; मात्र त्यांना योग्य व्यासपीठ आणि संधी मिळण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक कलाकारांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्या कलेला योग्य सन्मान आणि ओळख मिळवून देण्यासाठी अखिल पिंपरी चिंचवड कलामंच यापुढेही सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास घेवारे यांनी व्यक्त केला.
गायन क्षेत्रात विद्या गायकवाड नढे, गायत्री साळवे, अशोक टाकळे, मनीषा इंगोले, जगन्नाथ खाडे, शेखर चांदणे, अमित देशमाने, प्रतीक सत्वाधीर, रेखा दुसाने, कोमल भोसले, सागर डाडर, संतोष माहेश्वरी, प्रमोद कुलकर्णी, सविता कोरडे, कविता तळेकर, मनीषा सपकाळे, सुरेखा कुलाल यांनी आपल्या सुमधुर गायनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.ध्वनी व्यवस्था व निवेदनासाठी सुनील पाटील टेक्नॉलॉजी साऊंड यांनी उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था उपलब्ध करून दिली. लीनेश घाडगे आणि विक्रांत शिंदे यांनी निवेदनाची जबाबदारी सांभाळली.
वाद्यवृंदामध्ये सेन कुमार, श्रीराम इंगळे, अशोक जाधव, विलास अडागळे, सोमनाथ कांबळे, राजकुमार काजोरिया, लखन अडागळे, गोकुळ, रोहन कळदकर यांनी आपल्या वादनाने कार्यक्रमात रंगत आणली.लावणी नृत्य सादरीकरणामध्ये वृषाली सातपुते, भारती मोरे, सुजाता कुंभार आणि फिरोज मुजावर यांनी बहारदार लावणी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.महाराष्ट्राची लोकधारा या विशेष सादरीकरणातून रवी कांबळे, सँडी पाटील, सिद्धांत घागरमले, कावेरी गंगाळे, आकाश गायकवाड, रवींद्र शिंदे, लीनेश घाडगे, अमोल अडागळे आणि भाऊसाहेब सांगळे यांच्या ग्रुपने महाराष्ट्राच्या लोककलेचा सुंदर आविष्कार सादर केला.तसेच प्रकाश नवगिरे, मनीषा बाराथे, मेबल अल्ल्हाट, मंगला पवार व मोनिका शिंदे यांच्यासह कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, कलाकारांचे, पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे व विशेष रसिक श्रोते आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि संस्थेच्या पुढील सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीसाठी सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.


