पुणे, दि.२ एप्रिल: निर्माण बांधकाम क्षेत्रातील देशातील आघाडीचे विद्यापीठ असलेल्या निकमार विद्यापीठात ४ एप्रिल रोजी एक दिवसीय ‘एचआर समिट-२०२५’आयोजित करण्यात येत आहे. ज्यामध्ये देशातील नामांकित तज्ञ विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत महत्वाच्या टिप्स देतील. अशी माहिती निकमार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रशांत दवे यांनी दिली
या प्रसंगी लार्सन अँड ट्रुब्रोचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट मानव संसाधन प्रमुख डॉ. सी.जय कुमार प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करतील. तसेच निकमार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अनिल कश्यप आणि कुलगुरू डॉ. सुषमा एस. कुलकर्णी उपस्थित राहतील.
‘एचआर समिट-२०२५’ मध्ये ४ चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिले सत्रः भविष्यातील कार्यबलाला आकार देणेः क्रॉसरोडवर पिढ्या
दुसरे सत्रः उद्याची तयारीः कौशल्य चलित जगात शिक्षणाची भूमिका
तिसरे सत्रः एआय आणि कामाचे भविष्यः मित्र किंवा शत्रू
चौथे सत्रः तुमच्या कारकिर्दीचे भविष्य सुनिश्चित करणेः बिल भरण्याचे कौशल्य
आयोजित चर्चा सत्रामध्येः सुनील शर्मा, साहिल नायर, बळीराम मुतगेकर, मानव प्रसाद , नुशीन नलवाला, नीलकंठ जठार, मानसी पांडे, नितीन जगदाळे, नीलेश धनानी, डॉ. सास्वती चक्रवर्ती, प्राची पटवर्धन जोशी, रोशनी राठोड, आनंद सिन्हा, कमल कश्यप,
अनुज सिंग, मुक्ता हुपरीकर, , जगदीश पुरंदर, आरती कोठावडे, अभिषेक मजुमदार, संगीता सिंह, सिद्धार्थ थिटे, शेखर भरणे, अर्चना बडेरा, ऐश्वर्या पिल्लई नायर यांच्या सह अनेक विशेषज्ञ आपले विचार व्यक्त करतील.
00000


