पुणे (प्रतिनिधी)
*श्रीमहागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यास या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी दिवाळी भेट* उपक्रम घेण्यात येत असतो याही वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी
*स्वा.वि.दा सावरकर गुरुकुल (तळेगाव दाभाडे)* या वसतिगृहात ६० किलो तांदूळ,विद्यार्थ्यासाठी दिवाळी फराळ,संचालक दादा शिरोडकर व कर्मचारी श्रीमती देशमुख मावशींचा वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला.तसेच काही निधी संस्थेला देण्यात आला.
दि. ०३.११.२०२६ रोजी *तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास (वेल्हा, पुणे)* वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शिधा,दिवाळी फराळ,वस्त्र व काही निधी संस्थेला देण्यात आला.संस्थेचे प्रमुख रमेश आंबेकर व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
याच परिसरातील दुर्गम भागातील *खोपडेवाडी व कोंढाळकरवाडी* येथे रहाणाऱ्या १०० कुटुंबांना दिवाळीचा शिधा,फराळ,शर्टाचे कापड व महिलांना साडी दिली.
दि. ०५.११.२०२६ रोजी वसुबारसेला *श्रीसद्गुरू नारायण महाराज दत्त संस्थान बेट – केडगाव* येथे संस्थानच्या वतीने गोपूजन व गोयज्ञ कार्यकम आयोजित केला होता.संस्थेचे विश्वस्त व अनेक भक्त यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले.
श्रीमहागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यासाच्या वतीने गायींना बाजरी,गूळ व १०० किलो बिट खाऊ घातले तसेच सर्व सेवेकरी व गुरुजींना धोतर-उपरणे, शर्टाचे कापड,स्त्रियांना साडी व संस्थेच्या गोशाळेसाठी काही निधी देण्यात आला.
*श्रीमहागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यासाचे संस्थापक व प्रमुख विश्वस्त श्रीहरिकीर्तनचक्रवर्ती प.पू श्री मोरेश्वर जोशी-चऱ्होलीकर महाराज* यांच्या मार्गदर्शनाने व साधक, भक्त परिवार यांच्या सहकार्याने दिवाळी भेट उपक्रम प्रतिवर्षी करण्यात येतो.
या *दिवाळी भेट* उपक्रमात न्यासाचे विश्वस्त गीतेश जोशी,हभप स्मिता देशपांडे,कार्यकारिणी सदस्य विलास देशपांडे,दत्तात्रय वाळवेकर,योगेश जोशी गुरुजी कार्यकर्ते जिनगिरे,गवते, इंगळे तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते याच बरोबर पराग इनामदार,गर्गे,अरुण देशपांडे अमित कुलकर्णी,श्री व सौ भट,रविंद्र टकले यांचे सहकार्य लाभले.
*श्रीमहागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यासा कडून दर महिना वेदपाठशाला, वसतिगृह,गोशाळा तसेच दिवाळी भेट आणि धार्मिक – जप,विविध पूजा,यज्ञ, महायोग साधना,सांस्कृतिक -कीर्तन,प्रवचन,व्याख्यान, सामाजिक -वैदिक व कीर्तनकार,सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार,सन्मान, वृक्षारोपण,पर्यावरण पूरक कार्यक्रम इ विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते.


