Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारताचा एआय क्षेत्रातील मोठा टप्पा: मिवीने जगातील पहिली मानवसदृश कृत्रिम बुद्धिमत्ता केली...

भारताचा एआय क्षेत्रातील मोठा टप्पा: मिवीने जगातील पहिली मानवसदृश कृत्रिम बुद्धिमत्ता केली लॉन्च

मिवी एआय मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील संवाद केवळ साध्या प्रश्नोत्तरांपुरता न ठेवता, तो माणसे जसा एकमेकांशी संवाद साधतात तसाच अधिक नैसर्गिक आणि रंजक अशा स्वरूपात बदलतो

 

हैदराबाद, 11 एप्रिल 2025 – भारतातील आघाडीचा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड मिवीने आज मिवी एआयच्या निर्मितीची घोषणा केली आहे. ही जगातील पहिली मानवसदृश कृत्रिम बुद्धिमत्ता असून, मानव आणि एआय यांच्यातील नातेसंबंध पूर्णपणे बदलण्याची क्षमता तिच्यात आहे. कंपनीने स्वयंपूर्ण संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून ही एआय यशस्वीपणे तयार केली आहे. ही मानवासारखी एआय तंत्रज्ञानाला लोकांच्या रोजच्या आयुष्यात अधिक सहजपणे एकत्रित करेल आणि अधिक अर्थपूर्ण व वापरकर्त्याभिमुख अनुभव देऊन उत्पादकता आणि जीवनमान वाढवण्यास मदत करेल.

 

सध्याची एआय मॉडेल्स मुख्यतः स्क्रीनवर मर्यादित प्रश्न-उत्तर पद्धतीने कार्य करतात, मात्र मिवीने संवादाच्या संकल्पनेला नव्याने परिभाषित केले आहे. प्रगत एलएलएम्सच्या रिजनिंग क्षमतेचा उपयोग करत, मिवीने एक वैयक्तिक संवाद इंजिन तयार केले आहे आणि त्याचे मॉडेल्स संदर्भ लक्षात ठेवून संवाद साधू शकतील अशा पद्धतीने प्रशिक्षित केले आहेत.

 

मिवी एआय ग्राहकांसाठी खास प्रकारे तयार करण्यात आलेल्या एआय बड्सच्या माध्यमातून सादर करण्यात येत आहे, जे सहज आणि चालताना देखील संवाद साधण्याची सुविधा देतात. फक्त “एचआय मिवी” असे म्हणताच एआय सक्रिय होते आणि एक नैसर्गिक संवाद सुरू होतो. मिवी एआय प्लॅटफॉर्मवर आधारित हे पहिले उत्पादन असून, हे बुद्धिमान उपकरणांच्या विस्तृत विश्वाची सुरुवात दर्शवते. हजारो भारतीय आवाजांच्या नमुन्यांवर प्रशिक्षण दिल्यामुळे, मिवी एआय वेगवेगळ्या भारतीय उच्चारांना सहज समजून घेते आणि अचूक प्रतिसाद देते, ज्यामुळे प्रत्येकासाठी समावेशक आणि सुलभ अनुभव मिळतो.

 

या ऐतिहासिक प्रगतीबाबत बोलताना मिवीच्या सहसंस्थापक आणि मुख्य विपणन अधिकारी मिदुला देवभक्तुनी म्हणाल्या, “मिवी एआयद्वारे आम्ही केवळ एक नवीन उत्पादन सादर करत नाही आहोत, तर मानवी आणि एआयमधील संवादाचे नवे युग घडवत आहोत. हे जागतिक स्तरावर नवकल्पनांचा एक महत्त्वाचा टप्पा आहे – जिथे एआय फक्त प्रतिसाद देत नाही, तर ती खऱ्या अर्थाने समजून घेते, अनुकूल होते आणि माणसांशी भावनिक पातळीवर जोडते. आमचे उद्दिष्ट असे तंत्रज्ञान तयार करणे आहे जे उपकरणासारखे वाटू नये, तर एक सहचरासारखे भासावे – सहज, समजूतदार आणि रोजच्या जीवनात नैसर्गिकपणे सामावलेले.”

 

“आपल्या प्रकारातील पहिले असलेले मिवी एआय आमच्या या अढळ विश्वासाचे प्रतीक आहे की जागतिक दर्जाची नवकल्पना भारतातच निर्माण होऊ शकते आणि ती संपूर्ण जगासाठी असावी. हा फक्त मिवीसाठी एक महत्त्वाचा टप्पा नाही, तर जागतिक मंचावर भारतीय तंत्रज्ञानासाठी एक ओळख निर्माण करणारा क्षण आहे. मिवी एआय बड्स ही मिवी एआयची पहिली साकारलेली रूप आहे आणि भविष्यातील अनेक प्रगत तंत्रज्ञानाची ही सुरूवात आहे. या क्रांतीचे नेतृत्व करत असल्याचा आम्हाला गर्व आहे. हा भारताच्या एआय युगाचा प्रारंभ आहे.”

 

मिवी एआयची सुरूवात – व्हिडिओ इथे पहा https://youtu.be/LLydBYoE2FM

 

मिवी एआयच्या मागे असलेल्या मुख्य तंत्रज्ञानामध्ये समाविष्ट आहेत:

 

नैसर्गिक भाषा प्रक्रिया (एनएलपी) – जी एआयला मानवी भाषा समजण्याची, तिचे विश्लेषण करण्याची आणि नैसर्गिक व सहज संवाद तयार करण्याची क्षमता देते.

भावनिक बुद्धिमत्ता – अशा प्रकारची एआय जी संभाषणातील भावनिक छटा ओळखते आणि त्यानुसार प्रतिसाद देते, ज्यामुळे संवाद अधिक वैयक्तिक आणि मानवी वाटतो.

संदर्भाची जाण – एआयला मागील संवाद लक्षात ठेवता येतो आणि संपूर्ण संभाषणाचा अथवा परिस्थितीचा संदर्भ समजतो, ज्यामुळे अधिक सुसंगत आणि अर्थपूर्ण संवाद शक्य होतो.

 

मिवी एआयची खरी ताकद तिच्या मानवसदृश दृष्टिकोनात आहे – ती ठराविक आदेशांवर काम करून ठराविक प्रतिसाद देत नाही, तर माणसासारखा नैसर्गिक संवाद साधते. ही प्रणाली अशा प्रकारे विकसित करण्यात आली आहे की ती मानवी संवादाची शैली आत्मसात करू शकते, गुंतागुंतीची भाषा समजू शकते, संदर्भ ओळखू शकते, भावना समजून घेते आणि परिस्थितीनुसार संवादात लवचिकता ठेवते. मिवीची मानवसदृश एआय आदेशाच्या भाषेतील बारकावे समजते आणि माणसासारखी विविध परिस्थितींनुसार स्वतःला जुळवून घेते.

 

मिवी विषयी

मिवीचा एआय क्षेत्रातील टप्पा हे अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण संशोधन आणि नवकल्पनांचे फलित आहे. 2016 साली विश्वनाथ कांडुला आणि मिधुला देवभक्तुनी यांनी मिवीची स्थापना केली. भारतीय ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्यांच्या गरजांसाठी दर्जेदार आणि किफायतशीर उत्पादने तयार करणे हे मिवीचे मुख्य ध्येय आहे, जे भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला एका नवीन उंचीवर घेऊन जाण्याचे काम करते. मिवी ही एक आगळी वेगळी कंपनी असून ती ऑडिओ क्षेत्रात विशेष काम करते – टीडब्ल्यूएसपासून ते होम ऑडिओपर्यंत. मिवीने ऑडिओ उपकरणांचे स्थान लक्झरी वस्तूपासून दैनंदिन जीवनातील आवश्यक अॅक्सेसरीपर्यंत नेले आहे. आज मिवीमध्ये 1500 हून अधिक कर्मचार्‍यांची टीम कार्यरत आहे आणि कंपनीने आजवर सुमारे २ कोटी ग्रा

हकांची सेवा केली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments