8 एप्रिल, 2025 :झेट्टाई प्रा. लि. यांना घोषित करताना आनंद होत आहे की नुकत्याच झालेल्या मतदान प्रक्रियेत कर्जदारांकडून (क्रेडिटर्सकडून) त्यांच्या प्रस्तावित व्यवस्था योजनेस प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. वझीरएक्स प्लॅटफॉर्मवर क्रिप्टो बॅलन्स (शिल्लक) असलेले सर्व कर्जदार सिंगापूरच्या उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रस्तावित पुनर्रचनेच्या संदर्भात मतदान करण्यास पात्र होते. 19 मार्च ते 28 मार्च दरम्यान मतदान प्रक्रिया क्रोल इश्युअर सर्व्हिसेस प्लॅटफॉर्मवर संचलित करण्यात आली.
संपूर्ण बोर्डात सबळ स्वीकृती.
एकूण, मंजूर दाव्यांपैकी USD195,650,529.03 चे धारकत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 141,476 स्कीम क्रेडिटर्सनी मतदान केले.
मतदान करणाऱ्या स्कीम क्रेडिटर्सपैकी, मंजूर दाव्यांपैकी SD184,997,156.31 चे प्रतिनिधित्व करणाऱ्या 131,659 स्कीम क्रेडिटर्सनी योजनेला ‘साठी’ मतदान केले. हे आकड्यांच्या आधारे 93.1% आणि योजनेस समर्थन देणाऱ्या योजनेच्या कर्जदारांच्या मतदानाच्या मूल्यानुसार 94.6 % चे प्रतिनिधित्व करते.
कंपनी कायद्याच्या कलम 210 ( 3AB) अंतर्गत, या पातळीवरील समर्थनाचे प्रमाण, वैधानिक मतदान मर्यादेच्या आवश्यकतेपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे, ज्यामध्ये मोजणीनुसार किमान बहुमताने आणि उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या कर्जदारांच्या एकूण दाव्यांच्या किमान 75% मूल्याने योजनेला मान्यता देणे आवश्यक आहे.
दाव्याच्या आकाराशी कोणताही संबध न ठेवता, सातत्यपूर्ण समर्थन
सर्वात लहान दावे असलेल्या कर्जदारांपासून ते सर्वात मोठे दावे असलेल्या कर्जदारांपर्यंत; सर्व कर्जदार विभागांमध्ये, मंजुरी दर 92% आणि 95% दरम्यान उल्लेखनीयपणे सातत्यपूर्ण राहिला. झेट्टाईच्या विविध कर्जदारांच्या संख्येद्वारा हे एकसमान समर्थन, प्रस्तावित पुनर्रचना दृष्टिकोनाशी व्यापक स्तरावर एकदिश (अलाइन) असण्याची पुष्टी करते, मग मंजूर दाव्याच्या आकार काहीही असो.
वझीरएक्सचे संस्थापक निश्चल शेट्टी म्हणाले, “आम्ही विश्वासदर्शक मताबद्दल उपकृत आहोत”. “आमच्या संपूर्ण आधाररचनेवरील हा सातत्यपूर्ण पाठिंबा आमच्या पुनर्रचना प्रणाली आणि पुनर्प्राप्ती योजनेवरील सामायिक विश्वास दर्शवितो.”
सत्यापन व पारदर्शकता
मतदान प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणि अचूकता यांची स्वतंत्र मूल्यांकनकर्ते (जोशुआ टेलर ॲन्ड हेन्री अँथनी चेंबर्स ऑफ अल्वारेझ अँड मार्साल) यांच्याकडून खात्री करण्यासाठी झेट्टाई यांनी पडताळणीसाठी मते सादर केली. काटेकोर छाननीनंतर, स्वतंत्र मूल्यांकनकर्त्यांनी मतदान निकाल आणि निकालाची पुष्टी करण्याकरिता अधिकृत पडताळणी अहवाल, झेट्टाई आणि योजना व्यवस्थापक यांना सादर केला (“मत अहवाल/Vote Repor”). मतदान अहवाल लवकरच, कर्जदारांची अद्यतनित यादी (ज्यामध्ये मतदानाचे निकाल अनामिक प्रकारे, प्रति-क्रेडीटर आधारावर सादर करण्यासाठी सुधारणा केलेल्या असतील) कशी पाहता येतील यावरील सूचनांसह, सर्व योजना कर्जदारांना उपलब्ध करून दिला जाईल आणि देखील असतील.
पुढचे पाऊल: न्यायालयात दाखल करणे
मतदानाच्या सत्यापित निकालांनंतर, पुढील पाऊल म्हणजे सिंगापूर न्यायालया्ची मंजुरी. झेट्टाई लवकरच कर्जदार-मंजूर योजनेच्या मंजुरीसाठी सिंगापूर न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे, हे घोषित्स करताना आम्हाला आनंद होत आहे. एकदा सिंगापूर न्यायालयाने दाखल केलेला अर्ज स्वीकारला की त्या नंतर, झेट्टाई सर्व योजना कर्जदात्यांना कायदेशीर दाखल्यांच्या प्रतीसह अद्यतन माहिती जारी करेल.
पुढील पाऊल: प्रभावी योजनेअंतर्गत समावेश (न्यायालयाच्या मंजुरीच्या अधीन)
न्यायालयाच्या मंजुरी आणि योजनेच्या प्रभावीतेच्या आधीन, योजना कायदेशीररित्या प्रभावी झाल्यापासून 10 कामकाजाच्या दिवसांच्या आत, पहिले वितरण सुरू होईल.
वापरकर्त्यांच्या सुलभतेला प्राधान्य देण्याबरोबरच, नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, पैसे काढणे आणि व्यापार पुन्हा सुरू करणे टप्प्याटप्प्याने घडत जाईल.
___________________________________________________________________________
WazirX/वझिर एक्स बद्दल अधिक माहितीसाठी कृपया https://wazirx.com/ ला भेट द्या


