मुंबई, 13 एप्रिल 2025: प्रसिद्ध शेफ आणि दूरचित्रवाणीवरील व्यक्तिमत्व रणवीर ब्रार यांनी रेमंड्स चेअरमन्स कलेक्शन साठी मुंबईतील फेअरमाँट येथे झालेल्या बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये शोस्टॉपर म्हणून रॅम्प वर बहुप्रतीक्षित पदार्पण केले. या शोमध्ये रेमंड रेडी टू वेअर ची नजाकत, एथनिक्स बाय रेमंडचे सांस्कृतिक सौंदर्य आणि पार्क अॅव्हेन्यूच्या शहरी आदबशीरपणा एकत्र येत कालातीत स्टाईल, परंपरा आणि आधुनिक पुरुषत्वाचा उत्सव साजरा करण्यात आला.
आजच्या सूज्ञ भारतीय पुरुषाच्या व्यक्तीत्वाला अचूकपणे सादर करणाऱ्या लूकमध्ये रॅम्पवर चालताना रणवीर ब्रार यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वातील आकर्षकता आणि स्टाईलने रॅम्पवर एक संस्मरणीय फॅशन क्षण निर्माण केला.
या प्रसंगी बोलताना सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार म्हणाले, “रेमंड्स चेअरमन्स कलेक्शनसाठी रॅम्पवर चालणे हे केवळ पदार्पण नव्हते तर तो एक वैयक्तिक अभिव्यक्तीचा क्षण होता. अन्नाप्रमाणेच फॅशनसुद्धा एक प्रभावशाली भाषा आहे. या सहयोगामुळे मला परंपरेशी जोडलेला असूनही आत्मविश्वासाने भविष्याकडे वाटचाल करत असलेल्या आधुनिक भारतीय पुरुषाची कथा सांगण्याची संधी मिळाली. सौंदर्य, व्यक्तित्व आणि कालातीत नजाकत यांचा उत्सव साजरा करत असलेल्या या कार्यक्रमाचा भाग मला होता आलं याचा मला सन्मान वाटतो.”
चेअरमन्स कलेक्शनमध्ये रेमंडची समृद्ध परंपरा उत्कृष्ट शिलाई, उच्च दर्जाचे कापड आणि विचारपूर्वक तयार केलेल्या पोशाखांच्या माध्यमातून उत्सवी पद्धतीने सादर करण्यात आली. ही वस्त्रप्रावरणे परंपरेशी जोडलेला असो वा आधुनिक मार्ग निवडणारा अशा आजच्या बहुआयामी व्यक्तिमत्व पैलू असलेल्या पुरुषांसाठी डिझाइन करण्यात आली आहेत.
पारंपरिक वारशाला समकालीन प्रासंगिकतेसह एकत्र आणत आधुनिक भारताच्या गतिशीलतेला अचूक पकडत असलेल्या अशा कलेक्शन्सद्वारे रेमंड भारतात पुरुषांच्या फॅशनची पुर्नव्याख्या करत आहे.
कार्यक्रमात बोलताना रेमंड लाईफस्टाईल लिमिटेडचे अध्यक्ष गौतम सिंघानिया म्हणाले, “रेमंडसाठी हे एक महत्वपूर्ण वर्ष असून द चेअरमन्स कलेक्शनची ही लिमिटेड एडिशन भारताच्या समृद्ध वारसा आणि कारागिरीला असलेला आमचा सलाम आहे. सिल्क शर्ट्स पासून बंधगाळा पर्यंत उत्कृष्ट स्टाइल असलेले हे कलेक्शन रेमंडचे खास वैशिष्ट्य असलेल्या सौंदर्य आणि स्टाईलचे प्रतीक आहे. लाखो लोकांचे प्रेम लाभलेला एक स्थानिक भारतीय ब्रँड म्हणून रेमंडने सर्व प्रसंगांसाठी आणि सर्व प्रकारच्या किंमतीमध्ये पुरुषांसाठी पोशाख तयार केले आहेत.”


