मुंबई, १६ एप्रिल २०२५ -: गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) या उदयोन्मुख बाजारपेठांतील आघाडीच्या एफएमसीजी कंपनीने शाश्वत आणि व्यापक सुविधांप्रती आपली बांधिलकी जपत महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे नवे व्हर्टिकल स्टोअरेज सुरू केले आहे. हे अत्याधुनिक वेयरहाउस जीसीपीएलच्या परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत पुरवठा साखळी मजबूत करण्याच्या धोरणात्मक निर्णयाचा भाग आहे. परिवर्तन प्रकल्प शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवत वेयरहाउसिंग व लॉजिस्टिक्सचे नाविन्यपूर्ण रुपांतर करण्यासाठी हाती घेण्यात आला आहे.
२.८४ लाख चौरस फुटांच्या जागेत वसलेल्या या वेयरहाउसमध्ये ३२०० पॅलेट पोझिशन्स आणि हाय- डेन्सिटी G+6 व्हर्टिकल ट्रॅकिंग सिस्टीमचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे स्टोअरेजची कार्यक्षमता वाढते आणि प्रत्यक्ष हस्तक्षेप कमी होतो. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश अशा प्रादेशिक बाजारपेठांसाठी मुख्य केंद्र केलेले हे वेयरहाउस व्यवसायांच्या बदलत्या गरजा लॉजिस्टिक्ससह वेगाने पूर्ण करण्यासाठी क्षमतेसह उभारण्यात आले आहे.
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. च्या (जीसीपीएल) प्रॉडक्ट सप्लाय ऑर्गनायझेशन, भारत आणि सार्कचे प्रमुख सौरभ झवार म्हणाले, ‘आमच्या पहिल्या व्हर्टिकल स्टोअरेजचे लाँच स्मार्ट, वेगवान आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी उभारण्याच्या आमच्या प्रवासातील महत्त्वाचे पाऊल आहे. प्रकल्प परिवर्तनअंतर्गत केवळ १८ महिन्यांत आम्ही आमच्या महत्त्वाच्या लॉजिस्टिक्स पुरवठा साखळ्यांचे ग्रेड दर्जाच्या सुविधांमध्ये रुपांतर केले आहे. महाराष्ट्रातील हे नवे वेयरहाउस गुणवत्तापूर्ण कामकाज, डिजिटल इंटिग्रेशन आणि शाश्वत विकासाप्रती आमची बांधिलकी दर्शवणारे आहे. यामुळे ग्राहकांना जास्त वेगवान, सुरक्षित आणि काळजीपूर्वक सेवा देणे आम्हाला शक्य होणार आहे.’
मार्च २०२५ मध्ये जीसीपीएलने तामिळनाडू येथे पहिला इंटिग्रेटेड ग्रीनफील्ड प्लँट सुरू करत उत्पादन क्षेत्रातील रुपांतरणाचे प्रतिनिधीत्व केले. हे आधुनिक केंद्र कंपनीचे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सुविधांचा समावेश असलेले केंद्र असून त्याद्वारे जीसीपीएलच्या काही सर्वात लोकप्रिय ब्रँड्सचे उत्पादन होते. त्यामध्ये सिंथॉल, गोदरेज नं. १, गुडनाइट, गोदरेज एयर आणि गोदरेज एक्सपर्ट हेयर कलर यांचा समावेश आहे. व्हर्टिकल स्टोअरेज वेयरहाउससह जीसीपीएल राष्ट्रीय स्तरावरील आपले वितरण नेटवर्क मजबूत करत आहे. हे रियल- टाइम, डेटावर आधारित निर्णय घेणाऱ्या आणि ऑटोमेटेड शेड्युलिंग यंत्रणांच्या दिशेने धोरणात्मक बदल दर्शवणआरे आहे. यामुळे पुरवठा साखळ्यांचा वेग आणि प्रतिसाद वाढण्यास मदत होईल.
या वेयरहाउससह जीसीपीएलची परस्परांसाठी लाभदायक, लवचिक, नाविन्यपूर्ण पायाभूत सुविधा उभारण्याचे धोरण दिसून आले आहे. त्याचशिवाय यातून ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रातील गुणवत्तेची समीकरणे नव्याने प्रस्थापित करण्याचे व्यापक ध्येयही अधोरेखित झाले आहे.
या वेयरहाउसमध्ये मालाच्या हाताळणीसाठी अत्याधुनिक क्षमता बसवण्यात आल्या असून त्यात अँग्युलर डॉक्स, डॉक्स लेवलर आणि ऑटोमेशनचा समावेश आहे. त्यामध्ये रोज ६०,००० केसेस हाताळण्याची क्षमता आहे. जीसीपीएलने अत्याधुनिक सुरक्षा आणि मॉनिटरिंग तंत्रज्ञानही समाविष्ट केले आहे. त्यात एआय- एमएल पॉवर्ड वेयरहाउस मॉनिटरिंग, आयआर० बेस्ड फायर अलार्ण यंत्रणा, तापमान आणि गॅस सेन्सर्स, सेंट्रलाइज्ड वेयरहाउस कंट्रोल सेंटर यांचा समावेश आहे. लोकांप्रती सुरक्षितता आणि त्यांचा कौशल्य विकास घडवण्याची बांधिलकी जपण्यासाठी या वेयरहाउसमध्ये व्हीआरवर आधारित सुरक्षा प्रशिक्षण मोड्युल्स बसवण्यात आल्या हेत. त्या ऑन- ग्राउंड टीम्ससाठी इमर्सिव्ह लर्निंग सुविधा पुरवतात.
भिवंडी वेयरहाउस जीसीपीएलच्या पुरवठा साखळी विकासाचे प्रतीक आहे, शिवाय त्यातून कंपनी गुड अँड ग्रीनप्रती बांधिलकी दिसून आली आहे. स्टोअरेज डेन्सिटीत करण्यात आलेली वाढ, रोजच्या कामांचे ऑटोमेशन आणि केंद्रादरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी करणे यातून हे वेयरहाउस कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच स्त्रोतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी योगदान देत आहे. जीसीपीएलच्या सस्टेनेबल प्रोक्युरमेंट धोरणाशी सुसंगत राहात कंपनी पुरवठादार आणि भागिदारांसह जबाबदार सोर्सिंग, नैतिक कामकाज व पर्यावरणाप्रती दीर्घकालीन बांधिलकी जपण्यासाठी काम करत राहाणार आहे.


