एका अभ्यासानुसार, पुण्यातील श्रीमंत घर खरेदीदारांसाठी आता आरोग्य, निसर्ग आणि आसपासचे वातावरण, हे लक्झरीची व्याख्या ठरले आहेत; हा अहवाल गोदरेज हिल रिट्रीट येथे ‘शुभ आरंभ’ कार्यक्रमात अभिनेता मृणाल ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला
महत्त्वाचे मुद्दे:
पुण्यातील 74% आर्थिकदृष्ट्या सक्षम घरखरेदीदार ‘वेलनेस’ (आरोग्य व कल्याण) सुविधांना प्राधान्य देतात; 78% लोक योगा आणि ध्यानासाठी स्वतंत्र जागा असण्याला महत्त्व देतात.
76% लोकांना मोठी बाल्कनी हवी आहे; 72% लोक आसपास हिरवळ, पर्यावरण पूरक असण्यावर भर देतात.
68% लोक सामाजिक (community-centric) जीवनशैलीला महत्त्व देतात; 67% लोक मनोरंजनात्मक सुविधांना प्राधान्य देतात.
64% लोक शाश्वत (sustainable) वैशिष्ट्यांना प्राधान्य देतात; 60% लोक ‘स्मार्ट-होम’ तंत्रज्ञानाची अपेक्षा ठेवतात.
पुण्यातील 79% लोक निवासी रिअल इस्टेट बाजारपेठेत पुन्हा गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत.
भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने (GPL; BSE स्क्रिप आयडी: GODREJPROP) आज ‘द एलिव्हेटेड लिव्हिंग एडिट’च्या पुणे आवृत्तीचे उद्घाटन केले. श्रीमंत ग्राहकांच्या आकांक्षा आणि घर खरेदीच्या प्राधान्यक्रमांवर आधारित एका शहराचा केलेला संशोधन अभ्यास आहे.
या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, पुण्यातील आलिशान जीवनशैली ही घराचा आकार आणि पत्त्यावरून नव्हे, तर खरेदी केलेले घर खरेदीदारांना कसे राहू देते यावर अधिक अवलंबून आहे. आरोग्य आणि निरोगीपणा हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे: योगा आणि ध्यानासाठी समर्पित जागा हे सर्वाधिक मागणी असलेले वैशिष्ट्य आहे (78%), आणि 74% प्रतिसादकर्ते आरोग्यविषयक सुविधांना अधिक व्यापकपणे प्राधान्य देतात. मोठ्या बाल्कनी आणि हिरव्यागार जागांच्या माध्यमातून निसर्गाशी जवळीक साधणे हे दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर सामुदायिक आणि मनोरंजनाची मागणी दर्शवते की, खरेदीदारांना अशी घरे हवी आहेत जी त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांशी जोडून ठेवतील. भविष्यासाठी सज्ज असलेल्या घरांच्या शोधात खरेदीदार असल्याने, शाश्वतता आणि स्मार्ट-होम तंत्रज्ञान हे चित्र पूर्ण करतात. 79% लोकांनी पुन्हा पुण्यात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे, शहराच्या दीर्घकालीन विकासावरचा विश्वास दृढ आहे.
पुण्यातील महालुंगे येथील गोदरेज हिल रिट्रीटमध्ये, जीपीएलच्या (GPL) ‘शुभ आरंभ’ या विशेष गृहहस्तांतरण कार्यक्रमादरम्यान या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी घरमालक, उद्योग क्षेत्रातील हितचिंतक आणि पाहुण्यांनी सामाजिक जीवनातील एका नव्या पर्वाचा उत्सव साजरा केला. या कार्यक्रमात गोदरेज प्रॉपर्टीजचे पश्चिम-पूर्व विभागाचे सीईओ मयंक पोद्दार आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्यात एक अनौपचारिक संवाद झाला. गोदरेज इंडस्ट्रीजचे मुख्य संचार अधिकारी सुजित पाटील यांनी या संवादाचे सूत्रसंचालन केले. आरोग्य, जीवनशैली आणि आसपासचे वातावरण हे घटक आधुनिक टाऊनशिपला कसे आकार देत आहेत, याबाबत हा संवाद साधण्यात आला.
या निष्कर्षांवर भाष्य करताना, गोदरेज प्रॉपर्टीजचे पश्चिम-पूर्व विभागाचे सीईओ मयंक पोद्दार म्हणाले, “भारतातील सर्वात गतिमान निवासी बाजारपेठांमध्ये पुण्याचा समावेश आहे आणि येथील घर खरेदीदारांना त्यांच्या जीवनाचा दर्जा वाढवणारे अनुभव अधिकाधिक हवे आहेत. ‘एलिव्हेटेड लिव्हिंग एडिट’ हे आज घर खरेदीदार कोणत्या गोष्टींना महत्त्व देतात, यातील एका महत्त्वपूर्ण बदलाचे प्रतिबिंब आहे. आरोग्य, अर्थपूर्ण सामुदायिक अनुभव, निसर्गाशी जवळीक, शाश्वतता आणि विचारपूर्वक केलेली रचना याच्या आधारे आता पुण्यात आरामदायी जगण्याची व्याख्या केली जाते. हे निष्कर्ष आम्ही प्रत्यक्ष जमिनीवर जे अनुभवत आहोत त्याचेच प्रतिबिंब आहेत आणि भविष्यासाठी सज्ज समुदाय कसे तयार करायचे, यासाठी ते आम्हाला दिशा देतात.”
जीपीएलच्या सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी पुणे हे एक आहे. शहरात वितरणाचा वेग वाढवत असताना, डिझाइन, बांधकामाचा दर्जा आणि ग्राहक अनुभवावर जीपीएल लक्ष केंद्रित करत आहे. मयंक पोद्दार पुढे म्हणाले, “आर्थिक वर्ष 2027च्या अखेरपर्यंत शहरात 4,000 हून अधिक घरे वितरित करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत, जे अंमलबजावणीतील उत्कृष्टता आणि ग्राहक समाधान या दोन्हींप्रति आमची वचनबद्धता अधिक दृढ करते.”
अभिनेत्री मृणाल ठाकूर म्हणाली, “गोदरेज हिल रिट्रीट (Godrej Hill Retreat) येथील ‘शुभ आरंभ’ कार्यक्रमाचा भाग होणे आणि कुटुंबांसोबत त्यांच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात साजरी करणे, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. ‘द एलीव्हेटेड लिव्हिंग एडिट’ (The Elevated Living Edit) चे अनावरण करणेही तितकेच अर्थपूर्ण ठरले; विशेषतः पुण्यातील 78% घरखरेदीदार योग आणि ध्यानासाठी स्वतंत्र जागा असण्याला महत्त्व देतात, हे जाणून आनंद झाला. आधुनिक जीवनशैलीत वेलनेसला किती महत्त्व आहे, हे यातून लक्षात येते. मार्च 2027 पर्यंत पुण्यात 4,000 घरे पूर्ण करण्याच्या दिशेने गोदरेज प्रॉपर्टीजची वाटचाल अत्यंत प्रेरणादायी आहे.”
अहवालातील निष्कर्षांशी सुसंगत, ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने ‘गोदरेज हिल रिट्रीट’ (पुण्यातील पहिला रिसॉर्ट-शैलीतील प्रकल्प) येथे 1,400 चौ.मी. क्षेत्रातील ‘इको-रिसॉर्ट’ संकल्पनेवर आधारित क्लब हाऊसचे अनावरण केले आहे. या क्लब हाऊसमध्ये चार विभाग (किड्स कार्निव्हल झोन, स्प्लॅश एरिना, रिसॉर्ट रूफ एरिना आणि ट्रँक्विल झोन) आणि सात संकल्पना-आधारित उद्याने आहेत. यात पुण्यातील कोणत्याही निवासी प्रकल्पातील पहिली कार्यान्वित ‘बोलिंग ॲली’, तसेच एक ‘इंटरअॅक्टिव्ह जिम’ आणि वेलनेस (आरोग्य व कल्याण) सुविधांचाही समावेश आहे. प्रकल्पातील इतर सुविधांसह, येथे एकूण 25 हून अधिक रिसॉर्ट-शैलीतील सुविधा उपलब्ध आहेत, ज्या सक्रिय, एकमेकांशी जोडलेल्या आणि अनुभवांवर आधारित जीवनशैलीसाठी डिझाइन केल्या गे
ल्या आहेत.


