Monday, October 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षि वाल्मिकी जयंतीनिमित्त अभिवादन....    

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षि वाल्मिकी जयंतीनिमित्त अभिवादन….    

 

 

 

 

पिंपरी, दि. २६ ऑक्टोबर २०२६ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर महर्षि वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

 

 

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारत येथील झालेल्या कार्यक्रमात महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस उपमहापौर शर्मिला बाबर आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

 

 

मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सह आयुक्त मनोज लोणकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे माजी उपाध्यक्ष ॲड.सागर चरण, सामाजिक कार्यकर्ते राजेश बडगुजर, सोमनाथ बेद, विष्णू चावरिया, राहुल चावरिया, नरेश गुहर, अशोक वाल्मिकी, अनिल लखण, प्रकाश सौदा, ओमप्रकाश सौदा,मुकेश बंदमड, सुशील खैरालिका, सुनील चटोले यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

 

तर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अनुराधा गोरखे, वर्षा जगताप, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ.राजेद्र वाबळे,उप अधिक्षक डाॅ.मनिषा सुर्यवंशी,भूलतज्ञ डाॅ.मारूती गायकवाड, नोडल अधिकारी डाॅ.छाया शिंदे, मेट्रन वत्सला वाजे,स्वाती कुलकर्णी,आरोग्य निरिक्षक अमोल गोरखे, आरोग्य सहाय्यक मोहन वाघमारे तसेच अभिषेक फुगे,नंदू कानडे, प्रेमकुमार रेनवा,निलेश बहुले आदी उपस्थित होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments