Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रा.रणजित घोगले यांना द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्टसकडून प्रतिष्ठेचा पुरस्कार * भोपाळ...

प्रा.रणजित घोगले यांना द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्टसकडून प्रतिष्ठेचा पुरस्कार * भोपाळ येथे झालेल्या नॅटकॉन 2025 परिषदेत माधव अचवाल गोल्ड मेडल देऊन गौरव

पुणे,21 एप्रिल 2025 : भोपाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅटकॉन 2025 परिषदेत प्रख्यात वास्तूविशारद प्रा.रणजित घोगले यांना द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्टसकडून माधव अचवाल गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते देण्यात आले.हा पुरस्कार प्रा.रणजित घोगले यांना वास्तूविशारद शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल देण्यात आले. याप्रसंगी प्रा.घोगले यांना द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्टस तर्फे विशेष मानपत्र देण्यात आले. प्रा.रणजित घोगले हे नॅशनल कौन्सिलचे सदस्य,बोर्ड ऑफ एज्युकेशन ॲन्ड एक्झाम्सचे अध्यक्ष राहिले आहेत तसेच द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्टस पुणे सेंटरचे माजी अध्यक्ष आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments