Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedनोबल हॉस्पिटलला एंडोस्कोपी सुरक्षेसाठी सीएएचओ प्रतिष्ठेचा पुरस्कार

नोबल हॉस्पिटलला एंडोस्कोपी सुरक्षेसाठी सीएएचओ प्रतिष्ठेचा पुरस्कार

पुणे,22 एप्रिल 2025 : कन्सॉरटियम ऑफ ॲक्रिडेटेड हेल्थकेअर ऑर्गनायझेशन्स (सीएएचओ) तर्फे आयोजित एंडो – सेफ एक्सलन्स ऑडिटमध्ये पश्चिम विभागात (महाराष्ट्र,गुजरात,गोवा व मध्यप्रदेश) एंडोस्कोपी सुरक्षेसाठी प्रथम पारितोषिक मिळाले.या ऑडिट स्कोअरमध्ये 80 टक्के हून अधिक गुण प्राप्त करत सेंटर ऑफ एक्सलन्स इन एंडोस्कोपी सेफ्टीचा बहुमान मिळाला आहे.

 

नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,हा पुरस्कार म्हणजे गुणवत्ता आणि सुरक्षिततेसाठी आम्ही सातत्याने करत असलेले प्रयत्न प्रतिबिंबित करते.एंडो – सेफ ऑडिटमध्ये सहभागी होत या क्षेत्रातील सर्वोत्तम संस्थांबरोबर आमची कामगिरी दर्शविता आली आणि आम्हाला अभिमान आहे की,देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांमध्ये आम्हाला स्थान मिळाले.

 

एंडोसेफ एक्सलन्स ऑडिट हा सीएएचओचा राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम असून एंडोस्कोपी क्षेत्रात रूग्ण सुरक्षा मानके आणखी उंचावण्याचे उद्दिष्ट आहे.कठोर निकषांवर रूग्णालयांचे मुल्यांकन करण्यात येते आणि ज्या संस्था सर्वोत्तम पध्दती,वैद्यकीय परिणाम आणि सुरक्षा प्रोटोकॉल्स दर्शवितात त्यांना पुरस्कार देण्यात येतो.

 

एंडोस्कोपी विभागाचे प्रमुख डॉ.प्रमोद कटारे म्हणाले की,हा पुरस्कार आमच्या वैद्यकीय नर्सिंग आणि सहाय्यक टीमच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे. हा पुरस्कार जागतिक दर्जाची रूग्णकेंद्रित सेवा प्रदान करण्याची आमची समर्पितता दर्शवतो.

 

नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने म्हणाले की, हा पुरस्कार नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरच्या आरोग्य सेवेतील उत्कृष्टतेच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. नोबल हॉस्पिटलने एंडोस्कोपी चिकित्सेसाठी क्षेत्रीय स्तरावर एक विश्वसनीय ठिकाण म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे

.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments