Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेशातून मलेरिया आणि डेंग्यूच्या समूळ उच्चाटनासाठी युपीएल एसएएस कंपनीची खंबीर साथ ...

देशातून मलेरिया आणि डेंग्यूच्या समूळ उच्चाटनासाठी युपीएल एसएएस कंपनीची खंबीर साथ येत्या दोन वर्षांत २०२७ पर्यंत मलेरियाचे देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी कंपनी सज्ज, केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत कार्यप्रणाली स्थानिक स्वराज्य संस्था आणि संस्थांच्या सहकार्याने वेगवेगळ्या भागांतून मलेरिया, डेंग्यू हद्दपार करण्यासाठी कंपनीचे धोरण

मुंबई, २२ एप्रिल २०२५ – दरवर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. जागतिक मलेरिया दिन काही दिवसांवर येऊन ठेपला असताना युपीएल एसएएस कंपनीने मलेरिया आणि डेंग्यूच्या समूळ उच्चाटनासाठी सर्वतोपरि प्रयत्न करित असल्याचे आश्वासन दिले आहे. कंपनीने केंद्र सरकारच्या आरोग्याविषयक धोरणांतून तसेच उपाययोजनांतून डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारावर आळा घालण्यासाठी तत्परता दर्शवली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन आराखडा आणि राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन धोरणात्मक योजना यांसारख्या सर्वसमावेशक धोरणांना पाठिंबा देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते. येत्या दोन वर्षांत २०२७ पर्यंत देशातून मलेरियाची एकही केस सापडता कामा नये, हे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे.

 

 

 

युपीएल एसएएस कंपनी देशभरातील महानगरपालिकांच्या सहकार्याने जनजागृतीपर कार्यक्रमांचे नियोजन करत आहे. मलेरियाच्या केसेसवर नियंत्रण यावे म्हणून कंपनीने शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळे प्रकल्प राबवण्यावर भर दिला आहे. गुजरात येथील उदवाडा गावात डासांमुळे होणारे आजार कमी करण्यासाठी क्लीन एण्ड ग्रीन चॅरिटेबल ट्रस्टसोबत कंपनीने डासांच्या उत्पत्तीची उगमस्थाने नष्ट करण्याचा प्रकल्प हाती घेतला. तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरातील ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेसह विविध कार्यक्रमांचे नियोजन यशस्वीरित्या अंमलात आणले गेले.

 

 

 

गुजरात आणि तेलंगणा राज्यातील डासांमुळे होणा-या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी कंपनीने अथक परिश्रम घेतले. दोन्ही प्रकल्पांमध्ये डासांची उत्त्पत्ती आणि संबंधित आजार कमी होत असल्याचे निदर्शनास आले. या दोन यशस्वी प्रकल्पानंतर युपीएल एसएएस कंपनीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. गुजरात, तेलंगणा या राज्यांसह कंपनी आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारसबोत मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध कार्यक्रम आखण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही राज्यांसोबत नव्या प्रकल्पाला सुरुवात झाल्यास कंपनीला शहरी आणि ग्रामीण भागांत राहणा-या लोकांचे जीवनमान सुधारण्यास अधिक प्रखरतेने योगदान देता येईल. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याचे कंपनीचे मूळ उद्दिष्ट सफल होईल.

 

 

 

कंपनीच्या वाढत्या कार्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष डोभाल यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘ आम्ही सुरु केलेली सार्वजनिक आरोग्य मोहिम ही व्यापक क्षेत्रात सुरु आहे. ही मोहिम केवळ शेतीपुरतीच मर्यादित नसून, आम्ही विविध समूहांचा उद्धार आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासही कटिबद्ध आहोत. केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक धोऱणांना पाठिंबा देणे, सर्व भारतीयांसाठी निरोगी आणि सुरक्षित जीवनशैली निर्माण करणे हे आमचे उद्देश आहे. म्हणूनच आम्ही डास नियंत्रणासाठी विश्वासार्ह आणि प्रभावी उपाययोजना अंमलात आणली आहे. या उपाययोजनांमुळे कोट्यावधी भारतीयांचे जीवनमान सुधारेल. या बदलांसाठी स्थानिक प्रशासन आणि समुदायांचे सहकार्य गरजेचे आहे. तरच आपल्याला ख-या अर्थाने मलेरिया आणि डेंग्यूमुक्त भारताच्या दिशेने आपली यशस्वी वाटचाल करता येईल.’’

 

 

 

या नवनव्या उपक्रमांबद्दल तसेच कंपनीच्या विस्तारीत कार्याबद्दल कंपनीच्या सार्वजनिक आरोग्य व्यवसायाचे प्रमुख श्री. सुब्रतो पल यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ डासांची उगमस्थाने आणि अळ्या नष्ट करणे आणि डासांच्या उत्त्पत्तीवर नियंत्रण ठेवणे हेच कंपनीचे मुख्य धोरण आहे. या धोरणाशी आमच्या भागदारकांनीही सहमती दर्शवली आहे. म्हणूनच आम्ही प्रकल्पाच्या सुरुवातीलाच डासांच्या उत्त्पत्तीची ठिकाणे

नष्ट करण्यावर

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments