Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedबजाज फिन्सर्व्ह एएमसी आणत आहे आधुनिक गुंतवणूकदारांसाठी नेक्स्ट-जेन पॅसिव्ह फंड्स

बजाज फिन्सर्व्ह एएमसी आणत आहे आधुनिक गुंतवणूकदारांसाठी नेक्स्ट-जेन पॅसिव्ह फंड्स

मुंबई/ पुणे, २२ एप्रिल २०२५: बजाज फिन्सर्व्ह एएमसीने पॅसिव फंड उत्पादनांमध्ये विस्तार करत ‘बजाज फिन्सर्व्ह निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड’ आणि ‘बजाज फिन्सर्व्ह निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स फंड’ अशा दोन फंडांची घोषणा केली आहे.

 

बजाज फिन्सर्व्ह निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड ही एक खुली योजना आहे. निफ्टी फिफ्टी टोटल रिटर्न इंडेक्स (टीआरआय) या योजनेसाठी मापदंड म्हणून वापरला जाणार आहे. निफ्टी फिफ्टी इंडेक्समध्ये येणाऱ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करून मोबदला मिळवण्याचा प्रयत्न करणारा हा इंडेक्स फंड आहे. या फंडाचे खर्चाचे गुणोत्तर सक्रियपणे व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या फंडांच्या तुलनेत कमी आहे.

 

बजाज फिन्सर्व्ह निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंडासाठी निफ्टी नेक्स्ट फिफ्टी टोटल रिटर्न इंडेक्स (टीआरआय) मापदंड म्हणून वापरला जात असून, हा देखील खुला इंडेक्स फंड आहे. निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्समधील कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करून मोबदल्याचे ‘बीटा मिररिंग’ करण्याचा प्रयत्न ही योजना करत आहे. भूतकाळात निफ्टी फिफ्टीकडे जाण्याची पहिली पायरी म्हणून काम केलेल्या उच्च वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांमध्ये हा फंड गुंतवणूक करतो. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतील कंपन्यांचे समतोल मिश्रण आहे आणि आघाडीच्या १०० कंपन्यांतील गुंतवणूकीचे विविधीकरण केले जात आहे.

 

या दोन्ही एनएफओंमध्ये शिस्तबद्ध पॅसिव गुंतवणूक धोरणाचा अवलंब केला जातो. हे धोरण दीर्घकालीन संपदानिर्मिती उद्दिष्टांशी सुसंगत असून, भारतातील सर्वांत मोठ्या व वेगाने विस्तारत जाणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून बाजारात विस्तृत अस्तित्व निर्माण करण्याची किफायतशीर पद्धत या धोरणात अवलंबली जाते. सक्रियपणे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या फंडांच्या तुलनेत या फंडाचा व्यवस्थापन खर्च कमी असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा किफायतशीर पर्याय आहे. इंडेक्सची पुनरावृत्ती करून हे फंड सातत्यपूर्ण धोरणाचा अवलंब करतात. त्यामुळे बाजारातील लघुकालीन चढउतारांचा प्रभाव कमीत-कमी राखण्यात यामुळे मदत होते. दीर्घकालीन विचार ठेवून विकसित करण्यात आलेले हे फंड, पोर्टफोलिओमध्ये वारंवार समायोजन करण्याची गरज न भासता स्थिर इक्विटी वाढीची इच्छा असलेल्यांसाठी, उत्तम आहेत.

 

बजाज फिन्सर्व्ह एएमसीचे मॅनेजिंग डायरेक्टर गणेश मोहन या फंडांबद्दल म्हणाले, “उच्च दर्जाची गुंतवणूक उत्पादने सर्वांना उपलब्ध, पारदर्शक आणि किफायतशीर असली पाहिजेत या आमच्या विचाराचे प्रतिबिंब आमच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या पॅसिव फंडांमधून दिसते. अधिकाधिक व्यक्ती त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी योग्य मार्गांच्या शोधात असल्यामुळे कमी खर्चाची पॅसिव धोरणे भविष्यकाळासाठी शिस्तबद्ध व कार्यक्षम मार्ग दाखवतात.

 

आमच्या उत्पादन श्रेणीचा विस्तार या क्षेत्रात करणे साहजिकच होते. कारण गुंतवणूकदारांना आमच्या तत्त्वांशी पूर्णपणे मिळतीजुळती आणि व्यापक स्वरूपाची सुलभ व कार्यक्षम उत्पादने देऊ करण्याची आमची बांधिलकी यामुळे आणखी दृढ होते.”

 

बजाज फिन्सर्व्ह एएमसीचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर निमेश चंदन म्हणाले,“पॅसिव फंडांची श्रेणी बाजारात आणून आम्ही आमच्या गुंतवणूक उत्पादनांच्या समूहात महत्त्वपूर्ण भर घालत आहोत. इंडेक्स फंडांमुळे गुंतवणूकदारांना अधिक व्यापक बाजारांमध्ये महत्त्वपूर्ण, किफायतशीर मार्गांनी प्रवेश करणे शक्य होते. मोठ्या भांडवलाच्या निर्देशांकांवर (लार्ज-कॅप इंडायसेस) भर देण्याच्या सध्याच्या आमच्या धोरणातून या विभागाकडे बघण्याचा आमचा विधायक व आशावादी दृष्टिकोन दिसून येतो. सध्याच्या वातावरणात स्थैर्य व दीर्घकालीन वाढीची संभाव्यता देऊ करण्यासाठी हा दृष्टिकोन आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते.”

 

बजाज फिन्सर्व्ह निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स फंडाची किमान अर्ज रक्कम ५०० रुपये व त्यानंतर १ रुपयाच्या पटीत आहे. तर, बजाज फिन्सर्व्ह निफ्टी फिफ्टी इंडेक्सची किमान अर्ज रक्कम ५०० रुपये असून त्यानंतरही ५०० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दोन्ही योजना ग्रोथ आणि आयडीसीडब्ल्यू (इन्कम डिस्ट्रिब्युशन कम कॅपिटल विड्रावल) पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये प्रवेश किंवा निर्गमन यांवर कोणतेही शुल्क नाही. हे फंड सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान्स (एसआयपी), सिस्टमॅटिक विड्रावल प्लान्स (एसडब्ल्यूपी) आणि सिस्टमॅटिक ट्रान्स्फर प्लान्स (एसटीपी) यांना अनुकूल आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणूक धोरणात लवचिकता राखता येते. या दोन्ही योजनांचे व्यवस्थापन बजाज फिन्सर्व्ह एएमसीचे फंड मॅनेजर श्री. इलेश सावला करणार आहेत.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments