Thursday, August 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedपेटीएम मनीने गुंतवणूकदारांसाठी परवडणाऱ्या आणि सुलभ व्यवहारांसाठी 'पे लेटर (एमटीएफ)'साठी व्याजदरात कपात...

पेटीएम मनीने गुंतवणूकदारांसाठी परवडणाऱ्या आणि सुलभ व्यवहारांसाठी ‘पे लेटर (एमटीएफ)’साठी व्याजदरात कपात आणि नवीन ब्रोकरेज रचना जाहीर केली

गुंतवणूकदारांसाठी व्यवहार अधिक परवडणारा करण्यासाठी व्याजदर १४.९९% पासून कमी करून ९.७५% वार्षिक इतके लवचिक व्याजदर लागू

• पे लेटर (एमटीएफ) सुविधेमुळे गुंतवणूकदारांना एकूण खर्चाच्या केवळ थोड्याशा भागात शेअर्स खरेदी करता येणार

• फंडिंग साईजवर आधारित स्लॅबप्रमाणे व्याजदर रचना तयार करून, प्रत्येक गुंतवणूकदारासाठी सानुकूल दरांची ऑफर — गुंतवणूक अधिक किफायतशीर

राष्ट्रीय, २१ एप्रिल २०२५: One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या पेटीएम मनीने आज त्याच्या अलीकडेच सुरू झालेल्या ‘पे लेटर (एमटीएफ – मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी)’ सेवा अंतर्गत व्याजदरात कपात आणि सुधारित ब्रोकरेज रचना जाहीर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश किरकोळ तसेच उच्च मूल्य गुंतवणूकदारांसाठी व्यवहार अधिक परवडणारे करणे हा आहे.

नवीन स्लॅबप्रमाणे व्याजदर आता ९.७५% वार्षिक पासून सुरू होणार आहेत, जे याआधीच्या १४.९९% फिक्स रेटपेक्षा कमी आहेत. हे दर गुंतवणुकीच्या साईजवर आधारित असतील. तसेच, नवीन ब्रोकरेज दर ०.१% प्रति व्यवहार इतके ठेवण्यात आले आहेत, जे परवडणारे असूनही प्लॅटफॉर्मच्या टिकावासाठी अनुकूल आहेत.

किरकोळ गुंतवणूकदार आता ९.७५% या इंडस्ट्रीतील अग्रगण्य व्याजदरावर पे लेटर (एमटीएफ) वापरू शकतात, ज्यामुळे व्यापार सुरू करणे अधिक सुलभ होईल. ₹२५ लाखांपेक्षा अधिक फंडिंग असलेल्या उच्च मूल्य गुंतवणूकदारांनाही हेच दर लागू होतील, ज्यामुळे व्यापारात वाढ आणि अधिक सहभागास प्रोत्साहन मिळेल. ₹१ लाख ते ₹२५ लाख दरम्यानच्या साईजसाठी १४.९९% वार्षिक व्याजदर लागू राहील.

खर्च कमी झाल्यामुळे नवशिक्या गुंतवणूकदारांसाठीही एमटीएफ शोधणे सोपे होईल, आणि त्यामुळे मार्जिन ट्रेडिंग अधिक सुलभ होईल. सध्याच्या बाजारातील परिस्थितीत, जिथे किरकोळ आणि मोठ्या व्यापाऱ्यांनाही स्मार्ट व लवचिक उपायांची गरज आहे, तिथे पेटीएम मनीने ही सेवा नव्याने डिझाईन करून वापरकर्त्यांच्या खर्च कार्यक्षमतेसह पारदर्शकता आणि सहजतेच्या गरजांकडे लक्ष दिले आहे. हे नवीन व्याजदर गुंतवणुकीवर अधिक नियंत्रण व सर्वांसाठी योग्य किंमत सुनिश्चित करतात.

पेटीएम मनीच्या प्रवक्त्याने सांगितले, “भारतामध्ये संपत्ती व्यवस्थापन सर्वांसाठी उपलब्ध व्हावे, हा आमचा उद्देश असून त्यासाठी आम्ही गुंतवणूकदारांना अनुकूल अशा उपाययोजना पुरवण्यास कटिबद्ध आहोत. खर्च कार्यक्षम दरांमुळे अधिकाधिक लोक स्वतःची संपत्ती व्यवस्थापनाची सुरुवात करू शकतील, तर नवीन ब्रोकरेज रचना ही पारदर्शक व दीर्घकालीन टिकाव राखणारी आहे.”

ही सुधारित व्याजदर रचना १८ एप्रिल २०२५ पासून लागू होईल आणि ०.१% प्रति व्यवहारचा नवीन ब्रोकरेज १८ मे २०२५ पासून लागू होईल.

पेटीएम मनी विषयी:

२०१७ मध्ये स्थापन झालेली पेटीएम मनी ही भारतातील अग्रगण्य वेल्थ-टेक प्लॅटफॉर्म असून तंत्रज्ञानाधारित पद्धतीने संपत्ती व्यवस्थापन व इक्विटी गुंतवणूक सुलभ करते. वापरकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवून, पेटीएम मनी आर्थिक बाजारपेठ सर्वांसाठी खुली करण्यास वचनबद्ध आहे. आमचा प्लॅटफॉर्म शेअर्स, F&O, म्युच्युअल फंड्स, SIPs, IPOs, NPS, कर्ज साधने यामध्ये सहज गुंतवणूक करण्यासाठी सक्षम करतो – तेही उपयुक्त साधनांसह सोप्या अनुभवासह. ही One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा:

media@pay

tmmoney.com

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments