378 मेगावॅटच्या या नवीन ऑर्डरसह, सुझलॉनने भारताच्या अक्षय्य ऊर्जा संक्रमणातील एक प्रमुख घटक म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
ऑर्डरमधील प्रमुख मुद्दे:
पुणे, भारत: दीर्घकालीन, उच्च-प्रभावशाली भागीदारी निर्माण करण्यावर आपले धोरणात्मक लक्ष केंद्रित करत, सुझलॉनने नुकतीच NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड (NGEL) सोबतची आपली सर्वात मोठी भागीदारी मजबूत केली आहे. अलीकडेच त्यांना ३७८ मेगावॅटच्या पवन ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळाली असून आता हे प्रकल्प १,५४४ मेगावॅट पर्यंत गेले आहेत. यामुळे सुझलॉनचे बाजारपेठेतील निर्विवाद नेतृत्व तसेच शाश्वत, मोठ्या प्रमाणात विकासासाठी असलेल्या वचनबद्धतेला पाठबळ मिळाले आहे.
या कराराचा एक भाग म्हणून, सुझलॉन 3.15 मेगावॅट क्षमतेचे हायब्रिड लॅटिस टॉवर्स (HLT) असलेले 120 S144 विंड टर्बाइन जनरेटर (WTG) पुरवेल आणि या प्रकल्पाची पायाभरणी, उभारणी करून ते कार्यान्वित करण्याचे काम देखील करेल. त्यानंतर त्याची देखभाल देखील करेल.
सुझलॉन ग्रुपचे उपाध्यक्ष गिरीश तांती म्हणाले, “स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्याच्या एनटीपीसीच्या महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनात धोरणात्मक भागीदार असल्याचा आम्हाला अभिमान आहे. 2032 पर्यंत एनजीईएलने आपला अक्षय्य ऊर्जा पोर्टफोलिओ 60 गिगावॅटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यामुळे ही भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे. परवडणारी वीज प्रदान करून भारतातील सार्वजनिक उपक्रमातील सर्वात मोठ्या अक्षय्य ऊर्जा प्रवासात पवन ऊर्जेची भूमिका महत्त्वाची आहे. गुजरातमधील आमच्या पहिल्या प्रकल्पापासून ते कर्नाटकमध्ये विस्तारापर्यंत, जागतिक स्वच्छ ऊर्जा चळवळीत भारताचे नेतृत्व पुढे नेण्याची आमची सामायिक वचनबद्धता सुरूच आहे.”
सुझलॉन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेपी चालासानी म्हणाले, “पीएसयू क्षेत्रातील प्रमुख आणि उच्च दर्जाचे प्रकल्प सुरक्षित करणे हा आमच्या वाढीच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि एनजीईएलसोबतचा आमचा करार या दृष्टिकोनाच्या यशावर प्रकाश टाकतो. भारताच्या स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांना पाठिंबा देताना विश्वसनीय पर्याय देण्याची आमची क्षमता दर्शवते. भारताच्या अक्षय्य ऊर्जा प्रवासात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून ही भागीदारी आमची भूमिका मजबूत करते.”
________________________________________________________________________________
*Global installations of Suzlon-manufactured wind turbine generators. Data as of 31st December 2024
Press Contact Suzlon Group
Investor Relations Contact Suzlon Group
Monica Miglani
Corporate Communications, Suzlon Group
Mobile: +91.80077 32727
E-mail: communications@suzlon.com
Krishna Kumar
Investor Relations, Suzlon Group
Phone: +91.90286 56440
E-mail: investorrelations@suzlon.com


