पुणे,21 एप्रिल 2025 : फोकस पुणे चॅप्टर तर्फे पुण्यातील हयात रिजन्सी येथे फोकस 2025 – राईज ऑफ हाय-राईज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. केएसबी लिमिटेड ने या परिषदेसाठी फोकस पुणे चॅप्टरसोबत सहयोग केला. या एक दिवसीय परिषदेत युटिलिटी सेवा,पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेटमधील विविध तज्ञांनी उंच इमारतींचा गतीशील विकास आणि शहरी पायाभूत सुविधांचे वाढते महत्त्व या विषयांवर चर्चा केली.
ज्ञान आणि माहितीचे आदान प्रदान माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याच्या ध्येयासह फोकस (फोरम ऑफ क्रिटिकल युटिलिटी सर्व्हिसेस) हे मानवी बांधकाम परिसंस्था क्षेत्रात संवाद आणि नवकल्पनांसाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे.
यंदाच्या वर्षीची संकल्पना राईज ऑफ हाय राईज ही होती. यामध्ये भारतीय शहरांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या उंच इमारती आणि त्यातून निर्माण होणारी आव्हाने व संधींचा शोध घेण्यात आला. यामध्ये पायाभूत सुविधांचे नियोजन,युटिलिटी सेवांचे एकत्रीकरण ते बुध्दिमान आणि शाश्वत तंत्रज्ञानांचा अवलंब करण्यापर्यंत अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या परिषदेत फोकसचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष राखेजा,फोकस पश्चिम विभागाचे माजी अध्यक्ष जे.पी.श्रॉफ,फोकस पुणे चॅप्टर अध्यक्षा आणि सस्टेन ॲन्ड सेव्हच्या व्यवस्थापकीय संचालक प्रणती मुनोत यासारख्या उद्योगातील नेतृत्वांनी सहभाग घेतला. याबरोबरच सन्मानीय अतिथी म्हणून पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांनी पुण्यातील उंच इमारतींच्या विकासाबाबत आपले मत मांडले. शहरी परिसंस्थेच्या वाढणाऱ्या गरजांवर हा संवाद तांत्रिक तसेच मानवी पैलूंवर केंद्रित होता.
एक प्रमुख प्रायोजक म्हणून केएसबी लिमिटेड ने आधुनिक पायाभूत सुविधांसाठी आपल्या विस्तृत आणि नाविन्यपूर्ण पंपिंग सोल्युशन्सवर सादरीकरण केले. या सादरीकरणात बांधकाम सेवा,अग्नी सुरक्षा प्रणाली,पीएचई (पब्लिक हेल्थ इंजिनिअरींग) ॲप्लिकेशन्स आणि एचव्हीएसी (हिटींग,व्हेंटिलेशन, ॲन्ड एअर कंडिशनिंग ) प्रणाली या क्षेत्रात केएसबीच्या सेवा उंच इमारतींना कसे पाठबळ देतात यावर हे सादरीकरण होते.
उच्च घनता असलेल्या उंच इमारतींच्या बांधकामाच्या गरजांसाठी सुयोग्य असलेल्या केएसबीच्या सोल्युशनची रचना स्मार्ट तंत्रज्ञान,उर्जा कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेसह कशी केली जाते याबाबत कंपनीच्या टीमने उपस्थितांना माहिती दिली. या सादरीकरणाने अभिनवता आणि शाश्वततेसाठी केएसबीची असलेली कटिबध्दता दर्शविली. ही कटिबध्दता हरित व स्मार्ट भविष्यासाठी तंत्रज्ञान आणि परिवर्तन यांच्यात समन्वय साधण्याच्या फोकसच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.
या परिषदेत उद्योग,व्यावसायिक,विचारवंत,वास्तुविशारद,सल्लागार,फॅसिलिटी व्यवस्थापक आणि तंत्रज्ञान पुरवठादार अशा उद्योग क्षेत्रातील 200 हून अधिक विविध व्यावसायिकांनी सहभाग घेतला.
केएसबी लिमिटेड आणि उंच इमारतींच्या विकासासाठी कंपनी प्रदान करत असलेल्या अभिनव सोल्युशन्सबाबत माहितीसाठी https://www.ksbindia.in या संकेतस्थळाला
भेट द्या.


