पुणे, 17 एप्रिल, 2025 : कावासाकी―तोशिबा डिजिटल सोल्युशन्स कॉर्पोरेशन (तोशिबा) ने आयओटी व्यवस्थापनासाठी आणि मोठ्या प्रमाणातील बिग डाटाच्या उच्च वारंवारता निर्मितीसाठी आपल्या ग्रिडडीबी क्लाऊड आधारित सेवा जगभरात सुरु करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा आता जगभरातील 26 देश आणि प्रदेशांमधील ग्राहकांना उपलब्ध आहे.
ग्रिडडीबी क्लाऊड वापरकर्त्यांना डाटाबेस ऑपरेशनसाठी आवश्यक असलेल्या सर्व्हर्स, स्टोरेज आणि इतर घटकांसाठी प्रारंभिक सेटअप वेळ आणि खर्च कमी करणे,डाटाबेस कार्यांशी संबंधित प्रयत्न आणि खर्च कमीत कमी करणे,डाटा आणि प्रोसेसिंग व्हॉल्यूममधील वाढ हाताळण्यासाठी गरजेनुसार साधन विस्तार आणि क्लाउड-नेटिव्ह ऍप्लिकेशन्स सोबत सहजपणे एकत्रीकरण अशा सेवांचा फायदा होणार आहे.


