Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedएचपीकडून भारतातील विविध उद्योग आणि ग्राहक क्षेत्रांसाठी पुढील पिढीचे एआय पीसी बाजारात...

एचपीकडून भारतातील विविध उद्योग आणि ग्राहक क्षेत्रांसाठी पुढील पिढीचे एआय पीसी बाजारात एचपी एलिटबुक्स, एचपी प्रोबुक्स आणि एचपी ओम्नीबुक एआय पीसी ऑन डिव्हाइस एआय क्षमतांसह काम करण्याच्या भविष्यांची नव्याने व्याख्या करतात

वैशिष्टे:

एचपी नेक्स्टजेन एआय पीसी ४० ते ५५ ट्रिलियन ऑपरेशन्स प्रति सेकंदांच्या (टॉप्स) वचनबद्ध एनपीयूसोबत वेगवान प्रतिसाद देतात

एचपी एलिटबुक्स, एचपी प्रोबुक्स आणि एचपी ओम्नीबुक मालिका इंटेल, एएमडी आणि क्वालकॉम प्रोसेसर्सनी ऊर्जाप्राप्त आहेत,

एचपी एआय कंम्पॅनियन, मायएचपी आणि पॉली कॅमेरा प्रो वापरकर्ते शक्तिशाली एआय अनुभव मिळवू शकतात

 

नवी दिल्ली, २४ एप्रिल २०२५— आज एचपीने भारतात त्यांच्या सर्वात शक्तिशाली आणि व्यापक नेक्स्ट-जनरेशन एआय पीसीजची श्रेणी सादर केली. नवीन एचपी एलिटबुक, एचपी प्रोबुक आणि एचपी ओमनीबुक मालिका मोठ्या उद्योग, स्टार्टअप आणि किरकोळ ग्राहकांमधील वापरकर्त्यांचा संगणक अनुभव वाढविण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. इंटेल कोअर अल्ट्रा २०० व्ही सीरिज, एएमडी रायझेन एआय३०० सीरिज आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एक्स, एक्स एलिट, एक्स प्लस अशा अद्ययावत प्रोसेसरवर चालणारे हे संगणक कोपायलट+ पीसी म्हणून ते एआयला मूलभूत संगणकीय अनुभवात आणतात. तसेच ते उत्पादकता, सर्जनशीलता आणि सहयोग उत्तम पद्धतीने वाढवतात.

 

एचपी इंडियाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक इप्सिता दासगुप्ता म्हणाल्या, “भारत आपल्या डिजिटल प्रवासात एका शक्तिशाली वळणाच्या टप्प्यावर उभा आहे. तिथे एआय, क्लाउड आणि कनेक्टिव्हिटी एकत्र येऊन आपण कसे जगतो, शिकतो आणि काम करतो या गोष्टींना नव्याने आकार देत आहेत. जगातील सर्वात मोठ्या डेव्हलपर बेसपैकी एक आणि वेगाने वाढणाऱ्या वापरकर्ता यंत्रणेसह भारत एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. एचपीमध्ये आम्ही अर्थपूर्ण नवीन उपक्रम आणण्यासाठी, उत्पादकता वाढविण्यासाठी आणि आर्थिक सेवा आणि रिटेल विक्रीपासून ते आरोग्यसेवा व शिक्षणापर्यंतच्या विविध क्षेत्रांमध्ये आर्थिक संधी सक्षम करण्यासाठी आणि भविष्याची नव्याने व्याख्या करण्यासाठी हा एक महत्त्वाचा क्षण म्हणून पाहतो.”

 

नव्याने डिझाइन केलेल्या एचपी एलिटबुक आणि एचपी प्रोबुक सिरीज एंटरप्राइझ वापरकर्त्यांना विचारात घेऊन तयार केल्या आहेत. हे लॅपटॉप नवीन युगाच्या व्यावसायिकांसाठी तयार केले आहेत कारण त्यांना वारंवार ग्राहकांशी संवाद साधायचा असतो, आपल्या टीमचे व्यवस्थापन करायचे असते आणि सातत्यपूर्ण पद्धतीने उत्तम कामगिरीची अपेक्षा असते. पुढच्या पिढीतील एआय क्षमतांद्वारे सक्षम असलेली ही श्रेणी व्हिडिओ कॉलदरम्यान रिअल-टाइम नॉइज कॅन्सलेशन आणि ऑटो-फ्रेमिंगपासून ते वैयक्तिक कार्यशैली देणाऱ्या कामगिरीपर्यंत सुधारणा देते. दीर्घकालीन बॅटरी आयुष्य, सातत्यपूर्ण मल्टीटास्किंग आणि उद्योग दर्जाच्या सुरक्षिततेसह ही श्रेणी व्यावसायिकांना कुठूनही कार्यक्षम आणि सुरक्षित राहण्यास मदत करते. या श्रेणीत एचपी एलिटबुक ८ (G1i, G1a), एचपी एलिटबुक ६ (G1q G1a), आणि एचपी प्रोबुक ४ G1q यांचा समावेश आहे.

 

निर्माते, फ्रीलांसर आणि दैनंदिन वापरकर्त्यांसाठी एचपी ओम्नीबुक मालिका वैयक्तिक उत्पादकता आणि सर्जनशीलतेमध्ये एआयची शक्ती आणते. ही उपकरणे गतिमान जीवनशैलीशी अखंडपणे जुळवून घेण्यासाठी तयार केली आहेत – मग ती कंटेंट निर्मिती असो, ग्राफिक डिझायनिंग असो, मल्टीटास्किंग असो, स्ट्रीमिंग असो किंवा रिमोट लर्निंग असो. प्रगत एआय क्षमता व्हिडिओ कॉलिंग अनुभव वाढवतात, सहकार्य सुलभ करतात आणि कामगिरी ऑप्टिमाइझ करतात. एचपी ओम्नीबुक अल्ट्रा १४”, एचपी ओम्नीबुक ५ १६”, एचपी ओम्नीबुक ७ एअरो १३”, एचपी ओम्नीबुक एक्स १४ ही उत्पादने वापरकर्त्यांना जास्त काम करण्यासाठी, वेगवान निर्मितीसाठी आणि उत्तमरित्या कनेक्ट करण्यासाठी मदत करतात व एआयदेखील काम करते.

 

एचपी इंडियाच्या पर्सनल सिस्टिम्सचे वरिष्ठ संचालक विनीत गेहानी म्हणाले की, “भारत ही एक वैविध्यपूर्ण आणि गतिमान बाजारपेठ आहे. इथे लोक शक्तिशाली आणि सुलभ तंत्रज्ञानाच्या शोधात आहेत. एचपीच्या पुढच्या पिढीतील एआय पीसीच्या सर्वात विस्तृत पोर्टफोलिओसह आमच्याकडे प्रत्येकासाठी एक उत्पादन आहे – मग ते पुढील मोठी कल्पना अंमलात आणणाऱ्या स्टार्टअप कंपन्या असोत किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे नेतृत्व करणारे मोठे एंटरप्राइझ असोत किंवा अगदी प्रवासात व्हिडिओ एडिट करणारा निर्माता असो. हे एआय लॅपटॉप कामगिरी, सुरक्षा आणि गोपनीयता वैशिष्ट्ये व बॅटरीचे आयुष्यमान लक्षणीयरीत्या वाढवतात. हे सर्व अनेक पातळ्यांवर भारतीय ग्राहकांसाठी काम करणारे आहेत आणि व्यवसायांनाही एआय कंप्युटिंगचे भविष्य भारतासाठी अधिक समावेशक आणि सुसंगत बनवण्याचा अभिमान देतात.”

 

एचपी या पुढील पिढीच्या एआय पीसींना पूरक ठरण्यासाठी शक्तिशाली एआय सॉफ्टवेअर अनुभव देत आहे.

एचपी एआय कंपॅनियन, , हे एक अद्ययावत ऑन डिव्हाइस एआय संशोधन सहाय्यक आहे. ते तात्काळ उत्तरे देते आणि इंटरनेट कनेक्शनशिवायही सुरक्षित फाइल विश्लेषण देते. यासोबत वापरकर्त्यांना अधिक चांगले, लक्ष्याधारित प्रतिसाद किंवा उत्पादन मिळवण्यासाठी वैयक्तिक फाइलचे विश्लेषण करून त्या पाहता येतात.

पॉली कॅमेरा प्रो वैशिष्ट्ये व्हर्च्युअल संवाद आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अधिक गतिमान आणि आकर्षक बनवतात. हे कोणत्याही वातावरणाला ऑटो-फ्रेमिंग, मल्टी-कॅमेरा सपोर्ट, ओव्हरले, स्ट्रीमिंग इंटिग्रेशन आणि कस्टमायझ करण्यायोग्य सौंदर्यशास्त्र यासारख्या वैशिष्ट्यांसह व्यावसायिक दर्जाच्या सेटअपमध्ये रूपांतरित करते. त्यामुळे व्हर्चुअल उपस्थिती अधिक गतिमान आणि आकर्षक होते.

पॉली ऑडिओद्वारे ऑडिओ ट्यूनिंग हुशारीने वातावरणाशी जुळवून घेते. हे पार्श्वभूमीचा आवाज कमी करते, आवाजाची स्पष्टता वाढवते आणि वापरकर्त्यांना मीटिंग किंवा प्रवासातही मोठ्याने आणि स्पष्टपणे ऐकू येईल याची खात्री करण्यासाठी आवाजाची पातळी आपोआप समायोजित करते.

मायएचपी प्लॅटफॉर्म डिव्हाइस कुठे ठेवले आहे हे शोधून देणे आणि बॅटरी ऑप्टिमाइझ करते. जास्त चार्जिंग थांबवते आणि स्क्रीन टाइम आणि अंतर ट्रॅकिंगद्वारे वापरकर्त्याच्या आरोग्याची काळजी घेऊन पीसीचा अनुभव वैयक्तिकृत करतो. यात स्मार्ट ऑडिओ अॅडजस्टमेंटदेखील आहे. तसेच वापरकर्त्यांना जलद, अधिक चांगल्या कार्यप्रवाहासाठी प्रोग्रामेबल कीसह आपले कीबोर्ड कस्टमाइझ करू देते.

 

कोपायलट+ पीसीजसह एलिटबुक्स, प्रोबुक्स आणि ओम्नीबुक्सच्या नवीन श्रेणींमध्ये एआयच्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे रिअल टाइम सहकार्य आणि स्मार्ट उत्पादकता शक्य होते.

 

अत्यंत सुरक्षित आणि शाश्वत

प्रत्येक उपकरणावर जागतिक दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यासाठी एचपी वचनबद्ध आहे. एआयच्या प्रगतीसोबतच विश्वसनीय संरक्षण पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरते आहे. एचपी वुल्फ प्रो सुरक्षेमुळे वापरकर्त्यांना ज्ञात आणि अज्ञात धोक्यांपासून संरक्षण मिळते. ऑनलूकर डिटेक्शन, स्क्रीन ब्लर आणि एचपी श्योर व्ह्यू सारखी वैशिष्ट्ये व्हिज्युअल हॅकिंग रोखण्यास आणि संवेदनशील डेटा खाजगी ठेवण्यास मदत करतात, जेणेकरून वापरकर्ते कुठूनही सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासाने काम करू शकतात.

 

एचपीच्या नेक्स्ट जेन एआय पीसी लॅपटॉप बॉडीसाठी रिसायकल केलेले समुद्रातील प्लास्टिक आणि रिसायकल केलेले धातूंचा वापर केला जातो. शाश्वत पॅकेजिंगमुळे एचपीच्या ई-कचरा कमी करण्याच्या वचनबद्धतेला आणखी पाठिंबा मिळतो, तर एनर्जी स्टार® प्रमाणपत्र आणि ईपीएट® गोल्ड नोंदणीमुळे एचपीच्या हरित तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनाला बळकटी मिळते.

 

किंमत आणि उपलब्धता:

एचपी एलिटबुक ८ G1i ऑनलाइन स्टोअरवर प्रारंभीच्या १,४६,६२२ रूपयांपासून उपलब्ध आहे. येथे क्लिक करा

एचपी एलिटबुक ६ G1q ची एचपी ऑनलाइन स्टोअरमधील प्रारंभीची किंमत ८७४४० रूपयांपासून आहे.

एचपी एलिटबुक ८ G1a लवकरच एचपी ऑनलाइन स्टोअर्समध्ये येणार आहे.

एचपी एलिटबुक ६ G1a लवकरच एचपी ऑनलाइन स्टोअर्समध्ये येणार आहे.

एचपी प्रोबुक ४ G1q ची एचपी वर्ल्ड स्टोअरमधील प्रारंभीची किंमत ७७२०० रूपयांपासून आहे.

एचपी ओम्नीबुक अल्ट्रा १४” ची किंमत १८६४९९ पासून सुरू होते. ग्राहकांना एचपी वर्ल्ड स्टोअर्स आणि एचपी ऑनलाइन स्टोअरवर एचपी ओम्नीबुक अल्ट्रा खरेदी करता येईल. येथे क्लिक करा here.

एचपी ओम्नीबुक एक्स फ्लिप १४” ची किंमत ११४९९९ पासून सुरू होते. ग्राहक ओम्नीबुक एक्स फ्लिप एचपी वर्ल्ड स्टोअर्सवर आणि एचपी ऑनलाइन स्टोअर्सवर खरेदी करू शकतात. येथे क्लिक करा here.

एचपी ओम्नीबुक ७ एअरो १३” ची किंमत ८७४९९ पासून सुरू होते. ग्राहक एचपी ओम्नीबुक ७ एचपी वर्ल्ड स्टोअर्स आणि एचपी ऑनलाइन स्टोअर्सवर खरेदी करू शकतात. येथे क्लिक करा here.

एचपी ओम्नीबुक ५ १६” ची सुरूवात ७८९९९ रूपयांपासून होते. ग्राहकांना एचपी ओम्नीबुक ५ वर्ल्ड स्टोअर्स आणि एचपी ऑनलाइन स्टोअर्सवरून खरेदी

करता येतील. येथे क्लिक करा here.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments