पोषण आणि अभ्यासामध्ये संतुलन ठेवण्यासाठी टिप्स
शेफ अमृता रायचंद यांच्याद्वारे लेख
परीक्षा जवळ आली असताना भारतभरातील विद्यार्थी अभ्यासामध्ये गुंतून गेले आहेत, ज्यामुळे सर्वात महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच पोषणाकडे दुर्लक्ष होत आहे. या आव्हानात्मक काळादरम्यान अवधान, ऊर्जा व संज्ञानात्मक कार्य वाढवण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन महत्त्वाचे आहे.
अभ्यास करताना विद्यार्थी स्नॅक्सचा आस्वाद घेणे नित्याचे बनले आहे. गोदरेज यम्मीजच्या एसटीटीईएम २.० अहवालामधून निदर्शनास येते की, २१ टक्के प्रतिसादक अभ्यास करताना स्नॅकिंग करतात, तर हे प्रमाण १८ ते २५ वर्ष वयोगटामध्ये २७ टक्के आहे, तुलनेत इतर वयोगटामध्ये १८ टक्के आहे.
व्यस्त दिवसांमध्ये संतुलित आहार
अभ्यास महत्त्वाचा असला तरी योग्य पोषण देखील महत्त्वाचे आहे. संपूर्ण धान्य, लीन प्रोटीन्स व ताज्या उत्पादनांसह संतुलित आहार ऊर्जा व अवधान स्थिर करू शकतो. भाज्या कापून ठेवणे किंवा आधीच भात तयार करून ठेवणे यांसारख्या आहार तयार करण्याच्या सवयींमुळे वेळेची बचत होते आणि पुरेशा पोषणाची खात्री मिळते.
जलद व पौष्टिक स्नॅकिंग
अभ्यासादरम्यान स्नॅकिंग ऊर्जा पातळी वाढवते, पण योग्य स्नॅक्सची निवड करणे महत्त्वाचे आहे. चव व पोषणाचे संतुलन असलेल्या स्नॅक्सची निवड करा:
हिरव्या वाटाण्यांचा पराठा: प्रथिने व फायबर उच्च प्रमाणात
प्रथिनांनी संपन्न चिकन नगेट्स: सोपा फ्रोजन पर्याय
स्प्राऊट्स चाट: कुरकुरीत व पौष्टिक
नट्स व ड्रायफ्रूट्स: आरोग्यदायी फॅट्स व प्रथिने
उकळलेले रताळे: फायबर व पोषक कर्बोदके
बाजरा कूकीज: पौष्टिक व फायबर-संपन्न
फळे व नट दही: जलद व रिफ्रेशिंग
भाज्यांसह हम्मस: प्रथिनांनी युक्त
हिरवे वाटाणे व पीनट बाइट्स: कुरकुरीत व चवदार
पालक व कॉर्न टोस्टीज: चीजी व स्वदिष्ट
हे स्नॅक्स सहजपणे तयार करता येतात आणि दीर्घकाळपर्यत अभ्यास करण्यासाठी परिपूर्ण आहेत.
हायड्रेशन महत्त्वाचे आहे
हायड्रेटेड राहणे अवधान व ऊर्जेसाठी महत्त्वाचे आहे. काही प्रमाणात डीहायड्रेशन झाले तरी थकवा येऊ शकतो. जवळ पाण्याची बॉटल ठेवा आणि नैसर्गिक हायड्रेशनसाठी नारळपाणी, बदामाचे दूध किंवा घरी बनवलेले लिंबू सरबत यांचे सेवन करा.
स्मार्ट स्नॅकिंग धोरणे
भूक लागल्यास स्मार्ट स्नॅक्स भूकेचे शमन करण्यासोबत पोषण देईल:
फ्रोजन भाज्या: जलद व पौष्टिक
मिक्स नट्स व सीड्स: चालता-फिरता ऊर्जा
फ्रोजन फ्रूट पॉप्स: रिफ्रेशिंक ट्रीट
भारतातील फ्रोजन स्नॅकिंग रिपोर्टनुसार २६ टक्के सिंगल ग्राहक त्यांची सोयीसुविधा व पोषणासाठी परीक्षेच्या तयारीदरम्यान फ्रोजन स्नॅक्सना प्राधान्य देतात.
वेळेचे व्यवस्थापन आणि आरोग्यदायी आहार
अभ्यासाच्या वेळेसह आरोग्यदायी आहाराच्या सेवनामध्ये संतुलन राखण्यासाठी योग्य नियोजनाची गरज असते. बॅच कूकिंक किंवा आहाराची तयारी वेळ वाचवते आणि आरोग्यदायी फ्रोजन स्नॅक्स अभ्यासाच्या वेळेमध्ये व्यत्यय न आणता पौष्टिक पर्यायांची खात्री देतात.
या टिप्सचे पालन करण्यासोबत स्मार्ट स्नॅकिंग धोरणे तुमचे शरीर व मनाला दीर्घकाळपर्यंत अभ्यासासाठी सुसज्ज ठेवते. लक्षात ठेवा, मानसिक आरोग्यासह शरीराला उत्तम पोषण मिळणे आवश्यक आहे, कारण दोन्ही सानुकूल परफॉ
र्मन्ससाठी महत्त्वाचे आहेत.


