Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedद बॉडी शॉप इंडियाने किमतीत धोरणात्‍मक घट केली ~ नवीन ग्राहकांचे...

द बॉडी शॉप इंडियाने किमतीत धोरणात्‍मक घट केली ~ नवीन ग्राहकांचे लक्ष वेधण्यासह विस्‍तारीकरणाला गती देण्‍यासाठी उचलले पाऊल ~

मुंबई, २७ एप्रिल २०२५: द बॉडी शॉप इंडियाने भारतातील त्‍यांच्‍या १२ सर्वात लोकप्रिय उत्‍पादन फॉर्मेट्समध्‍ये किमतीत धोरणात्‍मक घट केली आहे. नवीन, अधिक लक्षवेधक एण्‍ट्री पॉइण्‍ट्सवर सुरू होणाऱ्या किमतींसह हा उपक्रम द बॉडी शॉपच्‍या विश्‍वामध्‍ये अधिकाधिक ग्राहकांचे स्‍वागत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. नवीन धोरणामधून भारतातील ग्राहकांना आनंदित करण्‍यासोबत त्‍यांच्‍या प्राधान्‍यक्रमांना प्रतिसाद देण्‍याप्रती आणि ब्‍युटी क्षेत्रात अग्रस्‍थानी राहण्‍याप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून येते.

 

क्‍वेस्‍ट रिटेलचे ग्रुप सीईओ राहुल शंकर म्‍हणाले, ”हे दीर्घकाळापासून दृष्टिकोनात असलेले धोरण आहे, जे आमच्‍या मूल्‍यांमध्‍ये खोलवर रूजलेले आहे आणि ग्राहकांच्‍या वास्‍तविक अभिप्रायांचा पाठिंबा आहे. दोन दशकांपासून भारतातील ग्राहकांनी आमच्‍या प्रतिष्‍ठेवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. सर्वसमावशेक राहण्‍यासाठी आम्‍ही अधिक अर्थपूर्ण व शाश्‍वत पद्धतीने उपलब्‍धतेचे निराकरण केले पाहिजे. आमची भावी पिढीसाठी नैतिक ब्‍युटीचे लोकशाहीकरण करण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे, जेथे आम्‍ही त्‍यांच्‍या चॅनेल-केंद्रित, लिंग-केंद्रित, मूल्‍य-संचालित गरजांची पूर्तता करण्‍यासह त्‍यांच्‍या वापराच्‍या पद्धतीबाबत जाणून घेतो.”

 

या लाँचला पाठिंबा देण्‍यासाठी द बॉडी शॉप इंडियाने आपली ‘मोअर लव्‍ह फॉर लेस’ मोहिम सुरू केली आहे, जी नवीन किमतीसंदर्भात सर्व वयोगटांमधील ग्राहकांचे प्रेम, आनंद आणि उत्‍साहाला प्रकाशझोतात आणते. डिजिटल फर्स्‍ट दृष्टिकोनासह मुख्‍य थीम ‘मोअर लव्‍ह फॉर लेस’चे सर्जनशील दिग्‍दर्शनासह शूटिंग करण्‍यात आले आहे, ज्‍यामधून भारतातील ग्राहकांची विविधता दिसून येते. ही मोहिम ग्राहकांच्‍या अविरत आनंदाला साजरे करते. या मोहिमेमधून ग्राहकांच्‍या परिवर्तनाचा अवलंब करण्‍याच्‍या, ट्रेण्‍ड्सचे अनुकरण करण्‍याच्‍या, साठा करण्‍याच्‍या, मोठ्या प्रमाणात गिफ्ट करण्‍याच्‍या आणि त्‍यांना आवडणाऱ्या प्रथांचा पुन्‍हा शोध घेण्‍याच्‍या पद्धतींना निदर्शनास आणते. कथानक भावनिकदृष्‍ट्या संलग्‍न आहे, जेथे सर्व वयोगटांमधील नायक कथानकामध्‍ये सामील होतात. आकर्षक दरांमध्‍ये तेच संपन्‍न घटक आणि विश्‍वसनीय सूत्रीकरण देत द बॉडी शॉप दाखवत आहे की ते काळजी घेतात.

 

या धोरणात्‍मक परिवर्तनासह द बॉडी शॉप उत्‍पादनांना अर्थपूर्णपणे उपलब्‍ध करून देत आहेत, ज्‍यावर ग्राहकांचा प्रेम व विश्‍वास आहे. हे हंगामी किंवा प्रतिक्रियात्‍मक परिवर्तन नाही, तर त्‍यामधून ओम्‍नी-चॅनेल स्‍तरावर द बॉडी शॉपचा दीर्घकालीन दृष्टिकोन दिसून येतो. प्रवेशासंदर्भातील मर्यादा कमी करण्‍यासह नैतिक सोर्सिंग, दर्जात्‍मक बेंचमार्क्स व ब्रँड तत्त्व कायम राखत द बॉडी शॉप भारतातील डायनॅमिक व स्‍पर्धात्‍मक ब्‍युटी क्षेत्रात शाश्‍वत विकास आणि निष्‍ठेसाठी प्रबळ पाया रचत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments